नमस्कार,
जयपूर घराण्याचे दिग्गज गायक पं. मल्लिकार्जुन मन्सूर यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने 'मन्सूर संस्मरण मंच' आणि 'पुणे भारत गायन समाज' यांच्या वतीने खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम सर्व संगीत रसिकांसाठी खुला आहे. कार्यक्रमाचे पहिले सत्र शनिवार २५ डिसेंबर २०१० रोजी सकाळी १० वाजता भारत गायन समाजाचे प्रि. केतकर सभागृह (शनिपाराजवळ) येथे आयोजित करण्यात आलेले आहे. या सत्रात विदुषी श्रुती सडोलीकर-काटकर यांचे गायन होईल. दुसरे सत्र दिनांक २६ डिसेंबर २०१० रोजी सायंकाळी ५.३० वाजता एस. एम. जोशी सभागृह (पत्रकार भवन, गांजवे चौक, शास्त्री रस्ता, एस. एम. जोशी पुलाजवळ) येथे आयोजित करण्यात आले आहे. यावेळी पं मन्सूर यांचे पुत्र व शिष्य पं. राजशेखर मन्सूर यांचे गायन होईल, तसेच पं. मन्सूर यांच्या गायनाच्या काही ध्वनिचित्रफीती दाखवण्यात येतील.
सर्व रसिकांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती.
कार्यक्रमः
दिनांकः २५ डिसेंबर २०१० वेळः सकाळी १०.०० वाजता
गायिका: विदुषी श्रुती सडोलीकर-काटकर
स्थळः पुणे भारत गायन समाजाचे प्रि. केतकर सभागृह (शनिपाराजवळ)
दिनांक: २६ डिसेंबर २०१० वेळः सायंकाळी ५.३० वाजता
गायकः पं राजशेखर मन्सूर
स्थळः एस. एम. जोशी सभागृह (एस. एम. जोशी पुलाजवळ, पत्रकार भवन शेजारी, शास्त्री रोड, नवी पेठ)
साथसंगतः मिलिंद पोटे (तबला), सुयोग कुंडलकर (संवादिनी)
आमंत्रक
मन्सूर संस्मरण मंच.
वाचने
1768
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
क्या बात है!
मी नक्की येणार...
माहितीबद्दल धन्यवाद.. श्रुती
दोन पैकी एकाला नक्की येणार.
ही पु. ल. देशपाण्ड्यांनी
In reply to दोन पैकी एकाला नक्की येणार. by चिंतामणी
मला ते ध्वनिमुद्रण मिळेल का
In reply to ही पु. ल. देशपाण्ड्यांनी by युयुत्सु