डिंकाचे लाडू- हिवाळा स्पेशल
साहित्यः
खारीक पावडर- २ वाट्या
अक्रोड, काजू, बदाम, पिस्ता पावडर- १.५ वाटी
डिंक- १ वाटी
पिठीसाखर- २ वाट्या
तूप- ३ वाट्या
कृती
अर्धा डिंक तूपामध्ये तळून घ्या व उरलेला अर्धा कच्चा बारीक करून घ्या. सर्व वस्तू एकत्र करून लागेल तसे वितळवलेले तूप घालून लाडू वळून घ्या. लाडू वळताना फुलवलेला डिंक हाताने चुरला नाही तरी चालेल. खाताना मस्त क्रंची लागतो. ह्या पाककृती मधे काहीही भाजून घ्यायचे नसल्याने लाडू अतिशय पटकन होतात. मला थोडं कमी गोड आवडतं, म्हणून मी पिठीसाखर फक्त २ वाट्या घेतली. तुम्ही अजून अर्धी वाटी टाकू शकता. वरील प्रमाणात मध्यम आकाराचे १८-२० लाडू सहज होतात.
मिसळपाव
.
साहित्य: