Skip to main content

सेव्ह द बेबी गर्ल... आणि, सायलेंट ऑब्झर्वर!!

लेखक दिनेश५७ यांनी शुक्रवार, 16/07/2010 11:54 या दिवशी प्रकाशित केले.
स्त्री भ्रूणहत्या ही एक चिंताजनक सामाजिक समस्या आहे. देशात अनेक राज्यांना या समस्येचा विळखा पडला आहे. समाजिक प्रतिष्टेच्या जुनाट कल्पना आता पुन्हा भीषणपणे डोके वर काढताहेत. `ऑनर किलिंग' ही त्यातूनच निर्माण झालेली एक नवी समस्या आहे. स्त्री भृणहत्या आणि ही नवी समस्या एकमेकांशी निगडीत आहेत. कारण, दोन्हींचे भविष्यातील परिणाम एकच आहेत. त्यामुळे, खरे तर, या दोन्ही समस्या एकाच वेळी डोळ्यासमोर ठेऊन हाताळायला हव्यात. उत्तरेकडचे ऑनर किलिंगचे लोण आता दक्शिणेतही पसरू लागले आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य असल्याचा आपला अभिमान असला, तरी, इथेही अनेक समजुती, प्रथा-परंपरांची जुनाट मुळे खोलवर जिवंत आहेत.

करा कविता : स्पर्धा

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 16/07/2010 11:50 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर बरेच लोक शब्दांचेखेळ करण्यात माहीर आहेत खाली काही शब्द आहेत. ते वापरून एखादी चारोळी / तीनोळी / अनेकोळी करा ओळी मर्यादा किमान एक आणि कमाल पंधरा. एका ओळीत किमान तीन शब्द असावेत. सर्वात आषयघन लिहिणारास त्याच्या खरडवहीत एक सुंदर प्रशस्तिखरड देण्यात येईल. हटके ,फटके ,लटके ,झटके ,मटके, मिटके ,कुटके ,कटके ,रटके ,टोटके, चटके, पटके , गुटके , फुटके यातील काही शब्द इतरभाषीक असतील किंवा काही शब्दाना दोन अर्थ असतील. या पैकी जास्तीत जास्त शब्दांचा वापर करून कविता लिहायची आहे. ( ओळी आणि इथे दिलेले शब्द यांचे प्रमाण विचारात घेतले जाईल ) चला मित्रानो मयत्रीणीनो सुरुवात करुया

माझा एक थरारक अनुभव

लेखक शिल्पा ब यांनी शुक्रवार, 16/07/2010 08:38 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईत असताना कामानिमित्त मला ट्रेनने प्रवास करावा लागायचा....आधी ट्रेनने दादरला तिथून मग ट्रेन बदलून पुढे...मला सवय झाली होती...न होऊन सांगतेय कोणाला.. खरं तर गर्दीच्या वेळी लोकलने प्रवास हा थरारकच असतो...त्याशिवाय कोणतंही विशेषण त्याला शोभून दिसत नाही...आधी भयानक गर्दीत हव्या त्या platform वर जाणे, तिथून हव्या त्या डब्यासमोर उभे राहणे आणि गाडी आली कि आपली पर्स आणि जीव सांभाळून त्या गाडीत चढणे आणि आपले स्टेशन आल्यावर काही सेकंदात परत आपला जीव आणि पर्स होता तसा घेऊन उतरणे हेच एक दिव्य असते... त्या डब्यात चढताना बघणाऱ्याला गंमत वाटावी अशा घटना रोजच घडत असतात...एकदा गाडी थांबल्यावर बायकांच्या (

गाढव, रानडुक्कर, घुबड, कोल्हा आणि सिंह

लेखक अरुण मनोहर यांनी शुक्रवार, 16/07/2010 06:29 या दिवशी प्रकाशित केले.
पंचतंत्रात प्राणीजगतातली पात्रे घेऊन अगदी सोप्या भाषेत जीवनाचे तत्वज्ञान सांगणार्‍या नितीकथा आहेत. आजच्या औद्योगीक (कॉर्पोरेट) जगातले प्राणी कसल्या कथा सांगत असतील? माझ्या कल्पनेतून काही कथांची भर घालण्याचे ठरवले. आणि काही नवयुगाच्या औद्योगीक पंचतंत्र कथा जन्माला आल्या. मी या आधी ही कथा मिपावर टाकली होती. पण काही वाचकांनी ती संस्थळावरील घडामोडींच्या संदर्भात वाचली. त्यामुळे गैरसमज नको, म्हणून आणखी जास्त दंगा होण्याआधी ती काढून टाकली. मग नीट विचारांती ह्या टिपणी सह द्यायचे ठरवले. ह्या कथा स्वरचित आहेत. औद्योगीक जगातले अनुभव प्राण्यांच्या मुखवट्यामधून दाखवून रुपके रचली आहेत.

एका स्थळात लिहिली, वीडंबने हि दोन

लेखक राजेश घासकडवी यांनी शुक्रवार, 16/07/2010 02:18 या दिवशी प्रकाशित केले.
एकाच विषयावर दोन , दोन विडंबनं येण्याचा प्रकार दोनदा घडला, मग आम्हाला काही नतद्रष्ट शंका आल्या... एका स्थळात लिहिली, वीडंबने हि दोन शंका विचारणारे, नतद्रष्ट आम्ही कोण? पहिलेच काव्य येई नावाने केसुरंगा केशवसुमार देती पुढचे विरुद्ध अंगा दावीत दोन्हि रंगा पाध्ये चतूर दोन? शंका विचारणारे , नतद्रष्ट आम्ही कोण? पाध्यांस प्रश्न भारी, पडतोय या क्षणासी पंचास काय बोलू, अन् काय सदस्यांशी? दळली पिठी कुणाची, जात्यात आणि कोण? शंका विचारणारे , नतद्रष्ट आम्ही कोण? एके दिनी परंतू पाध्यांस त्या कळाले कंटक जरूर
काव्यरस

कॉलेज कट्टा भाग - अंतिम

लेखक मराठमोळा यांनी शुक्रवार, 16/07/2010 01:24 या दिवशी प्रकाशित केले.
---भाग - १ --- ---भाग - २ --- ---भाग - ३ --- ---भाग - ४ --- ---भाग - ५ --- "ज्या पोरी पोरांवर जाळं टाकायला सुरुवात करतात, त्त्यांच्यावर नजर ठेवुन मोका मिळताच त्यांना खलास करायचं" - रुपेश सगळ्यांचे रक्ताळलेले सैतानी डोळे एकमेकाकडे बघत होते. आतल्या ज्वालामुखीला वाट मिळाली होती.

एका स्थळात लिहिली, जी धोरणे अनेक

लेखक केशवसुमार यांनी गुरुवार, 15/07/2010 22:49 या दिवशी प्रकाशित केले.
केसुरंगाशेठांचे विडंबन झळकले तेव्हा आम्ही चौपाटीवर भेळ खाण्यास गेलो होतो.. तिथे काही जालकंटकांची एक टोळि ही आली होती..

एका स्थळात लिहिली, जी धोरणे सुरेख

लेखक केसुरंगा यांनी गुरुवार, 15/07/2010 22:45 या दिवशी प्रकाशित केले.
काल जालभ्रणकरताना मिपाच्या दिशेने बराच धुरळा उडलेला दिसला. नक्की काय झाले पाहण्यासाठी आम्ही तिथे गेलो तर काही जालकंटक आणि पाध्ये यांच्यात चौपाटीवर खडाजंगी चालू होती.. धोरणे, अन्याय , आणीबाणी, गुंड, आयोजक, यजमान, कुत्रे, डुक्कर, इंदिरा गांधी वगैरे वगैरे शब्द फेकाफेकी सुरु होती.
काव्यरस