'लिफ्ट'
जाम पाऊस पडत होता, रात्रीचे ११वाजत आलेले, एक रिक्षा थांबायला तयार नाही, शंभर टक्के भीजलेलो, तेव्हढ्यात एक स्कूटरवाले काका थांबले, हेल्मेटवरची फुटलेली काच वर करत 'कुठे जायचय' ची खूण केली, मी म्हणालो... 'डेक्कन' मागे बसायची खूण केली, मी पटकन जाऊन सवई प्रमाणे उगाच सीट हातानी झटकुन बसलो, अर्धा तास भिजल्यानी थंडीने कुडकूडत होतो, त्यात लांब पाय टाकून स्कूटर वर 'आई आई ग्ग'करत कसाबसा बसलो... क्रैंम्प आलेला बेक्कार! काका मागे न वळताच, काय झालं रे?ची 'खुण करत' तोच हात झटकनी गीयरवर टाकून जोरात पिकअप घेतला, मला काहीच उत्तर देता येई ना, ओठ-दात चावत अभाळाकडे पाहत... पाय तसाच सरळ ठेवत बसलेलो अपंगा सारखा, मधले खड्डे वगैरे न चुकवत काका भरधाव निघाले. रस्त्यावर कोणी गाडी चालवताना दीसे ना मला, सगळे झाडांखाली, कोणी दुकानाच्या आडोशी, जिथे पाऊस कमी लागेल असे थांबलेले.
शिवाजी नगर आले, सिग्नल वगैरे बंदच होते, तिथे एक मझ्यासारखाच मुलगा थांबलेला, त्याच्या समोर जाऊन स्कूटर थांबवली, मी लगेच उतरलो, अखडलेला पाय झटकत, हे सगळे चालू होते तेव्हा त्या मुलाकडे पाहत काका तशीच 'मागे बसायची खुण' करत गीयर टाकायच्या तयारीत!
बरं, त्यांची स्कूटर पण काही मोठी नव्हती, चेतक किंवा वेस्पा कश्या बऱ्यापैकी मोठ्या असतात, त्यांची होती 'प्रिया', पण ते होते अडदांड! मीच कसाबसा मावलेलो त्यात आता ट्रिपल सीट म्हणजे, मी म्हणालो 'काका, तुम्ही दोघे निघा... डेक्कन जवळ आलेच आहे, मी जाईन चालत' हे सगळे त्यांना ऐकू आलं नसेल बहुतेक मला परत 'मागे बसायची खुण' करत गीयर बदलायला परत सज्ज!
मी गपगुमान जागा अड्जस्ट करत कसाबसा बसलो, तो मुलगा मध्ये आणि मी स्कूटरच्या मागच्या स्टेपनीला न बघताच घट्ट पकडून न पडण्याच्या प्रयत्नात! पावसानी अजुनच जोर पकडलेला...अक्षरशहा काही दिसत नव्हतं, इतका पाऊस! कधी एकदा डेक्कन येतय आणि मी उतरतोय असं झालेलं.
गुडलक चौका पाशी आल्यावर मी म्हणालो 'काका थांबवा, इथे उतरतो मी', स्कूटर काय थांबेना! मग त्या मुलानी त्यांच्या खांद्यावर जरा हात लावत सेम मी जे बोललो तेच बोलला, स्कूटर थांबली. गुडलक ओलांडून आम्ही ऑलमोस्ट गरवारे ब्रिजपलीकडे आलेलो.
दोघे उतरलो, मग ते काका पण उतरले. हेल्मेट काढलं आमच्या कडे हसत हसत बघत स्वतःच्या काना आणि तोंडाकडे बोट दाखवत दुसऱ्या हाताचा अंगठा हलवत परत बसले स्कूटरवर, सिग्नलला यू टर्न मारून गायब!
आम्हाला काही बोलायचं सुचलच नाही, तो मुलगा त्याच्या वाटेला आणि मी माझ्या वाटेला लागलो.
त्यारात्री नंतर मी कोणाच व्यक्तीला 'लिफ्ट'साठी नाकारले नाही.
#सशुश्रीके
#सशुश्रीके
वाचने
7664
प्रतिक्रिया
50
मिसळपाव
प्रतिक्रिया
काय छान लिहलय वो ?
चला या मुक्तपिठीय लिखाणाला
In reply to काय छान लिहलय वो ? by भाऊंचे भाऊ
खल्लास !!
मस्तच
छान
मस्त
मस्त!! धन्यवाद!!
मस्त लिहिलंय पण शेवट काय कळला
छान लिहिलंय!
वा!
मस्त ...
ओह्ह्ह
झक्कास
चांगलचं आहे की मग. चांगल्या
In reply to झक्कास by नाखु
मस्त कथा
मस्तच...
मस्त
छान लिहिलय .
छान लेखन.
In reply to छान लिहिलय . by सिरुसेरि
वपुंची कथा
In reply to छान लेखन. by मोदक
मस्त.
वाह
झक्कास!
..
मस्त!
हमारा बजाज :)
एक शंका
मुकबधिर आहेत म्हणून परवाना
In reply to एक शंका by मराठी कथालेखक
असू शकेल पण तरी मुसळधार
In reply to मुकबधिर आहेत म्हणून परवाना by मोदक
तसेही अनोळखी माणसाला लिफ्ट
In reply to असू शकेल पण तरी मुसळधार by मराठी कथालेखक
हेच लिहायला आलो होतो. हाच
In reply to तसेही अनोळखी माणसाला लिफ्ट by मोदक
छान
हो. मिळते. परसेंटेज पाहून.
In reply to छान by कपिलमुनी
मस्त
हा लेख मिसला होता. आवडला.
मागील वर्षी संध्याकाळी ओळखीची
In reply to हा लेख मिसला होता. आवडला. by रेवती
लोल
In reply to मागील वर्षी संध्याकाळी ओळखीची by रेवती
_/\_
In reply to मागील वर्षी संध्याकाळी ओळखीची by रेवती
गुनाह हैं
In reply to मागील वर्षी संध्याकाळी ओळखीची by रेवती
(No subject)
In reply to गुनाह हैं by श्रीरंग_जोशी
चांगला लेख. बाकी मुकबधिर
पी,एम.पी.एम.एल. वाले यमदुत
In reply to चांगला लेख. बाकी मुकबधिर by कॅप्टन जॅक स्पॅरो
=))
लेख आवडला :)
पण काकांना कळाले कसे की
हे घ्या
In reply to पण काकांना कळाले कसे की by गणामास्तर
पण काकांना तर ऐकू येत नव्हते
In reply to हे घ्या by नाखु
लीप रीडींग
In reply to पण काकांना तर ऐकू येत नव्हते by गणामास्तर
डेक्कन म्हणतांना ओठ हलत नाहीत
In reply to लीप रीडींग by नाखु
सत्कार