Skip to main content

राजकीय भ्रष्टाचाराची माता?

लेखक नगरीनिरंजन यांनी शनिवार, 17/09/2011 10:07 या दिवशी प्रकाशित केले.
एस.एल.भैरप्पा म्हणजे राष्ट्रीय स्तरावर नावाजले गेलेले अग्रगण्य कादंबरीकार आणि तत्त्वज्ञ. त्यांच्या आत्मचरित्राच्या "माझं नाव भैरप्पा" या मराठी अनुवादात दोन उतारे वाचण्यात आले. एका उतार्‍यात त्यांनी दिल्लीला असताना तिथली परिस्थिती पाहून तयार झालेले मत प्रकट केले आहे.

माझी फुलबाग

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 17/09/2011 04:32 या दिवशी प्रकाशित केले.
माझी फुलबाग
किती हौसेने फुलझाडे लाविली पाणी देवून वाढवली जपली काही कळ्या आल्या मुक्या तर काही रंगीत फुले उमलली || परीसरात माझी फुलबाग एकटी नव्हती तसली दुसर्‍या कुणाची शोभेचे लावली तरूवर तेथे काही झाडांना लपेटल्या वेली || अपेक्षीले न मी जरी काही निसर्गाने तिला साथ दिली कोंब तरारून आले वरती अनेक कुसूमे भरभरून आली || येता जाता सारे बघती कष्टाचे कुणी कौतूक करती आनंदाचा ठेवा हा अनमोल परी नव्हता तयांच्यासाठी || अशीच एकदा वेळ ती आली नजर फुलांवर पडली काळी दृष्ट काढली त्याच फुलांची पण हाय!
काव्यरस

(रमी)

लेखक पिवळा डांबिस यांनी शनिवार, 17/09/2011 03:47 या दिवशी प्रकाशित केले.
यासाठी वापरलेला कच्चा माल पत्तेजुडग्याच्या मंथनातून १३ रत्ने बाहेर आली. एक्का, तिर्री, दश्शी, गुलाम राजा वगैरे वगैरे. पण कुशल खेळाडूला रमी ही जमवावी लागते. ती रमी प्रकट झाल्यावर पत्ते उघड करण्याआधीच्या काही क्षणांवर ही लहान कविता आहे. त्रयोदश गुणी एक्का; नव्व्या, राजा ही लाभला असीमकौशल्ये प्रकटे रमी एकवर्णा, एकवंशा, क्वचित विदूषकस्पर्शा पाठराखीण जिची लक्ष्मी अवघड होणे ही जरा, तरी मालक मी अनुरूप तिजला लक्ष्मी ही जिची पाठराखीण आहे अशी ही स्वतः अतिशय चंचल रमी शेवटी तिच्या कर्त्याच्या चरणी लीन झाली. :)
काव्यरस

प्रवास

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 17/09/2011 01:32 या दिवशी प्रकाशित केले.
प्रवास
दुर पुढे जातांना सरलेली मागची वाट नजरेच्या आवाक्यात येते. किती चालायचे अजून बाकी याची आठवण होते. पायात रूतलेले काटे, दगड लागणारा पाऊस वारा उन प्रवासातला होणारा त्रास निब्बर करतं त्वचा अन मन तसल्या बेभरवशाच्या त्रासदायक प्रवासातही एखादी वार्‍याची झुळूक, एखादी गवती हिरवा जमीन मनाला सुखावते. तेथे थांबावस वाटतं पण थांबता येत नाही कारण वाट संपलेली नसते त्यामुळे चालावंच लागत. - पाषाणभेद (दगडफोड्या) १७/०९/२०११
काव्यरस

डॉ. स्ट्रेंजलव्ह ... आणि माझं स्फोटांवर प्रेम जडलं

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी शुक्रवार, 16/09/2011 22:09 या दिवशी प्रकाशित केले.
"डॉ. स्ट्रेंजलव्ह" हा चित्रपट आपण पाहू या असं माईकने घरात जाहीर केलं तेव्हा सर्व ब्रिटीश घरमित्रांनी जोरात "हेऽऽऽ" करत गलका केला. त्यांच्या लेखी आम्ही काही "फकिन' फॉरीनर्स" मात्र एकमेकांकडे "हे काय नाव झालं का?" अशा चेहेर्‍यांनी पहात होतो. अर्थात असलं काहीतरी नाव बनवून आम्हाला बनवण्याचा म्याडपणा माईक करू शकतो अशीच खात्री त्यात जास्त होतो. तो दाणदाण पावलं वाजवत डीव्हीडी घेऊन टीव्हीरूममधे आलाही. "Dr Strangelove: How I Learned to Stop Worrying and Love the Bomb" असं नाव असणार्‍या चित्रपटाबद्दल प्रचंड कुतूहल पोस्टर बघूनच निर्माण झालं.

निस्तीच पोकापोकी!

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी शुक्रवार, 16/09/2011 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
एकानं दुसऱ्याला पोक केलं की दुसऱ्यानं पहिल्याला पोक करायचं, कोणी ‘हे’ शेअर केलं की कोणी ‘ते’ शेअर करणार, कोणी ‘ह्याची’ इमेज पेष्ट केली की कोणी ‘तिच्या’ इमेजा पेष्ट करीत सुटणार... सोशल नेटवर्किंग साईटा म्हणजे निस्ती पोकापोकी झालीय बघा. काय मनाला वाट्टेल ते गरळ बाहेर टाकून ओकाओकी करीत जायचं. भिंतीवर चढून पाहिजे ते खरडीत निघायचं, वाट्टेल ते डकवित चालायचं, नक्को नक्को त्या लिंका पेष्टवित जायचं. मग त्या कोण उघडून पाहतो तर कोणी न उघडताच छान, मस्त, उत्तम असं लिहून पुढे पळतो. सकाळ झाली रे झाली की सुप्रभात, जीएम म्हणत कोण काय प्रतिक्रिया देतो ते चाळीत जायचं. दुपारीही तेच.

पाढेपुराण

लेखक कॉमन मॅन यांनी शुक्रवार, 16/09/2011 16:27 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या ओळखीतले एक देवधर आजोबा होते. आता वारले ते बिचारे. आयुष्यभर पोष्टात कारकुनी केली; पुढे पेन्शनीत निघाले आणि काही वर्ष पेन्शन खाऊन एके दिवशी वैकुंठाला गेले. म्हणजे तसं पाहायला गेलं तर देवधर हा एक सामान्य मध्यमवर्गीय गृहस्थ. ओढाताण असली तरी तसा खाऊनपिऊन सुखी. दोन मुलांचा संसार केला. पण एक गोष्ट मात्र विशेष होती देवधर आजोबांच्यात, आणि ती म्हणजे देवधर आजोबांना पाढे पाठ होते. केवळ १ ते ३० नव्हे, तर चांगले १ ते ५००..! विश्वास नाही ना बसत? पण ती वस्तुस्थिती होती. आम्ही पोरंबाळं मग गंमतीने देवधर आजोबांची परिक्षा घ्यायचो. "आजोबा, सांगा पाहू ३५३ त्रिक किती? २५५ अठ्ठे किती?

क्षण

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी शुक्रवार, 16/09/2011 11:13 या दिवशी प्रकाशित केले.
कालच्या सांजपुजेला लावलेल्या कापूरवातीचा दरवळ अजूनही रेंगाळतोय तशी पहाट झालीये, पण कालची संध्या ती अजूनही घुटमळतेय इथे . हम्म... काल तू येऊन गेलीस. . लालकेशरी मावळतीला रेशिमधाग्यात धरून ठेवावे असा तो क्षण . काही क्षणच असे असतात आयुष्याचे दान देऊन जातात . क्षण तर सरून जातो जाता जाता त्या दानाचे ऋण ठेऊन जातो . अन् मग ते फेडता फेडता आपण क्षण क्षण मोजत राहतो वाट पाहत राहतो . क्षणाचे ऋण फेडायला आयुष्य वेचत राहतो.. नाही कां? |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (१६/०९/२०११)
काव्यरस

वात्रटिका - मोबाइलचं खोकं

लेखक सोत्रि यांनी शुक्रवार, 16/09/2011 09:30 या दिवशी प्रकाशित केले.
स्थळ: मेट्रो शहरातील एक गजबजलेले रेल्वे स्थानक पात्र: 2 शहरी गिज़्मो इक्वीप्ड कूल डुड्स, गॅरी (गिरिष, Software Engg.) आणि सॅंडी (संदीप, BPO कर्मचारी), 1 भंजाळलेला खेडूत ग़ॅरी: हे मेट व्हॉट्स अप. लॉन्ग टाइम नो सी, है किधर सॅंडी: अरे काही नाही रे कालच ऑनसाइट वरून आलो.

निरोप ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी शुक्रवार, 16/09/2011 09:07 या दिवशी प्रकाशित केले.
निरोप घेता घेता निरोप घेणे ईतके सोपे नसते निरोप घेताना काळजात एक कळ उठते निरोप घेताना जसे आभाळ भरून येते तसे मन भरून जाते कधीपण कोसळू शकतो आता हा पाउस तसे मन होऊन जाते निरोप घेता घेता निरोप घेणे सोपे नसते ....! कोठून कोठे आलो..?
काव्यरस