Skip to main content

तुला बापू म्हणू की बाप्या ?

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 03/03/2020 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
तुला बापू म्हणू की बाप्या ? स्वतःच्याच स्खलनशीलतेने असुरक्षीत ईतरांनाही असुरक्षीतता वाटणारा तुला बापू म्हणू की बाप्या ? जीवातला शिव भुकेला प्रणयाच्या लीलेला निसर्ग सुंदर प्रकृती मायेच्या प्रितीला प्रितीची महती निवड स्वातंत्र्याची रिती न समजलेला तुझ्यातला दांभिक भद्रतेचे नाटक रचणारा केयलफिड्डी कुरवाळणारा अभद्र बाबूराव मायेच्या प्रितीला निवड स्वातंत्र्याची रितीला पारखा झाला असेल तर त्याला जरा ताळ्यावर आण, शिकव त्याला संस्कार प्रितीचा निवड स्वातंत्र्याच्या रितीचा शिखराला आधार असेल जर अनसुय निरपेक्ष समर्पित प्रितीचा तरच तुला क्रौंच द्वयाच्या मीलनाची शीखरावरच्या स्खलनाची

ज्ञानोबांस नंब्र विनंती

लेखक अनन्त्_यात्री यांनी सोमवार, 02/03/2020 21:53 या दिवशी प्रकाशित केले.
कवी बिचारा मेटाकुटीने कविता पाडत असतो शाई ओली असताना हा टपली मारून जातो वसुदेवाच्या मनी जशी कंसाची दहशत होती तसे मिपा-कवि विडंबनाचा कंस बघुनी हादरती कवितारतिच्या विनयाचा हा भंग त्वरेने करतो शीघ्रकवित्वा याच्या बघुनी मनोमनी मी जळतो हात जोडुनी हतप्रभ कवि हा दारी तुझिया उभा दयावंत हो पैजारा तू आवर निर्दय प्रतिभा विडंबनाच्या वावटळीतुनी कविता माझी सुटावी ज्ञानोबांनी पैजाराला सज्जड तंबी द्यावी
काव्यरस

एक चांदणी माझ्या घरात डोकावते

लेखक चांदणे संदीप यांनी सोमवार, 02/03/2020 16:02 या दिवशी प्रकाशित केले.
दुधाळ चांदव्यात, प्रखर तेजाळते एक चांदणी माझ्या, घरात डोकावते मी बसतो दडून, तिच्यापासून ती हलत नाही, टक लावते माझा मी लिहितो, हळुवार गुणगुणतो ही, मी लिहिलेले, गावाला ऐकवते चालत राहते रात्र, ही चांदणी मात्र अमीट असल्याच्या, थाटात वावरते उशीरा कधीतरी, फिरते माघारी ती गेल्यावर तिची, टिमटिम आठवते रात्रभर छळते, मला जागवते पहाटे निमूट माझ्या, कवितेत उतरते - संदीप चांदणे

धर्म इथे बेताल झाला

लेखक खिलजि यांनी सोमवार, 02/03/2020 13:45 या दिवशी प्रकाशित केले.
धर्म इथे बेताल झाला उठतासुटता जहाल झाला वापरले कैक रंग त्याने कोथळा बाहेर येताना मात्र लालच झाला ... किती चढले सुळावर त्याच्यानावे , मारणारे गनीम आणि मरणारेही .......... पाळणारे , जाळणारे , बघणारे अन भडकवणारे पण .........जो तो हलाल झाला जन्नत नसीब झाली कुणा तर कुणी स्वर्गात पोहोचले अरे पण त्यांचे काय झाले असेल ? ज्यांच्या जाण्याने , उभे घर पोळले अपराध कुणाचा , कुणी भोगला कामकऱ्याला जागेवरी ठोकला मर्दुमकीचा झेंडा मिरवुनी हिरवा भगवा पुढे नाचला हिजडे हरामी धर्मवेडे रंगबिरंगी धर्मांमध्ये फुका पाजती विषाचा प्याला माणूस मेला ,,, धर्म राहिला , धर्म राहिला

मराठी भाषेची भेट

लेखक शेशाद्री यांनी सोमवार, 02/03/2020 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
व्याकरणशुध्द भाषा वापरणार्यांना आपण न्यायासनावर नाही, याची जाणीव असणे महत्वाचे. तसे संस्कार पुढच्या पिढीवर होणे हेही तितकेच आवश्यक आहे. अन्यथा मराठी भाषेचा ऱ्हासच होईल. मुख्य लेख - मराठी भाषेची भेट लेखक शेषाद्री नाईक मराठी भाषा दिना निम्मित आपल्या मातृ भाषेविषयी --- एखाद्या बेळगावी माणसाने दळणाला 'दळप' म्हटले किंवा मुंबईच्या माणसानें मंडईच्या मागे ऐवजी 'पाठी ' म्हटले तर आपण भाषेचे वैविध्य म्हणून ते सोडून देतो. पण तेच एखाद्याने 'पाणी’ ऐवजी 'पानी ' म्हटले, तर अशुद्ध म्हणून टीका करतो . त्याही पेक्षा वाईट म्हणजे त्या माणसाला आपण 'शिवराळ' किंवा तत्सम उपाधी देऊन हिणवतो. असे कां ?

(कितनी राते....)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी सोमवार, 02/03/2020 10:54 या दिवशी प्रकाशित केले.
पेरणा अर्थात http://misalpav.com/node/46163

कितनी राते....

१. तू हलकट पणे म्हणालास, खुर्चीपेक्षा खालीच बसू की आरामात.. मी म्हणालो तूच बस भाड्या, तुला माहीत आहे, मला खाली बसता येत नाही! पण त्या वेळेला तुझी ती कुत्सित नजर बघून मला मन कित्ती आवरावं लागलं माहितीय तुला? म्हणे "आरामात बसू"! २. म्हातारा संन्यासीच होता ना की अजून काही? अख्खा खंबा संपवलास तू हावरटासारखा. (सत्य घटनेवर आधारीत.....

वो शाम...

लेखक प्राची अश्विनी यांनी सोमवार, 02/03/2020 09:02 या दिवशी प्रकाशित केले.
1 तू म्हणालास, खुर्चीपेक्षा खालीच बसू आरामात.. मी आपली बसले, तुझ्याशी काटकोन करून कोप-यात! पण तो काटकोन सांभाळताना मन कित्ती आवरावं लागलं माहितीय तुला?? आणि म्हणे "आरामात बसू"! 2 पाणीचं होतं की अजून काही?

आजि मराठीचा दिनु!

लेखक Sumant Juvekar यांनी रविवार, 01/03/2020 23:02 या दिवशी प्रकाशित केले.
आज मराठीचा दिन ठोकू घोषणा भर्पूर ! करू फॉरवर्डं मेसेज घेऊ बडवून ऊर !! माये मराठी पहा गं प्रेमा आला महापूर ! सोनियाचा दिनू आता नाही राहिला गं दूर !! पोरे पाठवू आमची इंग्रजि माध्यमामध्ये! शिल्लक जागा राहतील मराठीच्या शाळांमध्ये !! याला म्हणतात त्याग खळबळ मनी माजे! मराठी बांधवांसाठी इत्के केलेची पाहिजे!! मेसेजेस इंग्रजीत इंग्रजीत बोर्ड सारे! वाचवण्या मराठीला काहीतरी करूया रे !! शिकू इंग्रजीमधून इंग्रजीमधून बोलू! वाट इंग्रजीची धरू वाट मराठीची लावू !! मराठीला वाचवा हो अशा बोंबा तरी मारू!! मराठीच्या दिनी तरी गोष्टी मराठीत करू ! गड यायला हवाय सिंह नकोय जायला ! जन्मा यावा तानाजी तो पण- दुसऱ
काव्यरस

‘ढोल’ नियतकालिकाचे दिवस (भाग- एक)

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी रविवार, 01/03/2020 15:48 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे बडोदा येथील ‘भाषा केंद्रा’ची स्थापना १२ एप्रिल १९९६ ला करण्यात आली. याच वर्षी (महिना नक्की आठवत नाही) भाषा केंद्रातर्फे एक मेळावा सापुतार्या ला संपन्न होत असल्याचं पत्र मला मिळालं होतं. पण काही कारणांमुळे सापुतार्याpला जाणं शक्य झालं नाही. या नंतरच्या वर्षी म्हणजे १९९७ ला सप्टेंबर महिण्यात मला बडोद्याहून पुन्हा एकदा पत्र आलं. पत्रात म्हटलं होतं, ‘ऑक्टोबर महिण्यात बडोद्याला ‘भाषा संशोधन केंद्रा’त लोकपरंपरा या विषयावर तीन दिवसांचं कृतीसत्र आयोजित केलं आहे.

शुभ सकाळ!

लेखक दिनेश५७ यांनी रविवार, 01/03/2020 07:56 या दिवशी प्रकाशित केले.
एक सुंदर सकाळ पुन्हा उगवल्याच्या आनंदाने असंख्य पक्ष्यांचा मंजुळ प्रभातराग वातावरणाला संगीतसाज चढवतो आहे. निरभ्र, निळ्याशार आभाळाच्या क्षितिजाशेजारच्या टोकावर धुक्याच्या पांढुरक्या रेघेने सीमारेख आखली आहे. पूर्वेकडचं तांबुडकं हळुहळू रुपेरी झाक घेऊ लागलंय, आणि डोंगरांच्या निळ्या रांगा आपल्या मूळ रंगानिशी जाग्या होऊ लागल्या आहेत... ही वेळ मोठी वेगळीच असते. खरं तर ही जीवनासाठी घेऊन येणारा नवा दिवस साजरा करण्याची वेळ! पण त्या साजरेपणासाठी वेळ काढण्याएवढा निवांतपणा सगळ्यांकडे नसतो.