Skip to main content

शंभर कौरवांची नावे.

लेखक अरविंद कोल्हटकर यांनी बुधवार, 20/06/2018 23:26 या दिवशी प्रकाशित केले.
कौरव १०० आणि पांडव ५ हे आपण सर्वजण जाणतो. ह्या सन्दर्भामध्ये युधिष्ठिराच्या तोंडचा हा श्लोक प्रसिद्ध आहे:
आपत्सु विग्रहे प्राप्ते वयं पञ्च च ते शतम् । परैस्तु विग्रहे प्राप्ते वयं पञ्चाधिकं शतम् ॥
(आमच्याआमच्यात संघर्ष असेल तेव्हा आम्ही पाच आणि ते शंभर. पण कोणा परक्याशी संघर्ष असेल तेव्हा आम्ही पाचासह शंभर.) अशा शंभर कौरवांपैकी दुर्योधन आणि दु:शासन सर्वांच्या परिचयाचे असतात.

कुलदिपक भाग ५

लेखक विप्लव यांनी मंगळवार, 19/06/2018 23:09 या दिवशी प्रकाशित केले.
बहता हे मन कही, कहा जानती नही कोई रोक ले यही, भागे रे मन चला आगे रे मन कही जाने किधर जानू ना मेघा स्वतःशीच गुणगुणत स्वयपाकघरात काम करत असते. पण तिच कामात लक्ष कुठ असत ते तर कधीच गेलं पुण्याला विकी सोबत कालचा तो प्रसंग तिच्या डोळ्या समोरुन झरझर सरकू लागतो. शेवटी चाचरत का कसेना तिने विकीच्या हातात हात देऊन त्याच्या मैत्रिला पुष्टी दिली. ' त्याच्या हातात हात दिला मी. किती छान वाटल ना! तो स्पर्श मला हवाहवासा का वाटतोय. परत कधी भेट होणार आमची. छे बाई ईतकी का उद्विग्न होतेय मी त्याच्या भेटीसाठी? काय होतय मला हे? कशातच का मन लागत नाहीये? ' " अग ये पोरी ध्यान कुटं हाय?

दोसतार - १२

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 19/06/2018 10:04 या दिवशी प्रकाशित केले.
मागील दुवा https://www.misalpav.com/node/42737
शाळेची घंटा हे प्रकटन संपायचीच जणू वाट पहात असावी. तास संपला. शाळा सुटली. आठवड्यापुरती का होईना पुस्तकांची काळजी मिटली होते. अर्थात आम्हाला कोणालाच ही काळजी पडली नव्हती. हा भाग वेगळा....
वर्गात पुस्तके नसतील तितके दिवस शिक्षक काही शिकवणार नव्हते. निदान इंग्रजी मराठी आणि इतिहासाचे शिक्षक तरी. गणीताच्या सराना पुस्तक नसले तरी चालायचे. त्यांची बहुतेक सगळी पुस्तके पाठ होती.

कितीसा पुरोगामी आहेस ?

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 19/06/2018 09:58 या दिवशी प्रकाशित केले.
(* कविता जेंडर न्यूट्रल वाचावी) कमिटेड टू हूम कमिटेड टू व्हॉट पुरोगामी पुरोगामी कितीसा पुरोगामी आहेस ? तुझ्यासाठी आपले कुणीच नाही तूला तू त्यांचा आहेस असे वाटते तेही फसवे नसते का ? आपल्यातल्या आपल्यांचा होऊ शकला नाहीस त्यांचाही होऊन रहाणे खरेच जमेल का तूला ? आणि तूही कुणाचाच नाहीस हेच खरे नसते का ? त्यागी आहेस हे बरे आहे एका अर्थाने आपल्या अंगच्या वस्त्रांचाही त्यागकरुन त्या तपस्वी मुनींप्रमाणे जंगलात जाऊन कायमचा एकांतवास अनुभवून पहाशील का ? पूरोगामीत्व निवांतपणे अनुभवण्याचा आणि अनुभवू देण्याचा तो सर्वोत्कृष्ट पुरोगामी मार्ग आहे ना स्वतःस पुरोगामी सिद्ध करण्याचा तोच

लेखणी का कीबोर्ड ? (पूर्वार्ध)

लेखक हेमंतकुमार यांनी मंगळवार, 19/06/2018 07:45 या दिवशी प्रकाशित केले.
पंधराव्या शतकात लागलेला छपाईयंत्राचा शोध हा खरोखर क्रांतिकारक होता. त्यापूर्वी उपलब्ध ज्ञान हे केवळ हस्तलिखित स्वरुपात साठवता येत असे. त्यामुळे त्याच्या समाजप्रसाराला खूप मर्यादा होत्या. छपाईचे तंत्र जसे विकसित झाले, तसे अधिकाधिक माहिती व ज्ञान बहुसंख्यांपर्यंत पोचू लागले. त्यातूनच समाजात लेखनपरंपरा विस्तारली. शिक्षणाच्या प्रसारातून अनेकजण लेखन करू लागले. त्याला छपाईची जोड मिळाल्याने छापील मजकुराची निर्मिती होऊ लागली. अशा प्रकारे ज्ञानप्रसार वेगाने आणि दूरवर होऊ लागला. निरनिराळ्या प्रकारची माहिती जनसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी विविध छापील माध्यमे निर्माण झाली.

कुलदिपक भाग ४

लेखक विप्लव यांनी मंगळवार, 19/06/2018 00:49 या दिवशी प्रकाशित केले.
मेघा आणि शर्मिष्ठाचा आतेभाऊ एकमेकांकडे टक लावून पहात असतात अगदि भान हरपून, इतकं की त्यांना भोवतालच्या जगाचा विसर पडतो. "अरे काय पाहतोयस असा वेड्यासारखा?" शर्मिष्ठेच्या प्रश्नाने दोघेही भानावर आले. " अग काही नाही . पण तू कितीवेळ करतीयेस? केव्हाचा थांबलोय मी? जायचयं ना आपल्याला आज पुण्याला? तुझं नटनं मुरडणं झालं असेल तर निघायच का ?" आपण पकडले गेलो म्हणून तो मनातून ओशाळला होता, पण त्याचा तसूभरही लवलेश चेहर्यावर जाणवू न देता उलट शर्मिष्ठेवर प्रश्नांची सरबत्ती चालू केली. ह्या सगळ्यात मेघावर चोरून कटाक्ष टाकायला मात्र विसरला नाही हं. आणि मनात मात्र आनंदाच्या उकळ्या फुटत असतात.