"प्राचीन भारतीय संस्कृतीची जगव्याप्ती"
गेल्या काही दिवसांत भारतातील राजकीय आणि सांस्कृतिक घडामोडींच्या निमित्ताने हिंदुत्व, सहिष्णुता, भारतीय संस्कृती, भारतीय संस्कृतीचा जगातील प्रभाव इत्यादी विषयांवरती पुन्हा चर्वित चर्वण झाले. प्रागैतिहासिक आणि पौराणिक दाखल्यांची देवाण घेवाण झाली.
पण केवळ प्रागैतिहासिक आणि पौराणिक दाखल्यांपलीकडे काही ऐतिहासिक आणि 'refereed' दस्तऐवज आहे का? या दिशेने चिकित्सक आणि नि:पक्षपाती दृष्टीने काही मर्यादित संशोधनाचा उहापोह केला. त्यातून जी माहिती मिळाली ती थोड्या रंजक आणि वाचनीय लेखमालेच्या स्वरुपात इथे मांडत आहे.
अंतर्यामी ओरीगामी
अंतर्यामी ओरीगामी
गर्दीत त्याला पाहून मी जवळ जवळ त्याचा हात खेचीतच बाजूला घेऊन गेलो. "तू इथे प्रदर्शनात कशाला आलास ?" मी रागाने "तू म्हणालास ना सगळे येणार आहेत म्हणून" तो बिफीकीरीने "मला नाही माहीत कोण कोण आलेय ते" मी खांदे उडवून म्हटलो नेहमीसारखा. तो खटपणे म्हणाला " मला माहीत्येय कोण कोण आलेय ते !!!" " कोण कोण ते सांग चटकन अन मोकळं कर मला " मी अधीरपणे ."क्का$$$$$य" मी शक्य तितक्या मह्तप्रतसायाने खालच्या आवाजात ऐक चिडू नको.. "जे स्वतःच्या मताभोवतीच फिरतात"हो हो किंचीत पुरोगामी,किंचीत प्रतीगामी आणि बरेचशे ओरिगामी"
दिवस असे की - कथा
-----दिवस असे की - कथा----------------
दुकानातल्या दर्शनी भागामध्ये ठेवलेल्या नव्या को-रया चपलांकडे राहुन राहुन विनुचे लक्ष जात होते . त्याचवेळी आपल्या पायातल्या फाटुन चिंध्या होऊ लागलेल्या चपलांच्या जाणिवेने त्याचे मन खिन्नही होत होते . मनाचा हिय्या करुन त्याने दुकानदाराला चपलांची किंमत विचारली . पण तीस रुपये आकडा ऐकुन आपली निराशा लपवत , मान हलवत तो बाहेर पडला . त्यावेळी तरी त्याच्याकडे तेवढे पैसे नव्हते . बाहेर पडल्यावर तो स्वताची समजुत घालु लागला .
"आपल्या पायातल्या फाटक्या चपलांकडे पाहुन वर्गातली मुले हसतात , आपली टर उडवतात . आपल्यालाही चालताना खुप त्रास होतो .
जगणं
आलं सागरा उधाणं पेट घेतला वार्यानं
स्वप्न सारीच मोडून खेळ मांडला दैवानं ।।
डोळयामंदी दाटलं आभाळ रं
आभाळाच्या मनामंदी काही आगळं
पाण्यामंदी पेटलेला जाळ रं
जाळाच्या ह्या ऊभा मागं काळ रं
उरलं सुरलं हरलं.. नशिबाचं वारं फिरलं ।।
कुणा मनी जपलेलं सारं चांदणं
चांदण्याच्या छायेखाली मोठं अंगण
आन् कुणा मनी काटेरी बाभळं
बाभळीच्या काट्यावानी सारं जीवन
कळलं कळलं जगणं.. समदं सारं उसनं ।।
काव्यरस
गाईन मीच गाणी, गर्दभ नका म्हणू...
जिलब्या इथे कुणाला का आवडू नये?
वादात या कुणीही सहसा पडू नये
लपला टवाळ कोठे? तू शोधशी मला...
हातात आज धोंडा या सापडू नये...
गाईन मीच गाणी, गर्दभ नका म्हणू
आधीच सांगतो मी, कोणी नडू नये
राजाच मी मनाचा, हासू नका कुणी
खरडेन लेख माझे, तेव्हा रडू नये..,
तूही जरा चरावे, मीही चरेन ना,
बेकार भांडणांनी दोघे सडू नये
नाहीस तू तरीही आहे निवांत मी,
माझ्याविना तुझेही काही अडू नये,
वागा हवे तसे रे, जखमा नका करू
वाढेल वाद, वाढो, नाते झडू नये ...
नव-हझलकार इरसाल म्हमईकर
मुंबई-पुणे-मुंबई 2
मुंबई-पुणे-मुंबई=2
मुंबई-पुणे-मुंबई या आपल्याच गाजलेल्या आधीच्या सिनेमाचा पार्ट-२ म्हणजेच सिक्वेल घेऊन दिग्दर्शक सतीश राजवाडे आलेले असून आधीच्याच कहाणीला पुढे नेत त्यांनी एक उत्तम प्रयत्न सादर केलेला आहे. दिवाळीला एकमेकांसोबतच तीन चित्रपट प्रदर्शित झालेत आणि त्यापैकी दोन मराठी पण सांगण्यात आनंद कि दोन्ही मराठी चित्रपट अक्षरश: पुरून उरलेले आहेत राजश्रीच्या चित्रपटाला. "कट्यार काळजात घुसली" आणि "मुंबई-पुणे-मुंबई २" हे सिद्ध करतात कि चांगले मराठी चित्रपट असले तर आजच्याहि जमान्यात मल्टिप्लेक्सलाहि तिकीट मिळत नाही इतकी गर्दी खेचू शकतात.
सबनीस जिंकले, रसिक हरले!!
अखिल भारतीय साहित्य संमेलन आणि वाद विवाद हे काही नवे सूत्र नाही. दरवर्षीच होणाऱ्या साहित्य संमेलनाबाबत वाद निर्माण होत असतात. यातील काही वाद व आक्षेप हे न्यायलयापर्यंतही पोचतात. कधी वाद घालणारी मंडळी ही अधिक आक्रमक असतात आणि आम्ही संमेलनच होऊ देणार नाही अशी टोकाची भूमिकाही घेतात. मग पंचाईत होते. विशेषतः एरवी विष्णुनामाचा, हरीनामाचा गजर करणारे वारकरी रस्त्यावर उतरतात तेंव्हा मग साहित्य संमेलनाच्या आयोजकांनाच अशी भूमिका घ्यावी लागते की जे नियोजित संमेलाध्यक्ष आहेत त्यांनीच संमेलन स्थळाकडे फिरकू नये.
तशी वेळ काही वर्षांपूर्वी विख्यात लेखक कादंबरीकार आनंद यादव यांच्यावर ओढवली होती.
सिंहलव्दीपाची सहल : ०१ : प्रस्तावना आणि श्रीलंकेत आगमन
==================================================================
सिंहलव्दीपाची सहल : ०१ : प्रस्तावना आणि श्रीलंकेत आगमन...
मिसळपाव