मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

निरोप ..!!

प्रकाश१११ · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
निरोप घेता घेता निरोप घेणे ईतके सोपे नसते निरोप घेताना काळजात एक कळ उठते निरोप घेताना जसे आभाळ भरून येते तसे मन भरून जाते कधीपण कोसळू शकतो आता हा पाउस तसे मन होऊन जाते निरोप घेता घेता निरोप घेणे सोपे नसते ....! कोठून कोठे आलो..? किती लांबचा प्रवास झाला घंर सोडताना मन किती भरून आले होते पण खरेच सांगतो परदेशातील नोकरीमुळे मन तेव्हा फुलले होते छान होता विमान प्रवास सगळे आभाळ अंगण होते पण घर सोडताना मन कसे दाटून येते नि सगळे कसे जे कधी आपले वाटत नव्हते तेही आपले वाटू लागते निरोप घेताना निरोप घेणे ईतके सोपे नसते ... आईचे भरलेले डोळे बाबांची चलबिचल नि उगाचच येरझार्या घालणे मन सुन्न करून टाकते आजूबाजूची घरे ,माणसे झाडे ,पक्षी सगळे सोडून जातांना त्यांच्या विषयी किती आपलेपण वाटते आपले मन ओढून काढताना मन मात्र मोडून जाते नि डोळा हलकेच पाणी येते निरोप घेताना निरोप घेणे खूप अवघड असते ....!

वाचने 4498 वाचनखूण प्रतिक्रिया 7

विदेश 16/09/2011 - 11:05
वाचत असताना जुन्या 'भाभी' चित्रपटातील 'चल उड जा रे पंछी ' आठवत गेले ! कविता छान आहे.

पाषाणभेद 17/09/2011 - 00:10
खरोखरच निरोप घेणे खूप अवघड असते पकाकाका! असे बोलून मी आपला निरोप घेतो. (आपल्या काव्यसंग्रहाचे नावः परदेशी कविता, दुरदेशीच्या कविता आदी ठेवा.)