साहित्यः
खारीक पावडर- २ वाट्या
अक्रोड, काजू, बदाम, पिस्ता पावडर- १.५ वाटी
डिंक- १ वाटी
पिठीसाखर- २ वाट्या
तूप- ३ वाट्या
कृती
अर्धा डिंक तूपामध्ये तळून घ्या व उरलेला अर्धा कच्चा बारीक करून घ्या. सर्व वस्तू एकत्र करून लागेल तसे वितळवलेले तूप घालून लाडू वळून घ्या. लाडू वळताना फुलवलेला डिंक हाताने चुरला नाही तरी चालेल. खाताना मस्त क्रंची लागतो. ह्या पाककृती मधे काहीही भाजून घ्यायचे नसल्याने लाडू अतिशय पटकन होतात. मला थोडं कमी गोड आवडतं, म्हणून मी पिठीसाखर फक्त २ वाट्या घेतली. तुम्ही अजून अर्धी वाटी टाकू शकता. वरील प्रमाणात मध्यम आकाराचे १८-२० लाडू सहज होतात. कालच केले होते :), पण जंग जंग पछाडूनही फोटो टाकता आले नाहीत.. :(
तस्मात मिपावरील मान्यवरांनी बनवून बघावेत व फोटो टाकावेत.. :D
वाचने
6988
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
पाकृ छानच आहे.फोटो का टाकता
अगं
In reply to पाकृ छानच आहे.फोटो का टाकता by अजया
अनाहितात मधुराचा धागा बघ
In reply to अगं by अदि
धन्स ताई,
In reply to अनाहितात मधुराचा धागा बघ by अजया
तळलेला डिंक खाताना
हो दिपक उरणकर,
In reply to तळलेला डिंक खाताना by दिपक.कुवेत
आँ तु काकाच्या बा़जूला
In reply to हो दिपक उरणकर, by अदि
नक्की, नक्की
In reply to आँ तु काकाच्या बा़जूला by दिपक.कुवेत
दोन अठवड्यांपूर्वी हे लाडू
+१
In reply to दोन अठवड्यांपूर्वी हे लाडू by रेवती