Skip to main content

दोन रुपक कविता

लेखक मित्रहो यांनी गुरुवार, 26/07/2018 20:20 या दिवशी प्रकाशित केले.
छत्री ती रोज सोसते घोंघावनाऱ्या वाऱ्याचा मारा ती हसत झेलते बरसनाऱ्या पावसाच्या धारा कधीही, कुठेही, मी तिचीच मदत घेतो एका झटक्यात घरात मात्र माझ्या मी तिला ठेवतो दूर एका कोपऱ्यात माती तो गडगडतो, आवाज करतो म्हणून मग मी घाबरतो ती कडकडते, चमकते, म्हणून मी घरात लपून बसतो ती देते हिरवळ, ती देते गंध, ती घेते मला कुशीत पण साधा चिखल झाला म्हणून मी तिला लाथाडतो
काव्यरस

All You Need To Know About Online Piracy

लेखक Saketh4005 यांनी गुरुवार, 26/07/2018 16:34 या दिवशी प्रकाशित केले.
Online piracy the name which is making a hell lot of money for some of those who are illegally publishing the movies on the sites. Online movie piracy is killing the film industry and is making money for them which they are earning in a huge amount. Earlier in those days when the usage of the internet is only limited to the top cities, they used to make the piracy in the form of CD's and DVD's it would be easy for the film production house to take the necessary actions.

ईजिप्त सोलोट्रीप: एक अविस्मरणीय अनुभव. भाग – ८

लेखक टर्मीनेटर यांनी गुरुवार, 26/07/2018 16:30 या दिवशी प्रकाशित केले.
/* W3.CSS 4.13 June 2019 by Jan Egil and Borge Refsnes */ html{box-sizing:border-box}*,*:before,*:after{box-sizing:inherit} /* Extract from normalize.css by Nicolas Gallagher and Jonathan Neal git.io/normalize */ html{-ms-text-size-adjust:100%;-webkit-text-size-adjust:100%}body{margin:0} article,aside,details,figcaption,figure,footer,header,main,menu,nav,section{display:block}summary{display:

‘इ’ जीवनसत्व : जरा ‘इ’कडेही लक्ष द्या !

लेखक हेमंतकुमार यांनी गुरुवार, 26/07/2018 08:01 या दिवशी प्रकाशित केले.
वैद्यकाच्या इतिहासात जीवनसत्वांचे शोध क्रमाने लागत असताना १९२२मध्ये ‘इ’चा क्रमांक लागला. सुरवातीस ते निरोगी प्रजोत्पादनास आवश्यक असावे असा तर्क होता. नंतर ‘इ’ हे एकच रसायन नसून ८ रसायनांचे एकत्र कुटुंब आहे असे लक्षात आले. तरीसुद्धा त्याचे शरीरातील नक्की कार्य समजत नव्हते. त्यावेळेपर्यंत अ, ब, क आणि ड या जीवनसत्वांचे कार्य व्यवस्थित समजले होते आणि त्यांच्या अभावाने होणारे विशिष्ट आजारही प्रस्थापित झाले होते. ‘इ’च्या अभावाचा विशिष्ट आजार मात्र संशोधकांना जंग जंग पछाडूनही सापडत नव्हता.

हट्ट!

लेखक मनमेघ यांनी गुरुवार, 26/07/2018 07:51 या दिवशी प्रकाशित केले.
हट्ट कोणता करू तुजकडे? थिट्या मनाची झेप थिटी फिरून येती मनात इच्छा भेट हवी मज, हवी मिठी. आणि हासुनी ओळखशी तू, देउन जाशी हवे तसे मंतरल्यासम ते क्षण जाता, इच्छांचे त्या पुन्हा पिसे. 'थांब थांब तू, नकोस जाऊ' सांगावेसे तुज वाटे, त्याच क्षणी अन् सभोवताली काजळगहिरे तम दाटे. म्हणून जाशी मिठी छेडुनी झिणिझिणि वलये गात्रात अन् पुढल्या भेटीची होते मनी अनावर सुरुवात. असंख्य वेळा अशी भेटशी मिठीत घेशी हळुवार 'थांबवून ठेवावे तुज' ही इच्छा अपुरी, अनिवार. हट्ट सांग मी करू कोणता? थांबशील जो पुरवाया, थांबशील का अजून थोडी आज एवढे ठरवाया? - मनमेघ
Taxonomy upgrade extras

तो आणि ती........ मित्रविंदा, सत्या, लक्ष्मणा, भद्रा आणि कालिंदी! (भाग 10)

लेखक ज्योति अळवणी यांनी बुधवार, 25/07/2018 19:52 या दिवशी प्रकाशित केले.
तो आणि ती..... प्रस्तावना: https://www.misalpav.com/node/42956 तो आणि ती.... देवकी!: https://www.misalpav.com/node/42957 तो आणि ती.... यशोदा!: https://www.misalpav.com/node/42969 तो आणि ती.... राधा!: https://www.misalpav.com/node/42980 तो आणि ती........ कुंती!: https://www.misalpav.com/node/42995 तो आणि ती......

एक मराठा लाख मराठा

लेखक खिलजि यांनी बुधवार, 25/07/2018 19:11 या दिवशी प्रकाशित केले.
" एक मराठा लाख मराठा " पूर्वी गुंजला होता नाद गिनीज बुकात नाव नोंदवुनी मराठ्यांनी घेतली होती दाद नव्हता कुणाचा अंकुश तेथे नव्हते कुणीही नेते गल्लोगल्ली येऊनि मिसळले लाख लाख मराठे काकासाहेब गेले बुडुनी (?) झाला मोठा आघात बंद पुकारला खरा तरीही पण चढला हिंसेचा माज मी हि मराठा तरी भेदत आलो चक्रव्हुय ते सारे शांततेतच खरा जोर असे नको हिंसेचे वारे मराठा असूनही आज मला वाटत आहे लाज पुन्हा रोवूया अटकेपार झेंडा नको आरक्षणाचा साज सिद्धेश्वर विलास पाटणकर

पिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग २: पर्वतात वसलेलं एक गांव- सद्गड

लेखक मार्गी यांनी बुधवार, 25/07/2018 16:49 या दिवशी प्रकाशित केले.
भाग २: पर्वतात वसलेलं एक गांव- सद्गड पिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग १: प्रस्तावना २८ नोव्हेंबर २०१७ ची थंड सकाळा! पिथौरागढ़ला पोहचल्यावर पहिलं काम म्हणजे ज्याच्याशी बोलणं झालंय, त्याच्याकडून सायकल घेणं हे आहे. हिमालयामध्ये फक्त सहा- सात दिवस जातानाही सायकल चालवण्याची इच्छा आहे. त्यामुळे पिथौरागढ़ला पोहचल्या पोहचल्या मला सायकल मिळेल, ह्यासाठी बराच प्रयत्न केला. इंटरनेटवर उत्तराखंडच्या सायकलिस्ट ग्रूप्ससोबत संपर्क केला, पिथौरागढ़ व जवळच्या परिसरातील सायकलिस्ट ग्रूप्ससोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला.

गुरू

लेखक अनन्त्_यात्री यांनी मंगळवार, 24/07/2018 19:56 या दिवशी प्रकाशित केले.
कठिण,गहन,भेदक प्रश्नांचे चिंतन ज्यांना मोहविते त्यांच्या प्रतिभेची प्रत्यंचा इंद्रधनूसही वाकविते जटिल समस्या त्यांच्या हाती पडता सरळ,सुलभ होते विभिन्न अस्फुट पैलूंमधले नाते अलगद उलगडते आदिम अनघड पत्थरातही सुबक शिल्प त्यांना दिसते केवळ प्रज्ञा-स्पर्शे त्यांच्या हीणाचे सोने बनते
काव्यरस

सलीम मन्सुरांचा मुस्लीम सत्यशोध

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 24/07/2018 19:10 या दिवशी प्रकाशित केले.
सलीम मंसूर हे भारतीय वंशाचे कॅनेडियन प्राध्यापक आहेत. राज्यशास्त्र आणि इस्लाम आणि मुस्लीम सत्यशोध आणि प्रबोधनाच्या दिशा हा त्यांच्या लेखन आणि व्याख्यानांचा मुख्य विषय आहे. त्यांची सर्वच मते मला पटली असे नाही पण भारतीयांना त्याबाबत मनन आणि चर्चा करणे आवडू शकेल असे वाटते. या पेक्षा अधिक माहिती देण्या पेक्षा युट्यूब लिंक्स देतो. त्यातील ११ मार्च २०१८ ची युट्यूबवरील मुलाखतच प्रथम पहावी.