लेखकविशाखा बहुलेकरयांनी सोमवार, 21/09/2009 17:34 या दिवशी प्रकाशित केले.
चकोल्या
हा फार जुना पदार्थ आहे.
साहीत्य- कणीक,तेल,तूरडाळ,सुके खोबरे,मेथी दाणे,जिरे, लाल तिखट,मीठ,गूळ,हळद,हिंग,चींच,
क्रुती - कणीकेच्या चपात्या लाटून (भाजू नये) सुरीने १ इंच आकाराचे तुकडे कापावेत. तुरीची डाळ शिजवून घ्यावी.ती पळीने थोडी बारीक करून घ्यावी. कढईत तेल घालून त्यात मेथीदाणे,हिंग,ह्ळदीची फोड्णी करून्,त्यात डाळ,लाल तिखट
,मीठ,थोडा गूळ,चींच,भाजलेले जिरे खोबरे घालून उकळी आणावी.व कणकेचे तुकडॅ त्यात घालून शिजवावे. खाताना तूप घालावे.
लेखकसुधीर काळेयांनी सोमवार, 21/09/2009 15:56 या दिवशी प्रकाशित केले.
प्रख्यात पाकिस्तानी शास्त्रज्ञ (व पाकिस्तानच्या अणू बॉम्बचे पिताश्री) डॉ. अब्दुल कादीर खान यांचे स्वत:च्या पत्नीला लिहिलेले पत्र प्रसिद्ध झाल्यापासून ते सध्या एकाद्या मैनेप्रमाणे गात आहेत (ज्याला आंग्लभाषेत singing like a canary असे म्हणतात)! कारण ’जब चिडियाही चुग गयी खेत’, गपा बसून काय फायदा?
पण ते जे सांगत आहेत ते खरे आहे का?
लेखकविनायक प्रभूयांनी सोमवार, 21/09/2009 15:11 या दिवशी प्रकाशित केले.
'स्पर्श के नियम 'ह्या पुस्तिकेचे प्रसारण करणार्या न्यायमुर्ती ना माझा सलाम.
ओंगळवाणे आणि नको असलेले स्पर्श फक्त मुलींच्याच वाट्याला येतात हा एक मोठा गैरसमज.
__________________________________________________________
साल १९७०
वय १७
स॑काळची ६.१५ ची अंबरनाथ वरुन येणारी लोकल.
खच्चुन भरलेली.
आधी ओझरता.
नंतर थोड्या दिवसांनी जवळीक साधणारा.
काही दिवसांनी थेट
किळसवाणा, ओकारी आणणारा.
कुणाला सांगायचे.
गोंधळ.
मित्राला सांगायची हिंमत नाही.
हे फक्त आपल्यालाच होते आहे का?
कसे विचारु?
माझ्यातच काही कमी आहे का?
बर, प्रश्न स्वःत सोडवायची हिंमत नाही.
आडदांड दिसणारा ४० वर्षाचा पुरुष
डबा बदलला.
पण पाठलाग सुरुच.
लेखकफ्रॅक्चर बंड्यायांनी सोमवार, 21/09/2009 15:08 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या बायका वेळ आणि मेमरी साठी भांडतात
भांडणात गुंगतात अन स्वता:चे काम विसरतात
वेळेची कमतरता , मेमरीची कमतरता
बायकांची मागणी , मला जरा वेळ देता
एकाच आईच्या ह्या पोरी, पण भांडतात किती
अन सासुबाईंनीही समजुत घालायची तरी किती
Restart झाल्याशिवाय ह्यांना कळणार नाही
सासुबाईंनी वाटणी केल्याशिवाय जमणार नाही
कधी कधी मी स्वता:चा गजनी करुन घेतो
Restart होतो अन सगळं विसरुन जातो
मग सगळ्या बायका बसतात , परत एकदा बोंबलत
अन सासुबाई मरतात , मेमरीची मांडवली करत
आता ही नवी कोण आयुष्यात आली
माझा वेळ अन मेमरी घेउन गेली
मी तिच्या प्रेमात अडकत चाललोय
का वायरस मध्ये फसत चाललोय
ह्या बायका अन पोरांना वेळ देता देत
लेखकअभिजायांनी सोमवार, 21/09/2009 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिसळखाऊ!
मी इथे नवीन आहे. मला खरडवहीत काही निरोप आले आहेत, जे मी आत्ताच पाहिले. तसे ते ईमेल मधून आले होते, आणि मी रिप्लाय देखिल केला होता. पण ती उत्तरे एका विवक्षित आयडीलाच गेली असण्याची शंका आहे.
दुस-याच्या खरडवहीत जाऊन उत्तर कसे द्यावे ह्याचे कृपया कोणी मार्गदर्शन करेल काय?
दुस-याच्या खरडवहीत गेल्यावर उत्तर लिहिण्यासाठी टेक्स्ट बॉक्स दिसत नाही.
पराकोटीच्या अडाणी प्रश्नाबद्दल माफी चाहतो. :-(
धन्यवाद!
लेखकमराठमोळायांनी सोमवार, 21/09/2009 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
आमची जाज्ज्वल्य प्रेरणा
स्वैराचाराचा जुना आड आता नाही
अन कवितांचे तसे लाड पण आता नाही !
लिहिला मी असा काथ्याकुट पुन्हा
कंपुबाजीच्या भुता 'झाड' आता नाही !
चांदण्यांची खरी जाहली मज सोबत
पण प्रतिसादांचा पहाड आता नाही !
संपाकदांचा मला लाभला आधार नि...
टवाळखोरीची तशी धाड आता नाही !
झेलले घाव सारे सदा टीकांचे
पण नव्याने कविताप्रसव चाड.... आता नाही !
चु.भु.दे.घे. (कविता न समजल्यास प्रेषक जबाबदार नाही. ;) )
आपला मराठमोळा,
विडंबन क्लब प्रा. लि.
लेखकविशाल कुलकर्णीयांनी सोमवार, 21/09/2009 10:07 या दिवशी प्रकाशित केले.
काल रात्री
मो. क. गांधी भेटले होते
महात्मा गांधींना पाहिलंस का?
म्हणुन विचारत होते
त्यांनी म्हणे कधीकाळी
रामराज्याचा संकल्प सोडला होता
काल सांगत होते
त्यांच्या रामराज्यातला
रामच हरवला होता
त्यांच्या डोळ्यातलं पाणी म्हणालं
पोरा..
आजकाल सगळेच
गांधीवादी झालेत
बहुतांशी खादी(?)वादी झालेत
आज समाजात
खादीला(?) मोठा मान आहे
मनात गांधी नसला तरी
डोईवर गांधीटोपीची शान आहे
गांधीवादातला वाद राहिलाय
गांधी कुठेतरी हरवलाय....!
कुणी येताय का शोधायला..
हिंसेच्या गर्दीत अहिंसावादी हरवलाय..
काल रात्री
मोहनदास करमचंद गांधी भेटले होते
हरवलेल्या महात्म्याला..
एकटेच शोधत होते...!
विशाल