हार्दिक निमंत्रण !
समस्त मिपा परिवार , नमस्कार !
वाचकहो , मिपावर वेळोवेळी प्रसिद्ध झालेल्या माझ्या कवितांना आपण यथोचित प्रतिसाद दिलात.
याच कवितांचा काव्यसंग्रह "साधा माणूस" या नावानं वंदना प्रकाशनाच्यावतिने प्रकाशित होत आहे.
हा प्रकाशनसोहळा कोकण मराठी साहित्य परिषद , गिरगाव शाखेच्या विद्यमाने गुरूवार दि.७ जानेवारी २०१०रोजी सायं. ६ वाजता मुंबई मराठी साहित्य संघाच्या डॉ. पुरंदरे सभागृह, गिरगाव येथे पद्मश्री मधु मंगेश कर्णिक याच्याशुभहस्ते , पं यशवंत देव आणि ज्योतिर्भास्कर जयंत सळगावकर यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. .
मिसळपाव