"वास्को -दा-गामा चे नामांतर आणि गोवेकरांची मानसिकता" या धागा लेखात गोवेकर महिलांनी " 'गोव्याची मुलगी' म्हटल्यावर समोरच्या (गोव्याबाहेरच्या) लोकांची दृष्टी जेव्हा बदलतात.." अशा स्वरुपाची नाराजी व्यक्त केली आहे; मी महाराष्ट्रातल्या ज्या भागतून येतो तेथे मी गोवेकर मुली अथवा स्त्रीयांबद्द्ल कोणतीही नकारात्मक अयोग्य भावना कधी ऐकली अथवा पाहिली नाही, परंतु एका स्त्रीला जेव्हा दुसरी स्त्री अनुमोदन देते आहे तेव्हा काही शहरातील काही समुह गटांकडून असा त्रास होत असला पाहीजे. अशा प्रकारे समुह,गाव,शहर,प्रांत,जात,धर्म,भाषा,वर्ण असे कोणतेही कारण देऊन त्या समुहातील स्त्रीयांना विशीष्टपणे कॅटेगराईज करणे आणि अपमानास्पद वागणूक देणे सर्वथा गैर आणि निषेधार्ह आहे. अर्थात हे खरेतर असे गोवेकर स्त्रीयांबाबत होते असे नाही, पुण्या मुंबईतल्या मुली स्वैर असतात/वागतात अशा प्रकारची टिका मी माझ्या हैदराबदच्या भेटीत एका ज्येष्ठ (वयाने) मराठी (मेडीकल) डॉक्टर स्त्रीकडून ऐकली किंवा अलिकडे पुण्याच्या मुलींबद्दल व्हॉट्स-अपवरून तथाकथीत विनोद पाहण्यात आले. सांगण्याच तात्पर्य हे केवळ गोव्या-पुण्या अथवा मुंबई बाबत होत असे नव्हे, अगदी इंग्रजी चित्रपट पाहून पाशात्य स्त्रीयांबद्दल, किंवा भारतीय स्त्रीया त्यांच्या पोषाखातून पोटाचे प्रदर्शन करतात त्या स्वैरच असतात असा पुर्वग्रहकरून त्यांना अपमानास्पद बोल लावणे सर्वस्वी चुकीचे आहे. विनोद करणे हि वेगळी गोष्ट आहे पुर्वग्रह करून शिक्के मारणे हा चांगला विचारही नाही चांगला विनोदही नाही. असेच चुकीचे विचार ऐकुन काही लोकांचे चुकीचे निर्णय काही स्त्रीयांसाठी घातकही ठरु शकतात.
स्त्री अमुक एक पोषख करते अथवा अमुक पद्धतीने वागते, पुरुषांशी मोकळेपणाने बोलते वावरते, किंवा तिची स्वतःची व्यक्तीगत जिवनातील निवड अमूक राहिली आहे म्हणून तिच्या बाबत अपमानास्पद विचार बाळगणे सर्वस्वी निषेधार्ह आहे. विश्वभरातील असा अन्याय्य विचार आणि वर्तन करणार्या 'त्या' पुरुषांनो- आणि 'त्या' स्त्रीया सुद्धा आम्ही तुमचा जाहीर आणि तीव्र निषेध करतो.
वाचने
4573
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
जाहीर तीव्र निषेध तर आहेच.
लेखन विषयाशी अत्यंत सहमत !
शंभर काय, हजार टक्के सहमत!
स्टिरिओटाईपचा निषेध
अरे वा
असल्या होलसेल निषेधाच्या
यु टु माहितग्रुटस?
तीव्र पणे
In reply to यु टु माहितग्रुटस? by सूड
प्रतिसाद आवडला
In reply to तीव्र पणे by नाखु
सहमत
अहो माहितगार हे नविन आहे काय
उत्तम विषय.
१००% सहमत!
सरसकटीकरण अनेक प्रकारचं असतं
च्यायला!
तुमच्या वयाच्या स्वैर वर्तन
In reply to च्यायला! by परिकथेतील राजकुमार
छ्या!
In reply to तुमच्या वयाच्या स्वैर वर्तन by काळा पहाड
परावाणी!
In reply to छ्या! by परिकथेतील राजकुमार
काही प्रतिसादकांचे प्रतिसाद