Skip to main content

दोन रुपक कविता

लेखक मित्रहो यांनी गुरुवार, 26/07/2018 20:20 या दिवशी प्रकाशित केले.
छत्री ती रोज सोसते घोंघावनाऱ्या वाऱ्याचा मारा ती हसत झेलते बरसनाऱ्या पावसाच्या धारा कधीही, कुठेही, मी तिचीच मदत घेतो एका झटक्यात घरात मात्र माझ्या मी तिला ठेवतो दूर एका कोपऱ्यात माती तो गडगडतो, आवाज करतो म्हणून मग मी घाबरतो ती कडकडते, चमकते, म्हणून मी घरात लपून बसतो ती देते हिरवळ, ती देते गंध, ती घेते मला कुशीत पण साधा चिखल झाला म्हणून मी तिला लाथाडतो
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1020
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया