'लिफ्ट'
जाम पाऊस पडत होता, रात्रीचे ११वाजत आलेले, एक रिक्षा थांबायला तयार नाही, शंभर टक्के भीजलेलो, तेव्हढ्यात एक स्कूटरवाले काका थांबले, हेल्मेटवरची फुटलेली काच वर करत 'कुठे जायचय' ची खूण केली, मी म्हणालो... 'डेक्कन' मागे बसायची खूण केली, मी पटकन जाऊन सवई प्रमाणे उगाच सीट हातानी झटकुन बसलो, अर्धा तास भिजल्यानी थंडीने कुडकूडत होतो, त्यात लांब पाय टाकून स्कूटर वर 'आई आई ग्ग'करत कसाबसा बसलो... क्रैंम्प आलेला बेक्कार! काका मागे न वळताच, काय झालं रे?ची 'खुण करत' तोच हात झटकनी गीयरवर टाकून जोरात पिकअप घेतला, मला काहीच उत्तर देता येई ना, ओठ-दात चावत अभाळाकडे पाहत...