वास्को -दा-गामा चे नामांतर आणि गोवेकरांची मानसिकता
In reply to छान प्रतिसाद by प्रदीप
In reply to धन्यवाद by राही
In reply to धन्यवाद by राही
In reply to मन की बात वाचण्यास आवडली by माहितगार
In reply to धन्यवाद by राही
In reply to धन्यवाद by राही
In reply to मूळ कारण by प्रदीप
In reply to कै च्या कै by परिकथेतील राजकुमार
In reply to कै च्या कै by परिकथेतील राजकुमार
गोव्याचे नाव आज ज्यामुळे हवेहवेसे वाटते त्या मद्यांची नावे प्रत्येक शहराला देऊन टाका. विषयच कट भेंडीखटक्यावर बोट जागेवर पलटी
In reply to वास्को द गामा - किसका मामा? by घाटावरचे भट
In reply to सारे के सारे, गामा को ले कर.... by नंदन
राही-विकास-प्रदीप, बॅटमॅन-गॅरी ट्रुमन यांच्या उपचर्चेतले प्रतिसाद आवडले.याच्याशी सहमत.
In reply to मला जरा एक पॅरलल मुद्दा by अभ्या..
In reply to मला जरा एक पॅरलल मुद्दा by अभ्या..
In reply to इतरांचा सहभाग by राही
In reply to तुमचे प्रतिसाद वाचणे ही खर् by बॅटमॅन
In reply to स्पेशल धन्यवाद. by राही
सेतुमाधवराव पगडी यांच्या लेखनातूनही पुष्कळ माहिती मिळते.सहमत, जीवनसेतू या अप्रतिम आत्मचरित्रात याबद्दल खूप माहिती आलेली आहे.
उद्या तेलंगणासारखे विदर्भ आणि कोंकण वेगळे झाले तर आपल्या अस्मितेचे काय होईल?काही होणार नाही. महाराष्ट्राची अस्मिता म्हणजे मराठ्यांचा इतिहास, मराठी साहित्य आणि वारकरी संस्कृती वगैरे. ते तुकडे झाले तरी तसेच असेल. भाषाही अधिकृतरीत्या मराठीच असेल-कोकणवाल्यांनी काही काडी केली नाही तर. त्यात अस्मितेचा नाश वगैरे मला दिसत नाही.
आणखी पुढे म्हणजे समजा सध्याच्या महाराष्ट्रातल्या काही प्रदेशावर प्राचीन काली राज्य केलेल्या एखाद्या कर्तबगार राजघराण्याची राजभाषा कन्नड होती, तर त्या घराण्याचा सद्यस्थितीत (कर्नाटकाशी आपला वैरभाव असताना) 'आपले' म्हणून अभिमान बाळगायचा की नाही?=)) अहो, तुम्ही कुणाचाही अभिमान बाळगला तरी फरक पडणार नाही. म्हणजे सामान्य माणूस वगैरे मुद्दा नाही, तर हादेखील इतिहासच होता हेच लोकांना झेपणार नाही. "असं होय? बरं बरं" म्हणतील अन सोडून देतील. महाराष्ट्राच्या इतिहासात तसेही सध्या दोनच कालखंड मानले जातात- एक पांडवकाल आणि दुसरा शिवकाल =)) बाकी कर्नाटकाशी वैरभाव म्हणजे काय? बेळगाव भागाबद्दलचे दुखणे ना? बाकी काय आहे घाऊक द्वेष करण्यासारखे?
In reply to सेतुमाधवराव पगडी यांच्या by बॅटमॅन
काही होणार नाही. महाराष्ट्राची अस्मिता म्हणजे मराठ्यांचा इतिहास, मराठी साहित्य आणि वारकरी संस्कृती वगैरे. ते तुकडे झाले तरी तसेच असेल. भाषाही अधिकृतरीत्या मराठीच असेल-कोकणवाल्यांनी काही काडी केली नाही तर. त्यात अस्मितेचा नाश वगैरे मला दिसत नाही.सहमत आहे. आपल्यासारख्या बहुसंख्य सामान्यांच्या दृष्टीकोनातून अस्मितेचा नाश वगैरे गोष्टी लिहिल्या आहेत असे वाटत नाही. कदाचित राजकारण्यांच्या (आणि राजकारणी कोंबड्या झुंझवतात त्याप्रमाणे डोलणार्या काही सामान्यांच्याही) दृष्टीकोनातून अस्मितेचे काय होणार वगैरे गोष्टी लिहिल्या असाव्यात असे वाटते. विदर्भ वेगळा करायची भाषा जरी केली तरी जणू काही भारत-पाकिस्तानसारखी फाळणी होणार आहे अशा प्रकारचे चित्र ते कलानगरचे आणि दादरचे साहेब उभे करतील आणि गुरगुरत अंगावर येतील!! असे काही राजकारणी लोक आणि त्यांच्या तालावर नाचणारे लोक सोडले तर इतरांना महाराष्ट्रातून विदर्भ किंवा अन्य कोणताही भाग वेगळा केला तरी संस्कृतीच्या/ अस्मितेच्या दृष्टीने शष्प फरक पडू नये.
In reply to सेतुमाधवराव पगडी यांच्या by बॅटमॅन
In reply to खरेच by राही
In reply to नजिकच्या इतिहासाची पूर्वपिठीका by विकास
In reply to चांगला प्रतिसाद by राही
In reply to इतरांचा सहभाग by राही
In reply to खरोखरच थक्क करणारा माहितीचा by असंका
In reply to इतरांचा सहभाग by राही
In reply to २५०+ by मंदार कात्रे
In reply to उत्तम प्रतिसाद by अगम्य
In reply to +१ by बॅटमॅन
छत्रपति संभाजी महाराज राज्याभिषेक होताच अवघ्या १५ दिवसात हा २३ वर्षांचा राजा मोहिमेवर निघाला. बरोबर पेशवे मोरोपंत आणि सरनौबत होते. त्यानी बुर्हाणपूरवर हल्ला करून २ कोटी रुपयांची लूट मिळवली. यावेळेला एका अरबी व्यापार्याकडून राजांनी घोडे विकत घेतले असा उल्लेख आहे. हा व्यापारी एवढा घाबरला होता की तो ते घोडे फुकट द्यायला तयार झाला होता म्हणे! पण सामान्य जनतेला त्रास देऊ नये हे शिवाजी राजांचं तत्त्व संभाजी राजांनीही अंगिकारलं असावं. यापूर्वीच म्हणजे इ.स. १६८० मधे शिवाजी महाराजांचा मृत्यु होताच औरंगजेब ५ लाख सैन्य आणि ४ लाख जनावरे घेऊन स्वतः महाराष्ट्रात दाखल झाला होता, मराठी राज्य सहज चिरडून टाकू अशा हिशेबाने तो आला असेल पण आपली गाठ कोणाशी आहे याची त्याला जराही कल्पना नव्हती! नाशिकजवळच्या रामशेजच्या एका किल्ल्यासाठी मुघल सैन्याला ७ वर्षं लढावं लागलं! तसंच पुढच्या ९ वर्षात नाव घेण्यासारखा एकही विजय मुघल सैन्याला मराठ्यांसमोर मिळवता आला नाही. संभाजी राजांच्या काही सैन्याने औरंगजेबाच्या सैन्याला गनिमी काव्याने सळो की पळो करून सोडले तर स्वतः राजे कोकणात उतरले. त्यानी प्रथम पोर्तुगीजांकडे मैत्रीचा हात पुढे केला पण पोर्तुगीजांनी मुघलांना मदत करणे पसंत केलं. आता राजांनी पोर्तुगीजांना संपविण्याचा निर्धार केला. मर्दनगडाची डागडुजी करून तिथे आणि भतग्राम (डिचोली) इथे सैन्याचे भक्कम तळ उभारले. वयाच्या १६ व्या वर्षापासून संभाजी राजांनी थोरल्या महाराजांबरोबर गोव्याच्या आणि इतर मोहिमांमधे भाग घेतला होता, त्यावेळेला महाराजांचं युद्धतंत्र त्यांच्या पूर्ण अंगवळणी पडलं असावं. तसंच गोव्याच्या भूमीची संभाजी राजांना पूर्ण माहिती झाली होती. यामुळेच गोव्यात राजांचा सर्वत्र सहज संचार होत असे. इ.स. १६८३ मधे राजांनी चौल पोर्तुगीजांकडून घेतले तर ११ डिसेंबर १६८४ ला बार्देशवर हल्ला केला. बार्देशातील थिवी, चोपडे हे किल्ले जिंकले. साळशेत (मडगाव) घेतले. म्हैसूरच्या चिक्कदेवरायाचा पराभव केला आणि शिवाजी महाराजानी स्थापन केलेल्या राज्याचा आणखी विस्तार केला. राजे अवघ्या १ लाख सैन्यानिशी ५ लाखाचे मुघल सैन्य, जंजिर्या चा सिद्दी, गोव्यातले पोर्तुगीज आणि म्हैसूरचा चिक्कदेवराय एवढ्या आघाड्यांवर एकाच वेळी लढत होते. पैकी गोव्यात त्यानी बराच काळ वास्तव्य केलं. गोव्यातलं त्यांचं महत्त्वाचं कार्य म्हणजे त्यानी पोर्तुगीजांना पायबंद घातला आणि धर्मांतरित झालेल्याना परत शुद्धिकृत करून हिंदू करून घेण्याचं शिवाजी महाराजांचं कार्य त्यांच्या या पुत्रानेही पुढे चालू ठेवलं. शिवाजी महाराजांच्या गोवा मोहिमेत इथल्या स्थानिक राणे, देसाई वगैरे मंडळीनी त्याना विरोधच केला होता. पण त्यांची मदत मिळवण्यात संभाजी राजे मात्र यशस्वी ठरले. असोळणा, कुंकोळी इथल्या मराठ्यांनी आणि साखळीच्या राणे घराण्याने राजांना खुल्या दिलाने मदत केली आणि त्यांचं राज्य स्वीकारलं. समाजातून बहिष्कृत झालेल्या राण्यांना संभाजी राजानी पंक्तिपावन करून घेतले आणि राणे राजांचे ऋणी झाले. गोकुळाष्टमीच्या रात्री संभाजी राजांनी मांडवी नदी पार करून पोर्तुगीजांवर हला करण्यासाठी नदीच्या पात्रात घोडे घातले, पण पावसात उधाण आलेल्या प्रवाहात घोड्याचा पाय घसरला आणि राजे वाहून जाऊ लागले. या वेळेला खंडो बल्लाळाने राजांना वाचवले अशी कथा स्थानिक लोकांच्या सांगण्यात येते. काही मराठी सैन्य साळशेतमधे ठाण मांडून बसले तर स्वतः राजांनी वेळ न गमावता कुंभारजुवे बेट पोर्तुगीजांकडून घेतले आणि तीन बाजूंनी पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या प्रदेशावर हल्ला चढवला. आता फक्त तिसवाडीच पोर्तुगीजांच्या ताब्यात राहिली होती. दुसर्या दिवशी राजे स्वतः गोवा वेल्हावर हल्ला करणार हे पोर्तुगीजांनी जाणले. आताच्या ओल्ड गोवा येथून कुंभारजुवे बेट दिसते. तिथल्या सैन्याच्या हालचाली पाहून पोर्तुगीज घाबरले. त्यांनी चर्चमधलं सेंट फ्रान्सिस झेवियरचे शव बाहेर काढलं. व्हाईसरॉय काउंट डी अल्वारिसने आपला राजदंड त्याच्या शवपेटीवर ठेवला आणि "सायबा, तूच आमचं रक्षण कर" अशी करुणा भाकली. पोर्तुगीजाना हा सायब पावला की नाही माहित नाही, पण मुघल मात्र मात्र पावले! सुमारे १ लाखाचे मुघल सैन्य कोकणात उतरल्याची खबर आली आणि जिंकत आलेली गोव्याची मोहीम अर्धवट टाकून संभाजी राजाना परत जावं लागलं. इ.स. १६८४ मधे संभाजी राजांनी पोर्तुगीजांबरोबर तह केला. त्या अनुसार मराठ्यांनी पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेले गोव्याचे ३ तालुके त्याना सोडून दिले. तर पोर्तुगीजानी चौल इथे कर देण्याचं मान्य केलं. पण या तहाची पूर्ण अमलबजावणी झाली नाहीच! बार्देशमधले किल्ले मराठ्यांनी परत केले नाहीत. आता औरंगजेबाची वक्रदृष्टी गोव्याकडे वळली. पण पोर्तुगीजांनी गोव्यातल्या मराठा देसायांबरोबर तह केला आणि मुघल सैन्याच्या हाती काही लागले नाही. मराठा सैन्य आणि पोर्तुगीज यांच्या चकमकी सुरूच राहिल्या. पण संभाजी राजे पोर्तुगीजांना हाकलून लावण्यासाठी परत गोव्यात येऊ शकले नाहीत. ते जर झालं असतं तर आज गोवा महाराष्ट्राचा एक जिल्हा राहिला असता! आणखी सतत ४ वर्षे मुघलाना हुलकावण्या देत जेरीला आणणारा हा शूर छत्रपती १ फेब्रुवारी १६८९ ला कपटाने कैद झाला. त्यांच्या सख्या मेव्हण्याने, गणोजी शिर्क्याने विश्वासघात केला आणि नंतर तब्बल ४० दिवस हालहाल करून शेवट औरंगजेबाने ११ मार्च १६८९ ला राजांचा वध केला. पण एवढे हाल होत असतानाही या छाव्याने औरंगजेबाचा कोणताच प्रस्ताव मानला नाही आणि वीराचे मरण पत्करले. महाराष्ट्राच्याच नाही तर गोव्याच्या इतिहासात या राजाचं स्थान अद्वितीय आहे. त्याच्या मृत्यूनंतर मराठ्यांचा झुंजण्याचा निर्धार आणखीच पक्का झाला आणि नंतर एकजुटीने पण निर्नायकी अवस्थेत मराठ्यांनी मुघलांना जी झुंज दिली तिला इतिहासात तोड नाही. पराक्रमात बापसे बेटा सवाई असलेल्या या तरूण राजाने अवघ्या ३२ वर्षांच्या आयुष्यात विजेसारखं थोड्या काळासाठी लखलखून आत्मार्पण केलं आणि सामान्य शेतकर्यांना औरंगजेबाशी भांडण्याचं पहाडाचं बळ दिलं. गोव्यात पोर्तुगीजांना बसलेला दणका एवढा प्रचंड होता की त्या ३ तालुक्याच्या पलिकडे आणखी प्रदेश आपल्या ताब्यात आणण्याचा प्रयत्नसुद्धा त्यानी नंतर केला नाही.यानंतरच्या काळात सावंत आणि सौंदेकर यानी पोर्तुगीजांविरुद्ध एक पाऊल पुढे २ पावले मागे करत लढा सुरूच ठेवला. त्यानंतर बाजीरावाच्या काळात पुढीलप्रमाणे घटना घडल्या.
इ.स. १७२० नंतर बाजीराव पेशव्यांच्या सरदारानी उत्तर गोव्यात हल्ले चालू ठेवले. आता फोंड सावंत बाजीरावाच्या बाजूने पोर्तुगीजांवर हल्ले करू लागला. बाजीराव आणि चिमाजी, पोर्तुगीजांविरुद्ध वसई आणि गोव्याच्या दोन्ही आघाड्यांवर लढत होते. पोर्तुगीजांनी वसईला गोव्यातून मदत पाठवू नये म्हणून इ.स. १७३९ साली दादाजी भावे नरगुंदकर, वेंकटेशराव घोरपडे आणि जिवाजी शिंदे यांनी गोव्यावर पुर्या ताकदीने हल्ला चढवला. राशोल आणि मार्मुगोव्याचा किल्ला सोडून उरलेला साळशेत तालुका मराठ्यांच्या ताब्यात आला. तर फोंड सावंतानंतर गादीवर आलेला त्याचा नातू रामचंद्र याने बारदेश तालुका घेतला. मराठ्यांनी फोंडा, सुपे आणि सांगे तालुके ताब्यात घेतले. संभाजी राजांनंतर परत एकदा पोर्तुगीजांच्या ताब्यात फक्त तिसवाडी राहिली. आता पोर्तुगीजांनी बाजीरावाकडे तहाची याचना केली. बाजीरावाने इन्क्विझिशन बंद करा, हिंदूंचा छळ बंद करा या आणि आणखी मागण्या पोर्तुगीजांपुढे ठेवल्या. इ.स. १७४० मध्ये चौल आणि कोर्लाईचा किल्ला देऊन पोर्तुगीजानी गोव्यात आपलं अस्तित्त्व कसंबसं राखलं. मराठ्यांनी कुंकोळी आणि असोळणा परत केले, पण रामचंद्र सावंताने बार्देश मात्र परत केला नाही! रामचंद्र सावंत आणि मराठे विरुद्ध पोर्तुगीज अशा चकमकी सुरूच राहिल्या. सोंदेकर आणि राणे यानी या वेळेला पोर्तुगीजाना मदत करायचं मान्य केलं. इ.स. १७५६ साली पोर्तुगीज व्हॉईसरॉय कॉण्डे डी अल्वाने मराठ्यांच्या ताब्यातील मर्दनगडावर हल्ला केला. या लढाईत स्वतः व्हॉईसरॉय मरण पावला! गोंधळाचा फायदा घेत सावंतांनी पेडणे, सांगे आणि मणेरी तालुके घेतले. २४ डिसेंबर १७६१ ला तह झाला आणि पोर्तुगीजांनी सावंतांच्या ताब्यात असलेल्या सर्व प्रदेशावर सावंतांचा हक्क मान्य केला. याच सुमाराला पानिपतच्या लढाईत मराठ्यांचा पराभव झाला आणि पेशवाई दुबळी झाली. याचा फायदा घेत पोर्तुगीजांनी इ.स. १७६३ मध्ये मर्दनगड जिंकून सोंदेकरांच्या ताब्यात दिला. पण एवढ्यात म्हैसूरच्या हैदर अलीने सोंदेकरांवर हल्ला केला. सोंदेकर पळून गोव्यात पोर्तुगीजांच्या आश्रयाला आले. आता कसलीच जबाबदारी नको म्हणून सोंदेकरानी फोंडा, केंपे आणि काणकोण तालुके पोर्तुगीजांच्या हवाली केले. इ.स. १७७१ साली सोंदेकरानी गोव्यातल्या त्यांच्या ताब्यात असलेल्या प्रदेशावरचा हक्क सोडून दिला. इ.स. १७८५ साली कोल्हापूरच्या छत्रपतीनी सावंतांवर हल्ला केला. आता घाबरून सावंतानी पोर्तुगीजांकडे मदत मागितली आणि त्या मदतीची परतफेड म्हणून पेडणे तालुका पोर्तुगीजांच्या हवाली केला. अशा प्रकारे इ.स. १७८८ मध्ये पूर्ण गोवा पोर्तुगीजांच्या सत्तेखाली आला. पोर्तुगीजांनी इ.स. १५६० साली जिंकलेल्या तिसवाडी, बार्देश आणि साळशेत (साष्टी) तालुक्याना 'जुन्या काबिजादी' तर इ.स. १७७१ आणि इ.स. १७८८ मध्ये ताब्यात आलेल्या उरलेल्या प्रदेशाला 'नव्या काबिजादी' हे नाव मिळालं.संपूर्ण गोव्यात पोर्तुगीजांची सत्ता १७८८ नंतर प्रस्थापित झाली. या नंतरच्या काळात मराठी इतिहास संपूर्ण पुसून टाकायचा पद्धतशीर प्रयत्न झाला. इथपर्यंत की कार्निव्हालच्या मिरवणुकीत शिवाजी आणि संभाजी यांची सोंगे आणून ते कसे हरले हे खोटेच दाखवण्यात यायचे. तसेच स्थानिक लोकांवर धर्मांतराची जबरदस्ती वगैरे प्रकार बंद झाले. गुन्हेगारांना कठोर शिक्षा असल्याने तेव्हाची राजवट सामान्य लोकांना चांगली वाटू लागली.
भारतात विलीन होवून 55 वर्षे झाली तरी गोवेकरांमध्ये " भारतीयत्व " रुजलेच नाही असे म्हणावे का?हे सरसकट नाहीये. महाराष्ट्रापेक्षा गोव्यात परप्रांतातून येणार्या लोकांना जास्त चांगली वागणूक मिळते. आम्हाला कोणीही कधी "भायले" म्हणून हिणवले नाही. कानडी आणि केरळी लोकांच्या बाबत मात्र थोडा भेदभाव, आकस दिसतो. पण आंदोलने वगैरे होतील असा नाही. काही लोक जे तुम्ही म्हणताय तसे बोलतात किंवा पोर्तुगीज पासपोर्ट बाळगतात त्यांना "पोर्तुगालला चालते व्हा" म्हणून सांगितले जातेच!
In reply to अजून चालू आहे का? by पैसा
महाराष्ट्रापेक्षा गोव्यात परप्रांतातून येणार्या लोकांना जास्त चांगली वागणूक मिळते. आम्हाला कोणीही कधी "भायले" म्हणून हिणवले नाही.बाकी सगळी उत्तम माहिती पण महाराष्ट्राबाबतची टिप्पणी अनावश्यक वाटली. मी आणि माझे कुटुंबिय मूळ गोव्यातीलच आहोत आणि आज अनेक वर्षे महाराष्ट्रात अतिशय आनंदात आहोत. गोव्याबाबत जितकी आपुलकी, माया वाटते तितकेच प्रेम आम्हांला महाराष्ट्राबद्दलही वाटते. महाराष्ट्रातही सहसा बाहेरुन येणार्यांना कोणी हिणवत वगैरे नाही. तुला असा काही वैयक्तिक अनुभव आहे का?
In reply to महाराष्ट्रापेक्षा गोव्यात by यशोधरा
In reply to महाराष्ट्रापेक्षा गोव्यात by यशोधरा
In reply to वैयक्तिक नाही by पैसा
In reply to काय? by यशोधरा
In reply to आंदोलने योग्य अयोग्य यात by पैसा
In reply to अच्छा, असे आहे होय? बरं बरं. by यशोधरा
In reply to जातीय दंगा वेगळा by पैसा
In reply to LOL, कित्तरीं कुस्कुट कितें!! by यशोधरा
In reply to आहेत अग! by पैसा
In reply to अगं, ते शांत म्हणजे मुळात by यशोधरा
In reply to खरे आहे by प्रदीप
In reply to खरे आहे by प्रदीप
In reply to कॅप्शन by राही
before Goa is fully concretized and overrun by Indiansआणि हा ब्लॉग कुणा किरिस्तावाचादेखिल नाही!! बादवे, थोडे सरसकटीकरण वाटेल पण गोव्यातील किरिस्ताव आणि उच्चवर्णिय हिंदू हे एकाच पद्धतीने विचार करतात हे वेळोवेळी दिसले आहे. विलीनीकरणाचे सार्वमत असो की राजभाषा आंदोलन, बहुजन हिंदू एका बाजूला आणि किरिस्ताव (बहुजन + उच्चवर्णिय) अधिक उच्चवर्णिय हिंदू दुसर्या बाजूला, हेच चित्र दिसते.
In reply to हम्म by सुनील
In reply to कॅप्शन by राही
In reply to या मानसिकतेबद्दल मला काही by पिशी अबोली
In reply to या मानसिकतेबद्दल मला काही by पिशी अबोली
In reply to पिशी अबोलींच्या तार्कीक उणीवेस उत्तर - भाग १ by माहितगार
'गोव्याची मुलगी' म्हटल्यावर समोरच्या मुलाची दृष्टी बदलते वगैरे हा कदाचित तुमचा व्यक्तीगत अनुभव नाहीना आपणही या विषयी सरसकटीकरण करत नाही आहात ना ?सरसकटीकरण नाही, 'असंही होतं कधी कधी' हे म्हणायचं होतं. इन्फॅक्ट मी 'मुलाची' म्हटलं ते चुकलंच. गोव्याची म्हटलं की कुणाचाही दृष्टिकोन थोडासा बदलतो. मला माझा अनुभव हायलाईट करायचा नाहीये. किंवा काय योग्य/ काय अयोग्य त्याची चर्चाही नाही. एका सामान्य गोवेकराचा या गोष्टीबद्दलचा विचार कसा असेल, ते मांडायचा प्रयत्न केला एवढंच. गोवेकर अगदी कट्टर देशप्रेमी का नसू शकतात ते दाखवायचं होतं फक्त.
In reply to 'गोव्याची मुलगी' म्हटल्यावर by पिशी अबोली
In reply to व्हॉट नॉनसेन्स ? सर्वात मोठी तार्कीक उणीव by माहितगार
In reply to माहितगारजी, by पिशी अबोली
In reply to भाषेचाच प्रश्न असेल तर, by माहितगार
In reply to वाचते आहे by पैसा
गोव्यातली मुलगीजो पर्यंत गोव्यात हिंदूच बहुसंख्य आहेत हे माहित नव्हते त्या वयात चित्रपटांमुळे फारतर गोव्यातल्या मुली ख्रिश्चन असतात या पलिकडे डोक्यात काही नकारात्मक प्रतिमा होती असे वाटत नाही. गोवा म्हणजे धमाल एवढेच बर्याचजणांच्या डोक्यात असते परंतु त्यात गोव्यातील मुलींचा विचारही होत नाही. फारतर पाश्चात्य तरुणींना बघण्याचे आकर्षण असू शकेल (मी त्याचेही समर्थन करत नाही). मी महाराष्ट्रातल्या ज्या भागातून येतो तेथे गोव्याची मुलगी म्हणून कोणताही वेगळा विचार कुणाही स्त्री पुरुषांच्या मनात आलेला पाहिलेला नाही, किंवा भारतात मला जिथे फिरण्याचे सौभाग्य प्राप्त झाले तेथेही असे कधी ऐकण्यात आले नाही. उर्वरीत भारतातील काही लोक समुहामध्ये तुम्ही म्हणता तसे असेल तर नक्कीच चुकीचे आहे तसा विचार कुठे असेल तर त्याचे प्रबोधन झालेच पाहिजे - देशप्रेमाशी तडजोड करण्याचा तो एक्सक्युज असू शकणार नाही हे माझ्या एवढ्या चर्चे नंतर सर्वांनी स्विकारलेच असेल- पण असे लोकसमुह भारतात सबंध भरतात खुप असतील का या बद्दल साशंक आहे. बाकी गोवा स्वतंत्र होऊन एवढी वर्षे झाली त्यांच्या स्थानिक शाळातून तसेच टिव्हीसारख्या माध्यमातूनही पूर्ण इतिहासाची पुर्ण माहिती दिली जावयास हवी असे तुमच्या प्रतिसादावरुन वाटले.
In reply to व्हॉट नॉनसेन्स ? सर्वात मोठी तार्कीक उणीव by माहितगार
In reply to नॉन्सेन्स? नॉट क्वाएट! by प्रदीप
In reply to @प्रदीप साहेब, वस्तुनिष्ठता, by माहितगार
In reply to अभ्यास by प्रदीप
In reply to अभ्यास by प्रदीप
In reply to या मानसिकतेबद्दल मला काही by पिशी अबोली
'इंडियन्स' ची गोव्याबद्दलची मानसिकता हाही भाग या थोड्याशा नकारात्मक दृष्टिकोनामधे येतो. गोवा म्हणजे धिंगाणा या एकाच भावनेने बहुसंख्य देशी पर्यटक तिथे येतात. गोवेकरांच्या रक्तातच आतिथ्यशीलता आहे. पण सगळ्या जागा घाण करून ठेवणे, अचकट-विचकट वागणे, जिथे आहोत त्या लोकल संस्कृतीचा काहीही आदर न करणे या गोष्टी परदेशी पर्यटकांपेक्षा भारतीयांच्या नजरेत फार भरतात यावर कुणाचाच आक्षेप नसावा. (परदेशी पर्यटकांचे प्रश्न वेगळे आहेत, पण ते सामान्य माणसाच्या नजरेत भरत नाहीत). गोवेकरांकडे बघण्याचाही अन्य भारतात दृष्टिकोन थोडा विचित्र आहेच. 'गोव्याची मुलगी' म्हटल्यावर समोरच्या मुलाची दृष्टी जेव्हा बदलते, तेव्हा मनात अढी बसतेच..असो.अनुमोदन.
In reply to या मानसिकतेबद्दल मला काही by पिशी अबोली
'इंडियन्स' ची गोव्याबद्दलची मानसिकता...हा शब्दप्रयोग नजरचुकीने अनवधानाने झाली आहे का ? यात राहींनी योजला तसा 'उर्वरीत' हा शब्द यो़जणे अभिप्रेत होते का ? कारणही आपला एकुण प्रतिसाद अभ्यासता हे वाक्य अत्यंत आक्षेपार्ह म्हणावे असे आहे. गोव्यातले लोक स्वतःला भारतीय समजत नाहीत का ? असा प्रश्न या वाक्यातून निर्माण होतो हे आपण लक्षात घेतले आहे का ? युरोपीयन वसाहतवादापासून स्वातंत्र्य मिळवताना भारतीय स्वातंत्र्यसैनिकांनी भारतीय उपखंडाच्या इतिहासाचे जे परिशिलन केले त्यात १) छोट्या छोट्या स्वतंत्र राजवटींमुळे भारतीयांना जाचक अन्याय्य परकीय आक्रमणांना सातत्याने सामोरे जावे लागले २) छोट्या छोट्या सार्वभौम सत्ता सर्वसामान्य नागरीकांच्या प्रती जबाबदार राहण्या एवजी सातत्याने अंतर्गत आणि बाह्य संघर्षात घेरलेल्या राहतात ३) भारतीय उपखंडातील संस्कृतीत एक समानता आहे आणि आज भारतीय घटना जी स्वातंत्र्ये देते ती नेहमीच भारतीयांना अनुस्यूत/अभिप्रेत राहीलेली आहेत जसे की भारतात कुठेही येण्या जाण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यामुळे भारतीय उपमहाद्वीपाची जिथपर्यंत नैसर्गीक सिमा आहे म्हणजे उत्तरेस पर्वत रांगा आणि दक्षिणेस समुद्र तो सर्व भौगोलीक प्रदेश एकच एकसंघ देश असावा हि भारतास स्वातंत्र्य मिळतानापासूनचा विशीष्ट दृष्टीकोण राहीला आहे.
....१९६१ला मुक्त झालेल्या गोव्यात अचानक सगळीकडून देशभक्ती उफाळून यावी, ही अपेक्षाही चूक आहे ना..अन्य भारतासोबत एक शेअर्ड इतिहास असा फारसा नाही, त्यामुळे तेवढ्या प्रखर प्रमाणात राष्ट्राभिमान वगैरे गोष्टी ५४ वर्षांत अगदी सरसकट सगळ्यांमधे कशा काय निर्माण व्हाव्यात बरं?आपले उपरोक्त वाक्य सर्वाधिक आक्षेपार्ह आहे. १) पै ताईंनी पुर्ण रामायण सांगीतल्या नंतर रामाची सिता कोण म्हणावे ? गोवा राज्य अब्जावदीवर्षांपासून भारतीय उपखंडाचा अविभाज्य भाग असताना " ..अन्य भारतासोबत एक शेअर्ड इतिहास असा फारसा नाही," हे वाक्य अत्यंत अज्ञानमुलक आणि बेजबादार स्वरुपाचे आहे. पण पै ताईंनीच त्यांना सविस्तर माहिती देऊन त्यांचे अज्ञान दुर करणे अधिक सयूक्तीक ठरावे. २) आपले वाक्य १९४७ला मुक्त झालेल्या भारतात अचानक सगळीकडून देशभक्ती उफाळून यावी, ही अपेक्षाही चूक आहे ना.. असही लिहिल जाऊ शकेल किंवा कसे ? किंवा भारतात निजामासहीत असंख्य संस्थानांचे संस्थाने विलीन करुन घेतली गेली त्या सर्व संस्थानिकातील प्रजांनी अशाच प्रकारच्या वाक्य रचना अथवा विचार बाळगून पुन्हा एकदा भारताचे पुन्हा तुकडे तुकडे करण्याचा विचार करावयाचा काय ? ३) एक उदाहरण म्हणून गोव्याच्या मनोहर पर्रीकरांना संरक्षण मंत्री केलेले आहे त्यांच्यात देशभक्ती आहे का नाही हे तपासण्याची गरज आहे का असा प्रश्न आपल्या उपरोक्त वाक्यामुले पडू शकतो. (माझा मनोहर पर्रिकरांवर पूर्ण विश्वास आहे-केवळ तुमच्या बेजबादार विचारांमुळे कसे अनर्थ होऊ शकात या कडे लक्ष वेधतो आहे.) आपण जे लिहिले आहे त्यामुळे आपण समस्त गोवेकरांना बदनामीत आणि त्यांच्या बद्दल उर्वरीत भारतीयात अधिक गैरसमज निर्माण होऊन अधिक दुरावा निर्माण होऊ शकतो हे लक्षात घेऊन आपल्या विचारांचा आपण पुर्नविचार करावा हि नम्र विनंती आहे.
In reply to पिशी अबोली यांच्या प्रतिसादातील तार्कीक उणीव - भाग २ by माहितगार
In reply to पिशी अबोली यांच्या प्रतिसादातील तार्कीक उणीव - भाग २ by माहितगार
भारतीय उपमहाद्वीपाची जिथपर्यंत नैसर्गीक सिमा आहे म्हणजे उत्तरेस पर्वत रांगा आणि दक्षिणेस समुद्र तो सर्व भौगोलीक प्रदेश एकच एकसंघ देश असावा हि भारतास स्वातंत्र्य मिळतानापासूनचा विशीष्ट दृष्टीकोण राहीला आहे.कुणाचा? हा प्रश्न महत्वाचा आहे. गोवा पोर्तुगीज अंमलाखाली आला तेव्हा ही 'भारत' म्हणून आयडेंटिटी होती का? माझं उदाहरण अगदीच विचित्र आहे, पण दुसरं काही सुचत नाही म्हणून सांगते. एखाद्या मुलाला त्याचे आई-वडील काही ना काही कारणांसाठी त्याच्या जन्मापासून दूर ठेवतात. त्या मुलाला त्यांची नीटशी स्मृतीही नाही. आणि अचानक एका जाणत्या वयात त्याला त्याचे आई-वडील परत क्लेम करतात. त्या मुलाला आनंद तर अर्थात होईलच. पण जन्मापासून आई-वडिलांसोबत राहिलेल्या मुलांना जेवढी आपुलकी असते, तेवढी लग्गेच निर्माण होईल का? त्याला काही काळ तर जावा लागेलच.. गोवा मुक्तीसंग्रामातील अन्य भारतीयांचे योगदान इतिहास जाणणार्यांना नक्कीच माहीत आहे. पण सर्वसामान्य माणसाला इतिहासाचे सगळे पदर उलगडून पहायला वेळ असतो का? असो. पुढे १. ठीक आहे. तुमचे मत. २. पुन्हा एकदा, तुम्ही माझा प्रतिसाद वाचलात तर त्यात पहिलाच मुद्दा या गोष्टीबद्दल आहे. तुकडे वगैरे परिस्थिती कुठे हो, उलट मी तर आताच्या पिढीत हा द्वेष कमी कसा होत चाललाय हे लिहिलंय. असो, तर तुम्हाला माझ्या प्रतिसादात एवढं आक्षेपार्ह काय वाटलं ते मला खरंच अजूनही समजत नाहीये. तरीही, माझ्या वाक्यरचना, शब्दप्रयोगांमधून काही गैरसमज होण्यासारखी परिस्थिती असल्यास तसा करून घेऊ नये, ही विनंती.
In reply to 'इंडियन्स' हे कोट्स मधे by पिशी अबोली
....एखाद्या मुलाला त्याचे आई-वडील काही ना काही कारणांसाठी त्याच्या जन्मापासून दूर ठेवतात. त्या मुलाला त्यांची नीटशी स्मृतीही नाही. आणि अचानक एका जाणत्या वयात त्याला त्याचे आई-वडील परत क्लेम करतात. त्या मुलाला आनंद तर अर्थात होईलच. पण जन्मापासून आई-वडिलांसोबत राहिलेल्या मुलांना जेवढी आपुलकी असते, तेवढी लग्गेच निर्माण होईल का? त्याला काही काळ तर जावा लागेलच..उर्वरीत भारतही पारतंत्र्यात होता,- उर्वरीत भारत आणि गोव्याला स्वातंत्र्य मिळण्यात केवळ १४ वर्षांचे अंतर आहे- स्वातंत्र्य सैनिकांना पारतंत्र्यात असतानाही भारतीयत्वाची जाणीव झाली, आम्ही आमचा देश विसरलो आहोत असे स्वातंत्र्य सैनिकांनी म्हटले असते तर भारतीय उपमहाद्वीपास वसाहतवादातून कधिच स्वातंत्र्य मिळाले नसते. गोवा उर्वरीत भारतापेक्षा अधिककाळ वसाहतवादी देशाच्या पारतंत्र्यात राहीला असेल तर देशप्रेम अधिक जाणवावयास हवे कमी नाही.
In reply to पिशी अबोली यांच्या प्रतिसादातील तार्कीक उणीव - भाग २ by माहितगार
In reply to टोकाची भूमिका by राही
In reply to धन्यवाद राहीजी. मला इतकं by पिशी अबोली
In reply to टोकाची भूमिका by राही
In reply to देशभक्तीची ठेकेदारी by सुनील
In reply to हे माझ्यासाठी आहे का ? माझी by माहितगार
In reply to ठेकेदारी by सुनील
In reply to चला तर by राही
सिंधुदुर्गसुद्धा गोमंतकात विलीन करून गोव्याचे एक (सध्याच्या अगदीच इटुकल्या आकारापेक्षा) थोडे मोठे राज्य बनवता येईल. कुणी सांगावे?गोव्यात, महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्हा तसेच कर्नाटकातील कारवार आणि बेळगाव भाग मिळून एक 'विशाल गोमंतक' असे राज्य बनवावे, अशी कल्पना कुणीतरी (बहुधा बाळ ठाकरे यांनी) मांडली होतीच.
In reply to चला तर by राही
सिंधुदुर्गसुद्धा गोमंतकात विलीन करून गोव्याचे एक (सध्याच्या अगदीच इटुकल्या आकारापेक्षा) थोडे मोठे राज्य बनवता येईल. कुणी सांगावे?गोव्यात, महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्हा तसेच कर्नाटकातील कारवार आणि बेळगाव भाग मिळून एक 'विशाल गोमंतक' असे राज्य बनवावे, अशी कल्पना कुणीतरी (बहुधा बाळ ठाकरे यांनी) मांडली होतीच.
धन्यवाद