Skip to main content

आणखी अपहरणे

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 16/03/2018 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
'ती'ही त्याचा फुटबॉल करते कधी कधी किंवा बर्‍ञाचदाही, पण अपहरणांना, 'ती'च्या तर्‍हा अधिक कधी जन्माला येण्यापुर्वीच अपहरण झालेले असते आलीच तर 'ती' हा शब्दच अपहरण करतो पहिले 'ती' चे अपहरण करण्याची सवय आधीच्या 'ती'लाही सोडवत नाही काही अपहरणांची सोय 'ती'च्या रूप रंगाने करुन ठेवली असते 'ती'ने आधी निवडलेल्या गुणसूत्रांमुळे 'ती'च्यातील 'ती'ला 'ती'च्याशी स्पर्धा करण्याच्या इच्छेमुळे 'ती'ने बाळगलेल्या न्युनगंडामूळे आणि त्यांच्या अंहगंडामुळे 'ती'च्यातील मालमत्तेच्या लालसेने कि कथित ममतेच्या स्वार्थाने, कि.. त्यांच्यातील मार्केटच्या लालसेने कधी त्यांच्यातील असुरक्षीततेने शुचिते

मा.का.

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शुक्रवार, 16/03/2018 13:10 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire स्थळ : श्रीनगर येथील गफार खान यांचे फार्म हाऊस ऋतू : थंडीचा साल : १९६० पोस्टकार्डाचे दिवस होते. पहिले पोस्टकार्ड आले ते घाटीवरुन. त्यावर एका डोंगराचे सुंदर चित्र होते. पूर्वी अशा प्रकारची पोस्टकार्ड पाठविण्याची पद्धत होती हे तुम्हाला आठवत असेल. कार्डावर एकच ओळ सुवाच्च अक्षरात लिहिली होती ‘‘मला वाटतं तुम्हाला हे चित्र आवडेल म्हणून पाठवत आहे.

अनवट किल्ले २९: राजदेहेर उर्फ ढेरी ( Rajdeher, Dheri )

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 16/03/2018 11:10 या दिवशी प्रकाशित केले.
जळगाव जिल्हा हा काही डोंगरी किल्ल्यांसाठी प्रसिध्द नाही. पण या जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवर अजिंठा रांग धावते. या रांगेच्या दक्षिणेला औरंगाबाद जिल्हा आहे. या रांगेत अंतुर, लोंझा, सुतोंडा, जंजाळा, वेताळवाडी असे डोंगरी गड आहेत. पुढे यांची माहिती आपण घेणारच आहोत. पण आज एक छोट्याशा पण निसर्गसंपन्न अश्या डोंगरी किल्ल्याची सैर करायची आहे. चाळीसगाव तालुक्यात चाळीसगावच्या आग्नेयेला असलेला राजदेहेर हा गड आपली वाट पहातोय. चला तर मग. नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमटोकाशी अजिंठा-सातमाळा या अतिशय महत्वाच्या आणि अनेक दुर्गम गड असणार्‍या रांगेची सुरवात होते.

अपहरण

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 16/03/2018 08:10 या दिवशी प्रकाशित केले.
सूत्रांनी गुणांच्या कट काय केले नी बंदीगृहांच्या प्रवासास सुरवात काय झाली स्वतःचेच अपहरण करण्याची दिवा स्वप्ने पहात सतत अपहरणातूनच तर पुढे सरकतोय . अपहरणकर्ते फक्त बदलत जातात अनेकदा अनुमती शिवाय , अनेकदा हातातन निसटणार्‍या अनुमतीने अपहरणांच्या घटनांचे हे आत्मचरीत्र अद्याप बाकी आहे, वाढवेन म्हणतोय उसंत मिळेल तसे तसे नव नव्या अपहरणकर्त्यांची तेवढीच सोय जुन्या अपहरणकर्त्यांना जरासा दिलासा प्रेर्ना

ग्रामीण निवासस्थाने- घरे

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी गुरुवार, 15/03/2018 17:21 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे बागलाण हा एकेकाळी चार जिल्हे आपल्या पोटात घेणारा प्रंचड प्रांत होता. नाशिक जिल्ह्याचा काही भाग, धुळे, जळगाव, नंदुरबार, आजच्या गुजराथच्या ताब्यात असलेला डांगचा काही भाग अशा या मोठ्या प्रांताला बागलाण म्हटलं जायचं. बागूल राजाची राजवट असलेला तो बागलाण प्रांत. आता हा प्रांत एका तालुक्यापुरता मर्यादित झाला. आजच्या बागलाण तालुक्याचे क्षेत्रफळ केवळ 1616.2 चौ. किमी. असून आताच्या बागलाण तालुक्यात एकूण फक्‍त एकशे सहासष्ट गावे आहेत.

पृथ्वी (Discussion on characteristics, properties and classification of solids)

लेखक अनिकेत कवठेकर यांनी गुरुवार, 15/03/2018 14:51 या दिवशी प्रकाशित केले.
(प्रशस्तपादभाष्याच्या ४थ्या धड्यातील पृथ्वी किंवा स्थायूंचे गुणधर्म, प्रकार, वागण्याच्या तऱ्हा व उपयोग या संबंधीची माहिती या धड‌यात आहे. हे श्लोक ३ऱ्या - ४थ्या शतकातले असून तेव्हाची भारतीयांमध्ये वापरात असलेली स्थायूद्रव्यांच्या अभ्यासाची पद्धत दर्शवतात. काही गोष्टी किंवा संकल्पना पटणारही नाहीत पण त्यासाठी पूर्णच अभ्यासाची पद्धत नाकारू नये. जे जे प्रत्ययास येईल तेवढेच मानावे.

पुणे ते लेह (भाग ११ लेह - खारदूंग ला - हुंडर)

लेखक अभिजीत अवलिया यांनी गुरुवार, 15/03/2018 11:20 या दिवशी प्रकाशित केले.
०४ सप्टेंबर ###################################################################################### 'मन चिंती ते वैरी ना चिंती'. काल रात्री परत एकदा फोर्ड कस्टमर केअरशी संपर्क केला. त्यांनी आश्वस्त केले होते की 'क्लच प्लेट्स खराब झालेल्या नसणार.' पण तरीही आपण उंचावर गेलो आणि काही झाले तर? शंका हजार. सकाळी ५ च्या आधीच उठलो. 'आपण भाड्याची गाडी घेऊन 'खारदूंग ला' ला जाणार आहोत'. मी निर्णय जाहीर केला. ५:१५ ला टॅक्सी स्टॅन्ड गाठले. तिथे त्सरींग नावाचे एक टॅक्सिचालक भेटले. त्यांची गाडी ठरवली. इथे self driven भाड्याची गाडी मिळत नाही.

यारहो ...

लेखक विशाल कुलकर्णी यांनी गुरुवार, 15/03/2018 09:35 या दिवशी प्रकाशित केले.
दुष्मनांचा जोर आहे वाढलेला यारहो जीव माझा आरशावर भाळलेला यारहो बोर जिथल्या गावची तिथलीच बाभळ अंगणी संग काट्यांचा मलाही भावलेला यारहो पिंड कुठल्या वासनांचा राहिला मागे इथे? कावळ्यांनी दंभ माझा टाळलेला यारहो ती म्हणाली सोड तू जमणार नाही आपले मी दुरावा मस्तकावर माळलेला यारहो कोण तो वेडा भिकारी रोज हाका मारतो प्राक्तनाने आरसा मज दावलेला यारहो एकदा केसात वेडे वीज तू माळून बघ बोल मग श्रृंगार मीही टाळलेला यारहो ! हंस कुठला? कोण कागा? वाद भलते वाढले मी पुरावा सुज्ञतेचा जाळलेला यारहो एकट्याने झुंजताना कैफ चढतो आगळा दोर परतीचा तसाही कापलेला यारहो © विशाल वि. कुलकर्णी
काव्यरस

माझे अपहरण

लेखक शिव कन्या यांनी गुरुवार, 15/03/2018 06:30 या दिवशी प्रकाशित केले.
माझे अपहरण ... मी पोते, सुतळी, दाभण घेऊन तयार आहे.. मी वाट पहात, दबा धरून बसलेय. मला माझेच अपहरण करायचे आहे.. कुत्रा माग काढणार नाही, भिकारी चुकून माझी एखादी खुण लक्षात ठेवणार नाही, गाड्यावरचा भाजीवाला ओळख दाखवणार नाही, शाळेत जाणारे पोर मला बघून हसणार नाही, नाक्यावरचा फुटकळ तरुण मला बघून, न बघितल्यासारखा करणार नाही, कुणी रिक्षावाला माझ्या अगदी जवळून रिक्षा नेणार नाही, .......

आठवणींचा कप्पा म्हणजे...

लेखक सत्यजित... यांनी गुरुवार, 15/03/2018 03:35 या दिवशी प्रकाशित केले.
पानगळीचा मौसम येतो,उगाच होते सळ-सळ नुसती... आठवणींचा कप्पा म्हणजे,जुनी-जुनेरी अडगळ नुसती! काळ गतीचा वेडा असतो,क्षणात घेतो वळणे नवखी... वाट कुणाची पाहत नाही,जमात त्याची भटकळ नुसती!