Skip to main content

हायकू -

लेखक विदेश यांनी मंगळवार, 02/08/2011 09:06 या दिवशी प्रकाशित केले.
मंत्री तुपाशी बळीराजा उपाशी घोडे कागदी - पाऊस धारा वर्दळ सैरावैरा छत्र्या उत्साही ! घास हातात बाळ परदेशात पाणी डोळ्यात .. रात्र काळोखी अंधार अनोळखी दिवे चोरांचे ! अबोल पती भांडकुदळ पत्नी हैराण भांडी ..

संततधार

लेखक अज्ञातकुल यांनी मंगळवार, 02/08/2011 09:05 या दिवशी प्रकाशित केले.
त्या कुंद पहाटे झडली संततधार मेघात विखुरले मन माझे चौफेर आषाढघनांचे धुके; नाचरे मोर उंचावुन माना शोधे चंद्र चकोर सागर भरती लाटेवर फेस विभोर रेतीवर रांगे ओघळात हिंदोळ अंधारनभाचे ओणवले झाकोळ वार्‍यात मातला अश्वबळाचा जोर चहुओर सैल मग का मनभर हा घोळ थेंबात थेंब दुथडीत अवखळे लोळ झिंगूनहि नाही कुठे लागला मेळ मृगजळ्स्वप्नांचा भातुकलीत समेळ .....................अज्ञात
काव्यरस

टिळकांचे स्मरण.... एका वेगळ्या पद्धतीने..

लेखक जयंत कुलकर्णी यांनी सोमवार, 01/08/2011 20:14 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो, अल्बर्ट स्पिअर जरा बाजूला ठेवून....................... टिळकांच्या निधनानंतर "इंदूप्रकाश" ने एक खास टिळक गौरव अंक काढला होता. ९० वर्षे जूना..तो माझ्याकडे आहे. आता जवळजवळ जीर्ण झाला आहे. त्यातील काही पानांचे फोटो आपल्यासाठी देत आहे. प्रकाशकाचे दोन शब्द जरूर वाचावेत व वादातील दुष्मनी कशी निभवावी हे पण शिकावे म्हणून हा प्रपंच केला आहे तसेच मराठाच्या एका अंकाचे मूखपृष्ठाचे पण देत आहे.

मला, डायेट विषयी, वारंवार विचारले जाणारे प्रश्न

लेखक खादाड अमिता यांनी सोमवार, 01/08/2011 18:09 या दिवशी प्रकाशित केले.
मला सगळ्यात जास्त अश्या प्रकारची ईमेल येतात - 'मी तुमचा लेख वाचतो/वाचते. मी स्त्री/पुरुष, वय: ___, उंची: ____. मला डाएट सांगा.' आता, फक्त एवढीच माहिती सांगून डाएट मागणं म्हणजे एखाद्या डॉक्टर ला एवढंच सांगून त्याच्याकडे 'आता मला औषध द्या' असं म्हणण्या सारखं असतं. आहो, डाएट कशासाठी हवंय, काय विकार आहे, तुमच्या खाण्या पिण्याच्या सवयी काय आहेत, व्यायाम किती (किंवा किती नाही!), व्यवसाय काय, घरचं जेवता कि बाहेरचं, शाकाहारी/ मांसाहारी ई. एवढी सगळी माहिती लागते. माझ्या कुठल्याही क्लायन्ट ची पहिली भेट (मुलाखत) कमीतकमी एक तास चालते.

अजून एक अतिरेकी जमात!

लेखक हुप्प्या यांनी सोमवार, 01/08/2011 18:06 या दिवशी प्रकाशित केले.
ही बातमी पहा. http://www.saamana.com/2011/August/01/Link/Mumbai15.htm मेधा पाटकर ह्यांचे समर्थक आणि विरोधक त्यांना मनुवादी, हिंदुत्ववादी म्हणणार नाहीत. परंतु त्यांनी असे एक विधान केले की संविधान म्हणजे काही होली काऊ नाही त्यात बदल, सुधारणा होऊ शकतात. त्यावर हे कुणी विष्णू शिंदे खवळून उठले. त्यांना त्यात मेधा पाटकरांचा "छुपा मनुवाद" दिसला. हा अतिरेकीपणा कशाला? केवळ आंबेडकरांनी लिहिली आहे म्हणून भारतीय घटना जणू देवानेच लिहिली आहे असे मानायचे आणि त्यात बदल करायची सूचना करणार्‍यांनाही झोडपायचे हा काय मूर्खपणा आहे?

द स्मर्फ्स ( 3D ऍनिमेशनपट )

लेखक सोत्रि यांनी सोमवार, 01/08/2011 17:33 या दिवशी प्रकाशित केले.
शुक्रवारी मुलांच्या 'ऑर्डर'ला मान देउन (हो, आजकालची मुले विनंती करत नाहीत) द स्मर्फ्स हा 3D ऍनिमेशनपट बघितला. तसे मला ऍनिमेशनपट भयंकर आवडतात.

आली माझ्या घरी ही दिवाळी

लेखक जागु यांनी सोमवार, 01/08/2011 15:33 या दिवशी प्रकाशित केले.
काल माझ्याघरी दिवाळी आल्यासारखच मला वाटत होत. कारण काल आमच्याकडे २० दिवे झगमगले. आहो म्हणजे २० ब्रम्हकमळे फुलली (ह्याचे खरे नाव ब्रम्हकमळ नाही. हा निवडुंगाचा प्रकार आहे हे माहीत आहे तरी मला ह्याला ब्रम्हकमळ म्हटले की खुप चांगले वाटाते).

मिपा कट्टा - ३० जुलै

लेखक किसन शिंदे यांनी सोमवार, 01/08/2011 15:23 या दिवशी प्रकाशित केले.
मस्त रिमझिम पावसात 'शुध्द शाकाहारी कट्ट्यासाठी' स्वादमध्ये पोहचलो तेव्हा घड्याळात संध्याकाळचे ६:३० वाजले होते आणी नेहमीच्या सवयीप्रमाणे एकाही कट्टेकरयाचा तिथे पत्ता नव्हता. भराभर सगळ्यांना फोन करुन 'कोण कुठे अडकलय?' याचा अंदाज घेतला. '१ कप वाफाळता चहा आणी समोर भारताची बॅटींग' असा दुहेरी योग जिथे तुम्ही अनुभवाल तिथे बाकीच्या जगाचा विसर तुम्हाला नक्कीच पडेल, तसा मलाही पडला. मग रामदास काका त्यांनतर थोड्या फार फरकाने माझीही शॅम्पेन(हा 'तो' असावा कि 'ती' ह्या बद्दल मला नेहमी शंका पडत असे.) :) मला येवून जॉईन झाले.