मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अंतर्यामी ओरीगामी

नाखु · · जनातलं, मनातलं

अंतर्यामी ओरीगामी

गर्दीत त्याला पाहून मी जवळ जवळ त्याचा हात खेचीतच बाजूला घेऊन गेलो. "तू इथे प्रदर्शनात कशाला आलास ?" मी रागाने "तू म्हणालास ना सगळे येणार आहेत म्हणून" तो बिफीकीरीने "मला नाही माहीत कोण कोण आलेय ते" मी खांदे उडवून म्हटलो नेहमीसारखा. तो खटपणे म्हणाला " मला माहीत्येय कोण कोण आलेय ते !!!" " कोण कोण ते सांग चटकन अन मोकळं कर मला " मी अधीरपणे .
"हो हो किंचीत पुरोगामी,किंचीत प्रतीगामी आणि बरेचशे ओरिगामी"
"क्का$$$$$य" मी शक्य तितक्या मह्तप्रतसायाने खालच्या आवाजात ऐक चिडू नको.. "जे स्वतःच्या मताभोवतीच फिरतात आणी इतरांच्या मताचा कायम अनादर करतात, हे त्यांनाही माहीती आहे आणि हतबलता दाखवतात ते किंचीत प्रतीगामी,आपली गृहीतके अंदाज चुकू शकतात सुधारणा होऊ शकते हे माहीती आहे पण करीत नाहीत ते किंचीत पुरोगामी आणी..." "अता ओरिगामी बद्दलही आपले ज्ञान पाजळा " मी चिडीवर नियंत्रण ठेवीत. "हे बघ या कागदाचे काही कोपरे दुमडायचे कधी बाहेर कधी आत्,घडीवर नियंत्रण आणि अचूकता तर हवीच सगळं दिलेल्या प्रमाणात आणि न कापता न चिटकवता" "ते मला माहीत्येय, मला घाई आहे लवकर संपव तुझं पुराण" मी त्रासून "तीच कोपरे आणी कडा कधी जमलेतर आणि अगदी आवश्यक असेल तर कागदाचा आतला भागही दाखवावा लागतो,कागद तोच आकृती तीच तरी आप्ली अशी वेगळी छाप+ठसा उठलाच पाहिजे तुझा कलाकृतीवर्,बघ तुझे अहंकाराचे कोपरे नीट दुमड, सगळं जनरीतीनेच करं पण आस जिवंत राहू दे,एकदा का जमली ही जीवन-ओरिगामी, की फक्त अपूर्व समाधान अन शांतता गोळा होईल तुझ्या विश्वात ..... नाही तर चुकलेल्या(चुरगळलेल्या) घडी-कागदाचा फक्त बोळा होतो.. नेमके मला बॅट्याने बोलावले आणि हा गर्दीत गायब झाला पण डोक्यात गुंता सोडून..

वाचने 4512 वाचनखूण प्रतिक्रिया 27

पगला गजोधर 23/11/2015 - 09:55
गुर्जीना प्रदर्शनात जमावाकडून काव्यसंग्रहाबद्दल डीवच्ण्यात आले, तेव्हा त्यांनी 'ओरिगामी आणि पुरोगामी' या विषयावर जिलेबी काव्य लिहिण्याचा प्रण केलेला ! ;)

In reply to by प्रचेतस

नाखु 23/11/2015 - 14:11
सध्या फोनच्याच रिंग कडे लक्श्य देत नाहीत असे एक रोचक निरिक्षण...

In reply to by अत्रुप्त आत्मा

पगला गजोधर 23/11/2015 - 15:36
''ओरिगामी आणि पुरोगामी'', लेखकः गुर्जी, प्रकाशक: आत्मुकुन्थिय भ्रम, ताम्बे-बोळ पुणे, मुळ किम्मत : १२२ फक्त प्रस्तावना: क्याप्टन चिमण

In reply to by पगला गजोधर

बॅटमॅन 23/11/2015 - 15:41
=)) =)) =)) तदुपरि १२२ रु. चा स्प्लिट = १०० रु. मूळ किंमत + २२ रु. पेट्रोलचे. पैशाचं कै नै ओ, कवितासंग्रह मिळूदे तर खरी. एखाद्या ग्रंथाची पोथी कुणा खाष्ट पंडिताने कुण्णाकुण्णाच्या नजरेस पडू देऊ नये तशातली गत आहे ही.

In reply to by पगला गजोधर

नाखु 23/11/2015 - 15:41
आगावू नोंंदणी ( आगावू माणसांनी नाही तर अ‍ॅडव्हान्स = अग्रीम या अर्थाने) केल्यास उपरोक्त कवीता संग्रह कवीच्या सहीने भेट दिला जाईल. सदस्य चिमण हटेला गँग.. सदस्य भरती जानेवारीत चालू होईल चौकशी करू नै.

प्रमोद देर्देकर 23/11/2015 - 12:38
आता वैजु विषयी विचारायचे सोडुन तुम्ही काव्या विषयी विचारले इथेच तुमचे चुकले, म्हणुन गुरुजी अंतर्धान पावले. हम्म्म अता कशाने बरे ते प्रसन्न होणार?

In reply to by टवाळ कार्टा

नाखु 23/11/2015 - 16:06
टक्कू मोक्कू निव्वळ विस्मरण रे... प्रतिक्षेमुळे (तब्बल ३ महिने झाले शेवटचा भाग प्रकाशीत होऊन)
गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ५० द्रश्य(active tab) What links here प्रेषक, अत्रुप्त, Mon, 03/08/2015 - 22:5