Skip to main content

निकरवरी मैनाराणी

लेखक सुरवंट यांनी शुक्रवार, 25/12/2015 19:33 या दिवशी प्रकाशित केले.
वादळच जोराचे आले, की गाठी आपोआप ढिल्या झाल्या, माहित नाही खास, काय घडले विशेष! पण हाय!! निकर कड्यावरून घसरले, अन मैना सगळ्या फांद्यांवर दिसल्या. जितकी विद्वत्ता जास्त, तितक्या त्यांच्या मैना सप्तरंगी! त्यांनी एकच गिल्ला केला. त्याचा आवाज समुद्रापार गेला. ‘निकरवाहू वादळ कुठून आले? कसे आले? पाहू पाहू त्यावर खास संशोधन करू!’ हाती लेखण्या घेतल्या, आणि निकर उडवणाऱ्या वादळामागे मैना सावरत मूढ सगळ्या अमाप धावल्या. वादळाविरुद्ध एक जोरदार कम्प्लेन हवेतल्या हवेत ठोकून म्हणाले, ‘आता फार काम झाले! घेऊ या विश्रांती, स्वतःच्या कोशात!’ ......... .............. काही वीरांगणा कृतिशील! फार चळवळ्या!
काव्यरस

CTRL + C, CTRL + V

लेखक हर_हुन्नरी यांनी शुक्रवार, 25/12/2015 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
CTRL + C, CTRL + V कॉपी पेस्ट कॉपी पेस्ट कॉपी पेस्ट करत राहणाऱ्या आपल्या बोटांना , मनाला , शरीराला कॉपी पेस्ट कॉपी पेस्ट कॉपी पेस्ट ची वाळवी लागून बोटं आणि मन सडून -झाडून जाण्यापूर्वी जवळच्या किंवा लांबच्या समुद्र किनाऱ्यावर जावं अथांग समुद्र किनाऱ्यावर आपला तुकडा शोधून वाळू हातात घ्यावी आणि बांधायला घ्यावा वाळूचा किल्ला किल्ला छोटा की मोठा सहज ठरवावं , किंवा ठरवू ही नये होऊ द्यावा आपणहून बनला तर छोटा , बनला तर मोठा एकासारखा दुसरा बुरुज बनवता येतो का ते पाहावं इथे कॉपी पेस्ट तंत्रज्ञान काम करीत नाही आदिम व्हावं लागतं रेतीचे सूक्ष्म ओले कोरडे चिखलाळलेले कण बनून जावं लागतं खालून

साधना कालवश

लेखक दिवाकर कुलकर्णी यांनी शुक्रवार, 25/12/2015 16:25 या दिवशी प्रकाशित केले.
साधना कालवश १९६० -१९७० च्या दशकातली त्यावेळच्या तरुणाची धडकन साधना काळाच्या पडद्याआड गेली. १९६० ते ९४ च्या दरम्यान ३०हून अधिक सिनेमातून चमकलेली साधना आज आपल्यात नाही आहे. लव्ह इन सिमला ,एक मुसाफिर एक हसीना,हम दोनो ,वक्त,मेरा साया,वह कौन थी?,मेरे मेहबूब,असली नकली ,प्रेमपत्र, परख ,राजकुमार अशा अनेक गाजलेल्या सिनेमातून त्या वेळच्या बहुतेक आघाडीच्या नायका बरोबर ती चमकली होती . आॅड्रि हेपबर्न च्या धर्तीवर बेतलेला हेअर कट साधना कट म्हणून तरुणाईत एकदम फेमस झाला होता. अनेकाना आपली प्रेयसी साधना कट मध्ये बघणे,आवडे . आमच्या पिढीचं तारुण्य बहरवणार्या त्या मोहक अभिनेत्रीला अखेरचा सलाम !

अस्तित्व

लेखक मयुरMK यांनी शुक्रवार, 25/12/2015 13:35 या दिवशी प्रकाशित केले.
. अस्तितत्वता नसते जिथे या जगाची दूर-दूर....अशा निवांत निश्चल एकांती रम्य निर्मळशा सरिते काठी शांत-शांत ...
काव्यरस

मटार -कांदे परांठा

लेखक विवेकपटाईत यांनी शुक्रवार, 25/12/2015 11:20 या दिवशी प्रकाशित केले.
हिवाळा सुरु झाला कि मटारच (वाटाणे)ची भाजी मोठ्याप्रमाणावर बाजारात येते. दिल्लीच्या ढाब्यांमध्ये सर्वत्र मटार-पनीर, आलू-मटार, आलू-मटार-गोभी ची भाजी दिसू लागते. गेल्या रविवारी भाजी स्वस्त: मिळत होती म्हणून चक्क ५ किलो मटार विकत घेतले. दिल्लीत सध्या थंडी असल्यामुळे निवडून ठेवल्यास ७-८ दिवस तरी खराब होण्याची शक्यता नाही. आठवडाभर मटार सोहळा साजरा केला. मटारच्या वरील सर्व भाज्या डब्यात नेल्या. आज सकाळी परांठा खाण्याची इच्छा झाली. साहजिकच आहे, सौने काही वेगळे म्हणून कांदे घालून मटार परांठा करायचा ठरविला. त्याचीच कृती खाली देत आहे.

इंद्रधनुष्याचा पाठलाग.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 25/12/2015 08:30 या दिवशी प्रकाशित केले.
. “माझा प्रयत्नावर विश्वास आहे.जरी पकडू शकले नाही तरी इंद्रधनुष्याचा पाठलाग करण्यावर माझा विश्वास आहे.” वसुंधरा नाडकर्णी एक चांगली पत्रकार आहे हे मला माहित होतं.एका स्थानिक वर्तमानात ती रिपोर्टर म्हणून सुद्धा काम करायची.अलीकडे ती पर्यावरणावर अभ्यास करीत आहे.पर्यावरण हा सध्या बहूतचर्चीत विषय झाला आहे.काही श्रीमंत देश स्वतःच्या जरूरी साठी आणि उर्जा मिळवण्यासाठी पृथ्वीवर भरपूर प्रदुषण करून आपली उर्जीतावस्था करून घेऊन श्रीमंत झाले आहेत

!! मद्य !!

लेखक पालीचा खंडोबा १ यांनी गुरुवार, 24/12/2015 13:22 या दिवशी प्रकाशित केले.
या मदिरालयात सगळेच धुंद जाळुनी स्वत:स दिवे जाहले मंद पसरला सर्वत्र अस्पृश्य गंध रिचवुनी चषक, उरले रक्तांध !! किती बुडवावे क्लेष चषकात? मद्याने मेंदू बधीर कळ हृदयात जमतात इथे दुख: विसरण्या उद्याचे कोणी काही म्हणा, साम्राज्य आहे मद्याचे !! खर्चुनी पदर, स्वत:स विकतात हाय! पिळविटणा-या संगीतात रिझतात स्वत:ला फ़सवुनी, प्रतारणा करतील अम्रुताही लाजवेल हे विष, पिऊनी मरतील !! काजव्याची हि लढाई, करतील प्रकाशाशी स्वत:स पेटवुनी, ठेवतील कोळश्याच्या राशी ह्यांचे दु:ख कुणा का ऊमगेना ? ह्या मद्यमेळ्यात का मी उभा मज समजेना...............!! विजयकुमार.........

भय वाटते

लेखक मनमेघ यांनी गुरुवार, 24/12/2015 12:29 या दिवशी प्रकाशित केले.
ही बंधने आता तुटायाचे मला भय वाटते, ही बंधने आता तुटायाचे मला भय वाटते! क्षण गुंतुनी जातोय जो पुढच्या क्षणी निःशब्दसा त्याने युगांनाही लुटायाचे मला भय वाटते! बंदिस्त माझे जाहले आहेत स्वर काचांतुनी मी गाउ जाता त्या फुटायाचे मला भय वाटते!! हा दाटला काळोख माझ्या भोवती चोहीकडे धमन्यातला पारा सुटायाचे मला भय वाटते!! आहे वसंताचा ऋतू अजुनी कितीतरी दूरसा अन पाकळ्या माझ्या नटायाचे मला भय वाटते!! -मनमेघ टीप- ही गझल नाही. गझल सारखी वाटत असली तरीही. तेव्हा तंत्राचा मुद्दा बाजूला ठेवून वाचावीत ही नम्र विनंती.
काव्यरस