Skip to main content

मनी छंद गुलकंद

Published on सोमवार, 12/05/2025 प्रकाशित मुखपृष्ठ
‘गुलकंद’ हा मराठी चित्रपट नुकताच १ मेला प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटात ढवळे आणि माने या दोन्ही कुटुंबांच्या धमाल प्रेमकहाण्या रंगवण्यात आल्या आहेत. गोष्ट अशी आहे की, ढवळे घराण्यात सई ताम्हणकर (नीता) आणि समीर चौघुले (मकरंद) हे दांपत्य सुखात राहत असून त्यांची मुलगी मीनाक्षी (जुई भागवत) आहे. माने घराण्यात प्रसाद ओक (गिरीश) आणि ईशा डे (रागिणी) हे दुसरे जोडपं असून त्यांचा मुलगा ओंकार (तेजस राऊत) आहे. मीनाक्षी आणि ओंकार यांच्या प्रेमातून दोन्ही घरांची लग्न तयारी सजते; पण लग्नाच्या पहिल्या सोहळ्यात एक धक्का बसतो – प्रसाद आणि सई हे भूतकाळातले प्रेमी होते!
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 787

The Killers

Published on सोमवार, 12/05/2025 प्रकाशित मुखपृष्ठ
“The Killers” ही अर्नेस्ट हेमिंग्वे यांनी १९२७ साली लिहिलेली एक गाजलेली प्रसिद्ध कथा आहे. हेमिंग्वेशी माझी पहिली मुठभेड झाली ती “फेअरवेल टू आर्म्स” च्या मराठी भाषांतराच्या वाचनाने. माझ्या आठवणीप्रमाणे हे USIS प्रणीत पुस्तक होते. ते वाचल्यावर अस्पष्टशी जाणीव झाली की अरे हे काहीतरी अपूर्व पुस्तक आहे. माझ्या तोडक्या मराठी वाचनात असे काही वाचले नव्हते. इंग्रजीची केवळ अक्षर ओळख झाली होती. इंग्रजी वाचन करणे खूप दूरची गोष्ट होती. पुढे कधीतरी महाराष्ट्राचा संबंध तुटला. सगळ्या देशात भटकंती सुरु झाली. वाचन केवळ टेक्निकल गोष्टीपुरते मर्यादित झाले. हेमिंग्वे विस्मरणात गेला.
लेखनविषय:

याद्या 886

(ढू आय डी)

Published on रवीवार, 11/05/2025 प्रकाशित मुखपृष्ठ
हे काव्य म्या अल्पमतीने केवळ मनोरंजन म्हणून खरडले आहे.. वेळोवेळी धारातिर्थी पडलेल्या आय डीं शीं याचा बादरायण संबध जोडू नये,जोडल्यास कवी जबाबदार नाही.
लेखनविषय:

याद्या 1552

समईतलं तेल संपूनही उरणारं तेज

Published on शनीवार, 10/05/2025 प्रकाशित मुखपृष्ठ
स्नेहप्रभा! प्रभा म्हणजे तेज. नुसतं तेज असेल तर त्या तेजोवलयाचा कधी कधी त्राससुद्धा होऊ शकतो. तेजामुळे दाहकता निर्माण होऊ शकते. पण तेजासोबत स्नेह असेल आणि ओलावा असेल तर ते तेज घातक ठरत नाही. स्नेह म्हणजेच तेल. जेव्हा तेजासोबत अशी आर्द्रता असेल तर ते तेज शीतल होतं. कदाचित तेजासोबत असलेल्या शीतलतेमुळे आयुष्यातल्या इतक्या दु:खाच्या आघातांनंतरही अशी व्यक्ती खंबीर राहू शकते आणि समईसारखी मंद तेवत राहू शकते! नऊ दशकांचा प्रवास केलेली माझी आजी- सौ. स्नेहप्रभा नारायणराव वेलणकर. जिचे तीन भाऊ दुसर्‍या महायुद्धात युरोप व आफ्रिकेत लढले होते! जिने इंग्रजांपासून अँड्रॉईडपर्यंतचा काळ बघितला!
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 1261

माध्यमांची आरडाओरड

Published on शुक्रवार, 09/05/2025 प्रकाशित मुखपृष्ठ
नुकताच काही आठवड्यापूर्वीचा (पहलगाम घटनेच्या अगोदरचा) एक प्रसंग... एका कंपनीत फायर ड्रील चालू होते. त्यात त्यांना आकस्मिक परिस्थितीमध्ये काय करायचे (उदा० हातातले काम टाकून संकटकालीन मार्गिकेकडे जाण्याच्या) याच्या सूचना दिल्या होत्या. नंतर काही दिवसांनी लोकांची तयारी बघण्यासाठी एक दिवस अचानक सायरन वाजवण्यात आला. त्यावर लोकांनी काय करावे? त्यांनी प्रशासकीय अधिकार्‍यांना फोन करून "आता काय करायचे" असा प्रश्न विचारला, तेव्हा संबंधितानी कपाळाला हात मारला. आपात्कालीन परिस्थितीमध्ये सर्वसाधारण भारतीय नागरिक कसा बेपर्वा किंवा मठ्ठपणे वागतो, हे सर्वांनी करोना काळात बघितले.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 3590

अलविदा हिट्मॅन

Published on गुरुवार, 08/05/2025 प्रकाशित मुखपृष्ठ
सकाळी, हातात चहाचा कप आणि समोर मोबाईल. नेहमीसारखं क्रिकबझ उघडलं आणि डोळ्यांवर विश्वासच बसेना — “रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमधून निवृत्त.” hitman थांबा जरा. रोहित शर्मा? हिटमॅन? ज्याच्या बॅटमधून चौकार-षटकारांचा पाऊस पडायचा, तो आता कसोटीच्या पांढऱ्या जर्सीला रामराम करतोय? क्रिकेटच्या मैदानावर फलंदाजी ही कला आहे, आणि रोहित म्हणजे त्या कलेचा एक लाडका चित्रकार.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 2556

हा सूर्य आणि......

Published on गुरुवार, 08/05/2025 प्रकाशित मुखपृष्ठ
जेव्हा अर्जुनाने जयद्रथाला मारायची प्रतिज्ञा केली तेव्हा कृष्णाला काय वाटले असेल?? --- कृष्णाने शिबीरात रथ आणला आणि त्याच्या हृदयाचा ठोका चुकला. काहीतरी विपरीत घडले होते. आज अर्जुनाला संशप्तकांनी फारच गुंतवून ठेवले होते. संख्येच्या बळावर आणि विवीध रथीच्या निपुणतेवर आजचा दिवस अर्जुनाला बांधून ठेवण्यात संशप्तक सफल झाले होते. युधिष्ठीराला फसवून चक्रव्युहात आणून, युद्ध संपवायचा डाव होता हे कृष्णाला कळले होते. तो डाव कळल्यावर लगेच दूत युधिष्ठीराकडे पाठवून त्याने सावधही केले होते. "मग आज कोण वीरगतीला प्राप्त झाला?" प्रश्न मोठा होत होता.
लेखनविषय:

याद्या 1587

राजांचे मावळे (ई.स.२२२२) - १

Published on मंगळवार, 06/05/2025 प्रकाशित मुखपृष्ठ
पंढरपूर इसवी सन २२२२ , महिना आषाढ, दिवस एकादशीचा. दोनशे वर्षांपूर्वी पंढरपूर कसं होत काय माहित, आज विठ्ठल मंदिराचे भग्नावशेष राहिले होते. विठ्ठल अजून गाभाऱ्यात होता पण रखुमाई नव्हती. विठ्ठल जणू काळाच्या माऱ्याने दमून मागे टेकला होता. वरच्या छताला तात्पुरता आधार दिला होता. त्यात एक फट राहिली होती जिच्यातून वाऱ्याची झुळूक खाली येत होती. बलदंडाने हात जोडले आणि त्या टेकलेल्या विठ्ठलाला झुकून नमस्कार केला. याच माऊली समोर हजारो लाखो वारकरी नतमस्तक व्हायचे आणि वाट चुकलेले योग्य दिशेला लागायचे.
लेखनविषय:

याद्या 989

जाता पंढरीसी....

Published on सोमवार, 05/05/2025 प्रकाशित मुखपृष्ठ
"जाता पंढरीसी सुख वाटे जीवा....." आजी आजोबांची पंढंरी म्हणजे नातवंड. पोटासाठी दाहीदिशा अशा परिस्थितीत बरेच आजीआजोबा या सुखापासून वंचितअसतात. कवीवर्य बाकीबाब म्हणतात तसेच, "पिलास फुटूनी पंख तयांचे घरटी झाली कुठे कुठे.....", आमचेही एक पिल्लू दुरदेशी गेलयं. भलं हो त्या इंजीनिअरांचे ज्यांनी व्हाट्स अप सारखे तंत्रज्ञान बनवले.विसाव्याच्या क्षणी सहवास नाही पण कमीतकमी संपर्क तरी होतो. तरूण पणी या गोष्टी सहज वाटतात.

याद्या 4032