Skip to main content

एका स्थळात लिहिली, जी धोरणे सुरेख

एका स्थळात लिहिली, जी धोरणे सुरेख

Published on गुरुवार, 15/07/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
काल जालभ्रणकरताना मिपाच्या दिशेने बराच धुरळा उडलेला दिसला. नक्की काय झाले पाहण्यासाठी आम्ही तिथे गेलो तर काही जालकंटक आणि पाध्ये यांच्यात चौपाटीवर खडाजंगी चालू होती.. धोरणे, अन्याय , आणीबाणी, गुंड, आयोजक, यजमान, कुत्रे, डुक्कर, इंदिरा गांधी वगैरे वगैरे शब्द फेकाफेकी सुरु होती. ही सगळी धुळवड बघून मन विषण्ण झाले आणि आम्ही भलतेच गाणे गुणगुणायला लागलो............ एका स्थळात लिहिली, जी धोरणे सुरेख फुटले बरेच फाटे, नतद्रष्ट काही लोक कोणी विचारले ना, अपुल्या मतास सांगा समजाऊनी तयांचा चालूच राही दंगा अन पाहुनि तयांना, चेकाळती अनेक फुटले बरेच फाटे, नतद्रष्ट काही लोक वेड्यास दुःख भारी, चालू रडे जगाशी पाध्ये न त्या विचारी, सांगेल ते कुणाशी ? संपादकांस टोची, दावी उगाच धाक फुटले बरेच फाटे, नतद्रष्ट काही लोक पंचास सर्व काही एके दिनी कळाले नतद्रष्ट सर्व वेडे, फटक्यामधे उडाले धुरळा जरी उडाला, मिपावरी क्षणैक होती मुळात सगळी ती धोरणे सुरेख -केसुरंगा
लेखनविषय:

याद्या 5778
प्रतिक्रिया 21
काव्यरस

आत्ता कुठे जरा शांत वाटत होतं तोवर लगेच दंगा सुरू होणार. आता तुम्ही म्हणाल आम्ही तर चांगलच लिहिलय. पण दंगा सुरु होण्यासाठी एवढं पुरेसं आहे. रेवती

=)) डिस्क्लेमरः शीर्षक आणि शब्द नसणारा हा प्रतिसाद एखाद्याला अवांतर वाटत असल्यास प्रतिसादकर्ती जबाबदार नाही. ;)

केसुरंगाशेठ, तुमचीच वाट बघत होतो.. इतकी धुळवड झाली आणि तुम्ही आला नाही असे कसे झाले म्हणत होतो तोवर तुमची दणदणीत एन्ट्री झाली.. रंगाशेठ प्रमाणे आमचा पण तोफा कबुल हो.. (हासरा)केशवसुमार

अगदी सही जमलेय विडंबन... नेहमी तीच ती मिपा सद्स्यांवर केलेली विडंबने वाचून तोच तोच पणा आला असे वाटू लागले होते.. पण हे म्हणजे सगळ्यांवर कडी आहे.. आवडले हे वे सां न ल!!! मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) बिपिन कार्यकर्ते

हाहाहा... चालू द्या...

धुरळा जरी उडाला, मिपावरी क्षणैक होती मुळात सगळी ती धोरणे सुरेख
वा वा .. एकदम मस्त :)

In reply to by लिखाळ

शब्दांची वही हरवलेली दिसत्ये! ;-) विडंबन मस्तच हो!! अदिती

पाध्ये न त्या विचारी, सांगेल ते कुणाशी ?
याबाबतीत केसु(न्)रंगा सहमत आहेत हे पाहुन डोळे पाणावले. बाकी विडंबन ठीक. पण केसुरंगा विडंबन टाकुन लगेच का पळाले बुवा? बहुदा टोपी बदलायची असेल. -Nile

In reply to by Nile

पळून कशाला जातोय! आम्ही ९९% वाचनमात्र. एखांदा विषय गावला तरच विडंबन! बाकी गपगुमान बसतो. :|

In reply to by केसुरंगा

अहो येत चला. फार नाहीतर नवविडंबकांना चार मार्गदर्शनपर शब्द देत चला. तेव्हढेच आम्हाला पण चार थेंब मिळतील वाचायला. -Nile

शिळ्या कढीला उत दुसरे काय.. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

=D> केसुरंगाजी १६ आणे जमुन आलय विडंबन.