मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एका स्थळात लिहिली, वीडंबने हि दोन

राजेश घासकडवी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
एकाच विषयावर दोन , दोन विडंबनं येण्याचा प्रकार दोनदा घडला, मग आम्हाला काही नतद्रष्ट शंका आल्या... एका स्थळात लिहिली, वीडंबने हि दोन शंका विचारणारे, नतद्रष्ट आम्ही कोण? पहिलेच काव्य येई नावाने केसुरंगा केशवसुमार देती पुढचे विरुद्ध अंगा दावीत दोन्हि रंगा पाध्ये चतूर दोन? शंका विचारणारे , नतद्रष्ट आम्ही कोण? पाध्यांस प्रश्न भारी, पडतोय या क्षणासी पंचास काय बोलू, अन् काय सदस्यांशी? दळली पिठी कुणाची, जात्यात आणि कोण? शंका विचारणारे , नतद्रष्ट आम्ही कोण? एके दिनी परंतू पाध्यांस त्या कळाले कंटक जरूरी आता त्यांना जरा न भासे दोन्ही स्वतःच बडवी, बाजूंनी ढोल कोण? शंकाच ती उरेना, पाध्ये हुशार, हो नं?

वाचन 3911 प्रतिक्रिया 0