Skip to main content

संवादात्मक कार्यशाळा (फक्त पुणे)

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी मंगळवार, 15/12/2015 18:35 या दिवशी प्रकाशित केले.
खास नवीन आणि उदयोन्मुख लेखकांसाठी , नुक्कड सादर करीत आहे 'संवादात्मक कार्यशाळा !' मराठी साहित्य परिषद , पुणे , यांच्या संयुक्त विद्यमानाने , आपल्यातल्या लेखकासाठी! नाव नोंदणी - http://goo.gl/forms/sKCHbNZchh दिनांक - १९ डिसेंबर २०१५, वेळ सायं ६.३० ते ८ महाराष्ट्र साहित्य परिषद हॉल , टिळक रोड , पुणे (टीप : नाव नोंदणी आवश्यक आहे , हा उपक्रम केवळ पुण्यातील होतकरू लेखकांसाठी मर्यादित आहे. तुमच्या शहरात लवकरच येत आहोत!) कोणाला काही अधिक माहिती हवी असल्यास - संपर्क करा :- श्री. अक्षय वाटवे ९४२०२६०८०८

अहिराणीच्या निमित्ताने बोलींचे भवितव्य

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी मंगळवार, 15/12/2015 18:07 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे जगातील प्रत्येक कोपरा बोलीभाषेने व्यापलेला आहे. प्रत्येक कानाकोपर्‍यात ती बोलली जाते. मात्र यापैकी काही बोलीभाषा आज नामशेष झाल्या आहेत, तर काही बोलीभाषांचा विकास होऊन त्या आज प्रमाणभाषा झालेल्या दिसून येतात, हा बदल आपल्याला ज्ञातच आहे. आज व्यवहारात वापरली जाणारी हिन्दी भाषादेखील एकेकाळी केवळ बोलीभाषा म्हणूनच वापरली जात होती. परंतु आज तीच भाषा आपली राष्ट्रभाषा म्हणून मान्यता पावलेली दिसून येते.

मीना (पुस्तक परिचय)

लेखक आतिवास यांनी मंगळवार, 15/12/2015 16:03 या दिवशी प्रकाशित केले.
काबूलमध्ये रहात असताना तिथल्या स्त्रियांच्या स्थितीविषयी विश्वसनीय माहिती जाणून घेण्यासाठी एक उत्तम संकेतस्थळ मला सापडलं होतं: ते होतं www.rawa.org. ‘रावा’ हा शब्द ‘Revolutionary Association of Women of Afghanistan’ या संघटनेच्या इंग्रजी नावाच्या आद्याक्षरांना घेऊन बनवलेला शब्द. (स्थानिक भाषेतलं नाव आहे: Jamiat-E-Inqalabi Zanan-E-Afghanistan). या संकेतस्थळावर एक महत्त्वाचं वाक्य लक्ष वेधून घेत. “जर तुम्ही स्वातंत्र्यप्रेमी असाल, आणि मूलत्त्ववाद्यांच्या विरोधात असाल, तर तुम्ही ‘रावा’सोबत आहात!

सोबत ... : अंतीम भाग

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 15/12/2015 14:44 या दिवशी प्रकाशित केले.
थांब सुन्या.....! मी तुझ्याशी थोडं खोटं बोललोय ! मी तुला इथे वाघ बघायला नाही आणलय. इथे येण्याचं कारण काही वेगळं आहे. खरेतर मला कुणाचीतरी सोबत हवी होती कारण इथे एकट्याने यायची माझी हिंमत नव्हती, माझ्याकडे तेवढे धाडस नव्हते." सोबत भाग १ आता पुढे ... ****************** पक्या नरमाईच्या सुरात बोलला. तसा सुन्या थबकला.... "पॅक्स, आर यु क्रेझी? एकतर गेले दोन दिवस सॉरी दोन दिवस आणि एक रात्र मी तुझ्याबरोबर इथे सडतोय तो फडतुस वाघ बघण्यासाठी. साल्या काल शुक्रवार, २२ तारीख ना, बिप्सची नवीन मुव्ही रिलीज होणार होती. तुझ्यामुळे मी माझा फर्स्ट डे.

शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ

लेखक हेमंत लाटकर यांनी मंगळवार, 15/12/2015 12:01 या दिवशी प्रकाशित केले.
शिवाजी महाराजांनी स्वत:चा राज्याभिषेक जून 1674 मध्ये करून घेतला व मराठ्यांच्या स्वतंत्र आणि सार्वभौम राज्याची घोषणा केली. शिवाजी महाराजांची राज्याभिषेकाची कल्पना व्यापक व प्रभावी होती. त्यामुळे निर्वीकार पडलेल्या मराठी माणसाला चेतना मिळाली. याप्रसंगी शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापन केली. राज्यकारभाराची निरनिराळी कामे त्यांनी या मंत्र्यांकडे सोपवली. ही मंत्रीपदे वंशपरंपरागत न ठेवता, कर्तबगारीवर व व्यक्तीचे गुणदोष पाहूनच ठरवण्यात येत.

चांदणधुळ

लेखक पालीचा खंडोबा १ यांनी मंगळवार, 15/12/2015 11:08 या दिवशी प्रकाशित केले.
चांदणधुळ माळुनी केसात आजही तू तशीच दिसतेस सोडुनी आलो कळीला तरीही टवटवीत भासतेस ! उल्कापाताचे खडे आजही जपलेत कालचे कृष्णमेघ रूपेरी जाहलेत तशीच ओढ अजुनी आहे बरसण्याची शिशिरगोठल्या ओठी स्मित टेकविण्याची ! काळात हरवलेली सय पुनश्च मिलनाचे भय जाळीदार पिंपळपानापरी हृदयी कोरले पुन्हा आठवणींचे पुस्तक जोडले ! वळुनी जातानाची नजर हृदयी बंद आहे अत्तरकुपीपरी युगे लोटली अनेक साहवासाची उर्मी साठवली उरी ! फिरुनी आलीस तू सामोरी मनाची जाहाली भिंगरी देऊनी गेलीस बगल हलकेच पुन्हा तीच उरी शिरशिरी ! विजयकुमार................. 01 / 01 / 2009

विज्ञान लेखमाला : आवाहन

लेखक साहित्य संपादक यांनी मंगळवार, 15/12/2015 08:45 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, शशक स्पर्धा, श्री गणेश लेखमाला अशा यशस्वी उपक्रमांनंतर आम्ही घेऊन येत आहोत : विज्ञान लेखमाला. आधीच्या दोन उपक्रमांप्रमाणेच याही उपक्रमाला तुमच्या सहभागाशिवाय शोभा येणार नाही. तुमच्या भरघोस आणि उत्साही प्रतिसादाची आस धरून आज आम्ही ही घोषणा करत आहोत. जगभरातले शास्त्रज्ञ, भारतीय विज्ञान परंपरा, वहिवाटीपेक्षा वेगळ्या विज्ञान कक्षा, विज्ञानातल्या गंमतीजंमती अशा अनेक विविध विषयांवर आम्हाला लेखन अपेक्षित आहे.

पाच्चा ठोकळा

लेखक आनंद कांबीकर यांनी मंगळवार, 15/12/2015 00:08 या दिवशी प्रकाशित केले.
"ये आये, पाच्चा ठोकळा दिना मला" "लई किरकिर नगस करू. तुला कह्याला रे पाच्चा ठोकळा? चल गुमान्, तेवढ्यात कोथमिरिचि जुडी येईन" म्हणत मायनं, रागातच् त्याला पुढं खेचलं. तेव व्हरगाडत चालु लागला. पर त्याची नजर तिकडच हुती, म्हवरं परात मांडून बसलेल्या त्या खप्पड़ म्हताऱ्या कडं. पुढच्या माळणीजवळ माय वांगं निवडत बसली. तेव म्हताऱ्याकडच बघत हुता, टाचा उचकुन अन मान तानुन. माय वांगं पिशीत घिउन उठली अन कोथमिरीवाल्याकडं कोथमिर निवडु लागली. तेव हळुच माई जवळ येऊन हुभा ठाकला. मायणं कोथमीर पिशीत टाकली अन झंपरातल्या पाकिटातून पाच्चा ठोकळा काढला. तसा त्यानं हिसका दिला अन् ठोकळा घिउन पळत सुटला.

तुझी आठवण

लेखक माहीराज यांनी सोमवार, 14/12/2015 19:39 या दिवशी प्रकाशित केले.
आठवण ही का अशी जागवी मनाला प्रीत माझ्या या मनाची सांगु कुणाला ।। रात्र वेडी जागताना अंतरंग मोहरे पाहताना मी तुला चांदणे ही बावरे का असे भास होती वेड्या मनाला प्रीत माझ्या या मनाची सांगु कुणाला ।। रातराणीच्या फुलांचा घेऊनी सुगंध प्रीत वेडे पाखरू हे मनी झाले दंग नशा तुझ्या प्रेमाची ही आवडे मनाला प्रीत माझ्या या मनाची सांगु कुणाला ।। आठवण ही का अशी जागवी मनाला प्रीत माझ्या या मनाची सांगु कुणाला ।।
काव्यरस

वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा!

लेखक अज्ञात यांनी सोमवार, 14/12/2015 18:15 या दिवशी प्रकाशित केले.
अरुण म्हणायचे सगळे, पाळण्यातलं नाव 'श्रीकृष्ण' श्रीकृष्ण केशव केतकर. मी कॉलेजच्या शेवटच्या वर्षी असताना देवा घरी गेले. तसा जरी मोठा असलो तरी नव्हतोच!