Skip to main content

विश्वभरातील अन्याय्य विचार आणि वर्तन करणार्‍या 'त्या' पुरुषांनो- आणि 'त्या' स्त्रीया सुद्धा तुमचा जाहीर निषेध

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 11/12/2015 16:55 या दिवशी प्रकाशित केले.
"वास्को -दा-गामा चे नामांतर आणि गोवेकरांची मानसिकता" या धागा लेखात गोवेकर महिलांनी " 'गोव्याची मुलगी' म्हटल्यावर समोरच्या (गोव्याबाहेरच्या) लोकांची दृष्टी जेव्हा बदलतात.." अशा स्वरुपाची नाराजी व्यक्त केली आहे; मी महाराष्ट्रातल्या ज्या भागतून येतो तेथे मी गोवेकर मुली अथवा स्त्रीयांबद्द्ल कोणतीही नकारात्मक अयोग्य भावना कधी ऐकली अथवा पाहिली नाही, परंतु एका स्त्रीला जेव्हा दुसरी स्त्री अनुमोदन देते आहे तेव्हा काही शहरातील काही समुह गटांकडून असा त्रास होत असला पाहीजे.

गॅलरीतला [तिसरा] पालापाचोळा

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 11/12/2015 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
घरात माणसे कमी अन लोक वाढतात तेव्हा गॅलरीची 'एक्स्ट्रा रूम' होते! घरात नव्याला सूज येते अन जुन्याचे कुपोषण होते तेव्हा गॅलरीचा वृद्धाश्रम होतो! घरात वाचणारे कमी अन वाचाळ जास्त होतात तेव्हा गॅलरीचा रद्दीखाना होतो! घरात आवाज कमी अन गोंगाट जास्त होतो तेव्हा गॅलरीत 'सायलेंट झोन' येतो! घरात हवे ते कमी अन नको ते जास्त येते तेव्हा गॅलरी 'अडगळीची खोली' होते! घरात दिवस कमी अन रात्री जास्त होतात तेव्हा गॅलरीत बोन्साय वाढतात (?) घरात, घर कमी अन भिंती वाढतात तेव्हा गॅलरीला काचा बसतात, फक्त स्वतः चीच प्रतिमा दाखवणाऱ्या ! .

मिनि सबरीमाला कान्जुर मार्ग मुम्बई

लेखक शान्तिप्रिय यांनी शुक्रवार, 11/12/2015 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
कान्जुरमार्ग पश्चिम मुम्बई येथे एन सी एच कोलोनी च्या आवारात एका छोट्या टेकडीवर अय्यप्पा सबरीमाला मंदीर आहे. जाण्यासाठी एल बी एस रोडवर हुमा टोकीज ला उतरून तेथून एन सी एच कोलोनीतून आत जाउन अर्ध्या किलोमीटर्नन्तर शंभर एकशेवीस पायऱ्या चढून गेल्यानंतर हे मंदिर आहे. मंदिर बऱ्यापैकी घनदाट झाडीत वसले आहे. मी भल्या सकाळी साडेसहाला या मंदिरात गेलो शांतता होती. पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता. पायऱ्या चढताना पण आजूबाजूला चांगला निसर्ग आहे. सकाळच्या वेळी एल बी एस रस्त्यावर वाहने कमी असल्यामुळे वर वाहनांचा आवाज जास्त ऐकू येत नव्हता .

तगमग....

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी शुक्रवार, 11/12/2015 14:28 या दिवशी प्रकाशित केले.
खरं सांगू हल्ली काही सुचतच नाही ह्या बोथट मनाला हल्ली काही बोचतच नाही ह्या शहरात राहून संवेदना झाल्यात बधीर इथे जो तो नुसतेच फोटो काढायला अधीर पडणारा कोणीतरी आकांताने हात मागतोय बघणारा मोबाईलमध्ये त्याचाच फोटो काढतोय तो पलीकडे लटकतोय… मला काय त्याचे ?? आपण तिथे नाही ना मग आपल्याला काय करायचे ? तोही कोणाचा कोणीतरी असेल … मग असू देत …. उद्या त्याच्यासाठी कोणीतरी रडेल … रडू देत …. मी माझ्याच कोशात सुरक्षित आहे ना…. मग बाकीच्यांना काहीही करू देत …. गीतेत वाचलं की शरीर मरतं…आत्मा अमर ! इथे आत्माच मेलाय,फक्त शरीरांची भर वाचलं ते बरोबर की पाहतोय ते….
काव्यरस

तमसो मा ज्योतिर्गमय - भाग २

लेखक भानिम यांनी शुक्रवार, 11/12/2015 11:54 या दिवशी प्रकाशित केले.

तमसो मा ज्योतिर्गमय - भाग १

- http://www.misalpav.com/node/34053

तमसो मा ज्योतिर्गमय - भाग २

कळत नकळत भटांनाही बाळाचा लळा लागू लागला. जरी ते लेकीच्या आणि बाळाच्या खेळाकडे दुर्लक्ष केल्यासारखे दाखवित असत; तरी बाळाच्या बोबड्या बोलांमुळे त्यांचेही मनोरंजन होऊ लागले. रुक्मिणी वहिनी तर बाळाचे सर्व काही करण्यामध्ये अगदी गुंगुनच गेल्या, आणि बघता बघता चारेक वर्षे कशी निघून गेली ते कळले सुद्धा नाही. भट घरी येताच लहानगा कार्तिकेय त्यांच्या मागे मागे करून आणि "बाबा, असे का?

सायकलीशी जडले नाते ९: दुसरे शतक. . .

लेखक मार्गी यांनी शुक्रवार, 11/12/2015 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.

गॅलरीतला [हसरा] पालापाचोळा

लेखक नाखु यांनी शुक्रवार, 11/12/2015 09:42 या दिवशी प्रकाशित केले.
अस्सल (आणि उच्चही) शिवकन्या यांची माफी मागून.. ============================ कुंठीत धाग्यात्,कोण रिंगणात? थुई थुई नाचे मोर्,पिसारा पुढे,मागे बाकी काही नाही! नाचर्या पावसात, कोण रस्त्यात? थांबते गाडी, रिकामी सीटे, बाकी प्रवासी कुणी नाही! चेहरा मनात, कोण आरश्यात? अलवार हसू, खुलते ध्यान, बाकी याद कसली नाही! गमेना मित्रांत, कोण दिवसा स्वप्नांत? लटका राग, मोहक हसू , बाकी ठावे काही नाही! तपत्या उन्हात, कोण उरात? गम्मत गुज,आठवण शिरशिरी, बाकी मग कुणी नाही! लपवलेल्या अर्थात, कशी रुजुवात? शोधेल कुणी, वाचेल कुणी, बाकी वाचन नाखु पाही ================

आटपाट नगरात......

लेखक भानिम यांनी शुक्रवार, 11/12/2015 09:16 या दिवशी प्रकाशित केले.
आटपाट नगरात  जिवंत माणसांना गाडीखाली चिरडतात  आणि पायातल्या वहाणांना डोक्यावर घेतात आटपाट नगरात  माणसे किड्यांसारखी मारतात  आणि मारणारे हुतात्मा म्हणून मिरवतात आटपाट नगरात  कष्टकरी अन्नाला महाग होतात  आणि सवंग नाचे दैवताचा मान घेतात आटपाट नगरात  विकाऊ माध्यमे टी आर पी वर जगतात  आणि खुन्यांचे गोडवे गात फिरतात
काव्यरस

जंटलमन्स गेम - ६ - वर्ल्ड सिरीज

लेखक स्पार्टाकस यांनी शुक्रवार, 11/12/2015 02:46 या दिवशी प्रकाशित केले.
१९७५ चा फेव्रुवारी महिना.... माईक डेनेसच्या नेतृत्वात इंग्लंडचा संघा अ‍ॅशेस सिरीजसाठी ऑस्ट्रेलियात आला होता. पाचपैकी चार टेस्ट्स जिंकून ऑस्ट्रेलियाने सिरीज जिंकली होतीच पण त्याहीपेक्षा त्यांनी इंग्लंडचे अक्षरश: हाल केले होते! याला कारणीभूत होते ते स्ट्रेस फॅक्चरमधून सावरुन पुन्हा ऑस्ट्रेलियन संघात परतलेला डेनिस लिली आणि पायाचं हाड मोडलेल्या अवस्थेत टेस्ट पदार्पण केल्यामुळे पार निष्प्रभ ठरलेला परंतु आता पूर्ण सावरलेला जेफ्री रॉबर्ट थॉमसन! लिली आणि थॉमसन यांना तोंड देताना इंग्लिश बॅट्समनची जी काही द्यनिय अवस्था झाली होती त्याला तोड नव्हती!