Skip to main content

नजरेतच सारे..

लेखक समयांत यांनी शुक्रवार, 01/12/2017 14:34 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या डोळ्यांत पाहिले असता कसले नाते समोर कधीच आले नाही. तुझी पापणी, आणि त्यावरचे रूंद लव झोक देऊन उघडझाप करतात, तेव्हा माझाही श्वास त्याच लयीत धपापायला लागतो. तुझे तुझ्या भावनांचे डोळ्यांतून व्यक्त होतांनाचे प्रमाण केव्हाच कमी होत नाही. कितीतरी क्षणांना काबीज करणारे, कितीतरी क्षणांमध्ये ओघळून जात असलेले तुझे डोळे मला हलकेच जपून ठेवायचे आहेत. तुझी डोळ्यांतली न हरवणारी चमक मला कुठेतरी नक्कीच हरवून जाते. माझ्याच नजरेत तुझी नजर एकत्र मिळते तेव्हाच का हे सारे घडत असते खास..

||हुच्चभ्रूंची कैसी लक्षणे ||

लेखक अनन्त्_यात्री यांनी शुक्रवार, 01/12/2017 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
हुच्चभ्रूंचे कैसे बोलणे | हुच्चभ्रूंचे कैसे चालणे समानांशीच सलगी करणे | कैसे असे ।। दुर्बोध वाङमयाचे आधारू | क्लिष्ट व्होकॅबचे भांडारू। चोखंदळांचे महामेरू | चिवित्रान्न भोगी || उठपटांग ज्ञानराशी | उदंड असती जयांपाशी | गुगलपरिपुष्ट आयक्यूशी । तुळणा कैची ।। यांसी गमे जे रोचक | त्यावरी कमेंटती टंग-इन-चीक शष्प न कळोनि निचभ्रू लोक | वाचनमात्र राहती || हुच्चभ्रू तितुके मिळवावे । नीचभ्रू अवघे इग्नोरावे । समतोलत्वाचे देखावे | परी करावे चातुर्ये ।। अता नीचभ्रूपणाचा त्याग । करोनि साधावा सुयोग।। विदग्धतेची लगबग । येरू म्हणतो करावी ||
काव्यरस

नेमका प्रॉब्लेम काय असतो काही लोकांचा

लेखक आशु जोग यांनी शुक्रवार, 01/12/2017 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळीवर अनेकदा उत्तम चर्चा सुरु असतात. त्यातून खूप चांगली माहिती मिळते. कमेंटमधूनही विषयाचे नवे नवे पैलू उलगडले जातात. म्हणूनच हे संस्थळ मराठी इंटरनेट विश्वात आपले वेगळेपण टिकवून आहे. पण ते हे बलस्थान राखलेही पाहीजे. नवीन धागा आला की धाग्याच्या अगदी अंगणात काही जण घाण करून ठेवतात. "मी धाग्याच्या दारात पहिली जागा पटकावली आणि घाण केली" असे वर अभिमानाने सांगतात. काही जण तर चर्चा विषय कोणताही असूद्या, " मी पॉपकॉर्न घेऊन बसलो आहे" असे लिहीतात. मी ग्यारंटीड सांगतो. पुन्हा पुन्हा पॉपकॉर्न घेऊन बसल्याने आरोग्य(मानसिक) बिघडणारच आणि पुन्हा ते धाग्याच्या अंगणात घाण करणारच.

|| गीताबोध ||

लेखक वैभवदातार यांनी शुक्रवार, 01/12/2017 11:09 या दिवशी प्रकाशित केले.
संपूर्ण जगाला जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणार्या गीतेतील अठरा अध्यायांचे सार अठरा ओव्यांमध्ये मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. ज्या श्रीकृष्ण भगवंतांनी माझ्याकडून हा गीताबोध लिहून घेतला त्यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी मी १९ वी ओवी लिहिली आहे.

सफर ग्रीसची: भाग १३ – अक्रोपोलिस

लेखक निशाचर यांनी गुरुवार, 30/11/2017 00:15 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ९ - अथेन्समधील पहिला दिवस भाग १० - प्राचीन तंत्रज्ञान प्रदर्शन आणि अक्रोपोलिस संग्रहालय भाग ११ - गूढरम्य डेल्फी १ भाग १२ - गूढरम्य डेल्फी २ प्राचीन कोरिंथच्या भागात लिहिल्याप्रमाणे अक्रोपोलिस म्हणजे खरंतर उंचावर बांधलेली गढी किंवा नगर. त्याअर्थाने अथेन्सचं अक्रोपोलिस एकमेव नसलं तरीही अक्रोपोलिस म्हटलं की डोळ्यांसमोर येतं ते अथेन्सचं अक्रोपोलिस आणि तिथलं पार्थेनॉन. अथेन्समध्ये फिरत असताना ते आपल्याला कायम खुणावत राहतं आणि अथेन्सच्या गतवैभवाची सतत आठवण करून देत असतं.

उदासगाणी

लेखक समयांत यांनी बुधवार, 29/11/2017 20:02 या दिवशी प्रकाशित केले.
चार महिने या खोलीत मी राहतो आहे, तितक्या रात्री मी इथे जागवल्या आहेत. आज उद्याची शेवटची रात्र असणार आहे. काहीही धड हाती न लागता इथून मी निघणार आहे, तरी पण, हा ‘पण’ जमा केलेल्या इथल्या आठवणींना माझ्या मनात उभा करतो आहे. मला माझं गवसण्याच्या अडनिड्या प्रयत्नात ही खोली आता एक भाग झाली आहे. कित्येक गाणी इथे मी ऐकली असतील, ठराविक गाण्यांच्या रिंगणात रात्री गेल्या खऱ्या, त्यातून मला उदास गाण्यांचेच वेड लागले आणि मग त्या जोडीला पैसे कमवायला काही कामे मिळवता येतात का, त्यासाठी कित्येक गोष्टींना नेटवर जोखून पाहिले असेल. सप्टेंबरच्या परीक्षेचा पास निकाल इथेच पाहिला.

मनोविकारशास्त्र(psychiatry)--आधुनिक वैद्यकशास्त्रातील एक मिथक!!

लेखक सिंथेटिक जिनियस यांनी बुधवार, 29/11/2017 18:09 या दिवशी प्रकाशित केले.
साधारणतः २००६ साली मी कॉलेजमधून पास आऊट झाल्यावर नोकरीसाठी प्रयत्न करु लागलो.इंटरव्ह्युसाठी लांब ठीकाणी जायचे ,तिथे जाण्यासाठी तयारी करायची ,इंटरव्युला सामोरे जायचे असा प्रकार सुरु होता.इंटरव्युला जाताना सुर्वातीला मजा वाटायची नंतर त्याचे दडपण यायला सुरवात झाली.

न्याय झाला, पण...!

लेखक अँड. हरिदास उंबरकर यांनी बुधवार, 29/11/2017 16:39 या दिवशी प्रकाशित केले.
न्याय झाला, पण..! मानवी क्रौर्याची परिसमा ओलांडणाऱ्या कोपर्डी बलात्कार आणि खून प्रकरणातील तिन्ही दोषींना आज न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. कोपर्डी घटनेतील घृणास्पद विकृती आणि विक्षिप्तपणा बघितला तर या प्रकरणात फाशीशिवाय दुसरी शिक्षा योग्य नव्हती. अत्यंत निर्घृणपणे पीडित तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. कोपर्डी अत्याचार प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला. कोपर्डीतील पिढीतला न्याय मिळावा यासाठी लाखो करोडो जनसंख्येचे महामोर्चे निघाले. दोषींना फासावर लटकविण्याची मागणी सर्व स्तरातून करण्यात आली.

आप्पा

लेखक चुकलामाकला यांनी बुधवार, 29/11/2017 14:42 या दिवशी प्रकाशित केले.
हुश्श करीत सगळ्यांनी एकदाची आप्पांची तिरडी खाली ठेवली. बबन्या लाकडं रचायला लागला. गावात धड रास्ता नव्हता. एवढ्या लांब कुणाकुणाच्या परड्यातून, कुणाच्या गडग्यावरून तिरडीसकट चढउतार केल्याने सगळेच वैतागले होते. खरंतर बाळ्याच्या वावरातून आणलं असतं तर एवढा लांबचा पल्ला पडला नसता. पण सांगणार कोण ? बापूची जीभ चांगलीच वळवळत होती. "तरी बरा, आप्पा वजनानं हलको व्हतो. भाऊ तू आसतस तर आमचा काय खरा नव्हता." अवाढव्य आकाराच्या भाऊकडे बघत बापू बोलला आणि सगळे चेकाळले. मग कुणाकुणाच्या मयताच्या गजाली चालू झाल्या. बबन्या मात्र गपगुमान लाकडं रचत होता.

शेजाऱ्याचा डामाडुमा - हायो धुआ सलाम - मालदीव भाग २

लेखक अनिंद्य यांनी बुधवार, 29/11/2017 13:46 या दिवशी प्रकाशित केले.
या आधीचा भाग येथे वाचता येईल : http://www.misalpav.com/node/41427 भारताच्या दक्षिण-पश्चिम दिशेला श्रीलंकेजवळ ११९० मोजलेल्या आणि बाकी काही उथळ आणि आकाराने फारच लहान असल्यामुळे मोजता न येऊ शकणाऱ्या अश्या काही प्रवाळ (कोरल) बेटांचा समूह म्हणजे मालदीव हा आपला शेजारी देश. अलौकिक निसर्गसौंदर्याचे दान भरभरून मिळालेला.