Skip to main content

पं. मल्लिकार्जुन मन्सूर जन्मशताब्दी कार्यक्रम

लेखक रमताराम यांनी सोमवार, 20/12/2010 13:01 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, जयपूर घराण्याचे दिग्गज गायक पं. मल्लिकार्जुन मन्सूर यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने 'मन्सूर संस्मरण मंच' आणि 'पुणे भारत गायन समाज' यांच्या वतीने खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम सर्व संगीत रसिकांसाठी खुला आहे. कार्यक्रमाचे पहिले सत्र शनिवार २५ डिसेंबर २०१० रोजी सकाळी १० वाजता भारत गायन समाजाचे प्रि. केतकर सभागृह (शनिपाराजवळ) येथे आयोजित करण्यात आलेले आहे. या सत्रात विदुषी श्रुती सडोलीकर-काटकर यांचे गायन होईल. दुसरे सत्र दिनांक २६ डिसेंबर २०१० रोजी सायंकाळी ५.३० वाजता एस. एम. जोशी सभागृह (पत्रकार भवन, गांजवे चौक, शास्त्री रस्ता, एस. एम.

दत्तजयंतीच्या निमित्ताने...

लेखक अवलिया यांनी सोमवार, 20/12/2010 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
२० डिसेंबर २०१० ही दत्तात्रेय जयंती. या दिवसाचे निमित्त साधून, पुढील गोष्टिचे निरुपण माझ्या बुद्धीने देत आहे. हे निरुपण असेच असेल किंवा असावे असा आग्रह नाही. हे निरुपण तुम्ही मानावेच असाही आग्रह नाही. मानल्यास माझी हरकत नाही. या विषयावर चर्चा करण्यास माझी ना नाही.. मी त्यात भाग घेईलच असे नाही. असो. सदर निरुपण मिपावर अंधश्रध्दा फैलावणारे आहे असा संपादकांचा समज होत असल्यास सदर लेखन उडवले तरी माझी हरकत नाही. ही कथा माझ्याकडे असलेल्या पुस्तकांतून जशीच्या तशी उतरवली आहे. पुस्तकाचे नाव आहे - "चरित्र चिंतन -प प श्रीमदवासुदेवानंदसरस्वती (टेंबे) स्वामी महाराज".

|| दक्षिणायण ||

लेखक सुहास.. यांनी सोमवार, 20/12/2010 11:23 या दिवशी प्रकाशित केले.
डिसक्लेमर : लेखकास कुठल्याही प्रांताबद्दल तिटकारा नाही पण रस्सम-भाता ऐवजी 'चटणी-भाकरी' खावुन वाढल्याने महाराष्ट्रावर निस्सीम प्रेम आहे. भारतात आर्य होते की द्रवीड ? (नुकताच आयपीएल मधून बाद झालेला,राहुल नव्हे बरे का) हे इतिहासाचा अभ्यास केल्यावरही मला समजणार नाही, अशी खात्री मला माझ्या अतुलनीय, अफाट आणि आडमाप बुद्धीमत्ते विषयी असल्याने मी त्या भानगडीत पडत नाही, पण काही समाजमान्य थोर इतिहास अभ्यासक विचारवंत व्यक्तींशी (म्हणजे काय हो ?) चर्चा केल्यावर दाक्षिणात्य मंडळी म्हणजे द्रवीड आणि इतर भाग म्हणजे आर्य असा एक समज आहे.

नमस्ते, सचिन...

लेखक सुभाष् अक्कावार यांनी रविवार, 19/12/2010 23:23 या दिवशी प्रकाशित केले.
कुणी नंबर देता का नंबर लैंडलाइन किंवा मोबाइल... कुणाचा म्हणून काय विचारता ? अहो, आपल्या लाडक्या तेंडल्याचा !... नंबर नाही मिळाला तर काय करीन म्हणता ? कुतुबमीनार किंवा लाल किल्ल्यावर चढून जाईन... एव्हरेस्टचे उंच शिखर गाठीन... अथवा 'ताजमहाल'च्या भव्य प्रांगणात उभा राहीन... मनापासून करायचाय अभिनंदनाचा वर्षाव सचिन रमेश तेंडुलकरवर !... वीस वर्षापासून आपल्या बहारदार खेळाने अवघ्या क्रिकेट रसिकांना भरभरून स्वर्गीय आनंद मिळवून दिल्याबद्दल... आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विक्रमी तीस हजार रन्स काढल्याबद्दल... वनडेत नाबाद दोनशे रन्सची सर्वोच्च खेळी केल्याबद्दल... कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पन

स्वामी समर्थ आणि दत्तभक्ती

लेखक शुचि यांनी रविवार, 19/12/2010 22:17 या दिवशी प्रकाशित केले.
२० डिसेंबर २०१० ही दत्तात्रेय जयंती. या दिवसाचे निमित्त साधून, पुढील गोष्ट ही माझ्याकडे असलेल्या पुस्तकांतून जशीच्या तशी उतरवली आहे. पुस्तकाचे नाव आहे - "चरित्र चिंतन -प प श्रीमदवासुदेवानंदसरस्वती (टेंबे) स्वामी महाराज". या पुस्तकाचे लेखक आहेत - डॉ वासुदेव व्यंकटेश देशमुख. संपादकांना योग्य वाटल्यास हा धागा ठेवावा अथवा उडवावा. श्री दत्त व प्रभू रामचंद्र हे दोन्ही भगवान विष्णूंचे अवतार होते. एक कृत युगातले तर दुसरे त्रेता युगातले. प्रभू रामचंद्र हे स्वामी समर्थांचे उपास्य दैवत.

शतकांच्या बादशाह ला सलाम !!

लेखक टारझन यांनी रविवार, 19/12/2010 19:41 या दिवशी प्रकाशित केले.
जगातली सगळी विशेषनं , सगळे शब्द आज खुजे पडल्याने इतकेच. रिकी पाँटिंग च्या तोंडावर हुप हुप करत .. जेंव्हा सर्वांत जास्त गरज होती तेंव्हा लावलेले ५०वे शतक. त्याचं नावंही घेण्याची गरज नाही , खुप पलिकडे गेलाय तो . (आनंदित) टारझन

नायकिणीचा नाच

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी रविवार, 19/12/2010 09:05 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या गावच्या जत्रेच्या आदल्या रात्री ग्रामदैवताच्या अश्वाची सवाद्य मिरवणूक असते. रात्रभर ती गावाच्या चौकाचौकात रेंगाळून पहाटेच्या सुमारास देवाच्या डोंगरावर न्यायची असा प्रघात पडलेला किँवा पाडलेला आहे. या मिरवणूकीचे पूर्वीचे वैशिष्ट्य म्हणजे सोंगाच्या गाड्या असत. सुतारनेटावरची पुरुषमंडळी व पोरं विविध पौराणिक देखावे प्रत्यक्ष संवादातून, हुबेहूब वेशभुषेसह सादर करीत. ते पाहण्यासाठी अबालवृद्धांची रस्त्याकडेला गर्दी उसळायची. परंतु आता जमाना बदललाय... सोंगाच्या गाड्या कालबाह्य झाल्यात. त्यांच्या जागी नाचणाऱ्‍या नायकिणी आल्यात.

ब्रा-ज्वलन ते मुखपुस्तकावरील उरोजकर्क स्थितीसंदेश : स्त्रीमुक्तीवादातील बंधन-दृष्टिकोन प्रवासाचा मागोवा

लेखक राजेश घासकडवी यांनी रविवार, 19/12/2010 07:08 या दिवशी प्रकाशित केले.
नगरीनिरंजन यांनी मुखपुस्तकातल्या उरोजकर्क स्थितीसंदेशांवर एक खुमासदार लेख लिहिला होता. वरवर पहाता हा लेख हलकाफुलका, वात्रट वाटतो खरा, पण त्यामध्ये गहन अर्थ दडलेला आहे. ती लिंगभूमिकांविषयी, स्त्रीमुक्ती चळवळीविषयी काळ्या विनोदातली टिप्पणीच आहे, असं आमचं स्पष्ट मत आहे. उरोजांप्रमाणेच ठसठशीत समोर दिसणाऱ्या या विषयाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचं हूक काढल्याशिवाय तो विषय हातात सामावून येऊच शकत नाही असं आम्हाला वाटलं. म्हणून एक स्वतंत्र लेखच लिहायचं आम्ही ठरवलं. साठ का कुठच्याशा दशकात अमेरिकेत स्त्री-मुक्तीचं वारं वाहात होतं.

लेवू दे निळाई..

लेखक स्वानंद मारुलकर यांनी रविवार, 19/12/2010 04:47 या दिवशी प्रकाशित केले.
झेपावत्या धरेला गगना कवेत घेई अंगांग तृप्त कर तू मज लेवू दे निळाई आधार मीच होते दुबळ्या जगास सार्य़ा माझ्या मनातूनी का पण शोधते निवारा जेव्हा तुला पहाते हरपून भान जाई देतोस रंग ओले माझ्या सुन्या मनाला क्षितिजास रेखिसी अन सौभाग्यरूप माला घे जिंकूनी मला तू अपुल्या गृहास नेई - स्वानंद
काव्यरस