Skip to main content

देवा, थांबव हा कहर....

लेखक SwapnilB.0611 यांनी शुक्रवार, 15/05/2020 19:26 या दिवशी प्रकाशित केले.
आता तरी फुटू देरे देवा तुला पाझर, खूप झाला आता हा कोरोना चा कहर... कोण करतो कोण भरतो,अशी येथे गत आहे, श्रीमंतांनी आणला आजार,गरीब आता भोगत आहे... मुठभर लोकांच्या नालायक पना मुळे, हा आजार पसरतो आहे, त्यांच्या सोबतच मरणाऱ्या गरिबांना, तू का विसरतो आहे... मान्य करतो चूक आमची, माजलो होतो जास्त, कळली चूक आम्हाला, अजून किती करशील त्रस्त... तुझ्या नियमांना आव्हान देऊन, करत होतो मनमानी, पिंजऱ्यात केले कैद आम्हाला, मोकाट केलें सारे प्राणी... पुरे झाली देवा शिक्षा, कर तूच आता रक्षा, वाचव साऱ्या जगाला, मागतो येवढीच आता भिक्षा....

गणित

लेखक अनुस्वार यांनी शुक्रवार, 15/05/2020 19:21 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याची स्वत:ची अशी काही गणिते ठरलेली असतात. पण या गणितांत ऐनवेळी अनोळखी अ, ब, क... च्या रूपात येणाऱ्या नव्या स्थिरांकांचा [(constants)/व्यक्तींचा] समावेश सुद्धा कसा चपखल होतो. जणू त्या समीकरणात त्यांची एक विशिष्ट जागा मुद्दामहून मोकळी ठेवली होती. खरेतर हे सुद्धा गणितच! पण अशी कमालीची, अनाकलनीय लवचिकता फक्त या जीवनाच्या गणितातच असते. काही व्यक्तींच्या प्रवेशाने आजवर न सुटलेली क्लिष्ट कोडी चुटकीसरशी सुटतात. तर काही तोंडी गणिते आता गणकयंत्राला सुद्धा अवघड वाटू लागतात. ही सगळी जादू फक्त व्यक्तींची.

भैरवगड (शेरपुंजे) ते रतनगड ट्रेक २८-२९ डिसेंबर २०१९ (B2R Trek)

लेखक Vivek Phatak यांनी शुक्रवार, 15/05/2020 18:30 या दिवशी प्रकाशित केले.
मागचा ७५ किमीचा लोणावळा-भीमाशंकर रेंज ट्रेक करून तीन महिने झाले. त्यामुळे परत एक रेंज ट्रेक करण्याची इच्छा होती. रेंज ट्रेक ची मजा काही औरच असते. एक तर अशा ट्रेक ला येणाऱ्यांची संख्या कमी असते त्यामुळे एकमेकांची ओळख पटकन होते आणि ती टिकून राहते. तर ह्या वेळचा ट्रेक होता अकोले तालुक्यातला भैरवगड (शिरपुंजे) ते रतनगड असा जवळपास ५५ किमी चा. ह्या ट्रेक चा मार्ग होता, शिरपुंजे गाव- भैरवगड-घनचक्कर टॉप-गवलदेव टॉप-मुडा टॉप-कुमशेत गाव-कात्राबाई टॉप- रतनगड. ट्रेक साठी एकूण १२ शिलेदार जमले. २७ डिसेंबर ला रात्री साधारण १२ वाजता शिवाजीनगर पुणे येथून खाजगी बस ने प्रस्थान केले.

मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर (दिवस चौथा) २८.१०.२०१९ संकेश्वर ते धारवाड

लेखक सतीश विष्णू जाधव यांनी शुक्रवार, 15/05/2020 16:03 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर (दिवस चौथा) संकेश्वर ते धारवाड संकेश्वरमधील राजधानी हॉटेलच्या टेरेसवरून सायकल खाली घेऊन सामानाची बांधाबांध करून सायकलिंग सुरू करायला सकाळचे सहा वाजले. प्रभातीच्या सुवर्णछटांनी आसमंत दरवळून निघाला होता. . तुरळक काळे मेघ क्षितिजावरील सुवर्णप्रभांमध्ये गहिरे रंग भरत होते.

डाग

लेखक कौस्तुभ भोसले यांनी शुक्रवार, 15/05/2020 13:57 या दिवशी प्रकाशित केले.
त्या रात्री त्याला चंद्रावरचा डाग स्पष्ट दिसला. आणि मग त्यानं घट्ट मिटून घेतली खिडक्यांची दार... सताड उघडी ठेवली भयाण काळोखात नयनांची कवाडं... त्या स्मशान शांततेत निर्दयीपणे ओढल्या त्याने रक्ताळलेल्या रेघा आपल्याच हातावर आणि मग पुन्हा पहाटच झाली नाही... -कौस्तुभ

‘मी गोष्टीत मावत नाही’: नवा प्रयोग

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी शुक्रवार, 15/05/2020 13:55 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे ‘मी गोष्टीत मावत नाही’ हा आगळा आविष्कार अस्तित्वात येण्याची पार्श्वभूमी म्हणजेच निर्मिती प्रक्रिया सांगण्याचा हा प्रयत्न. १९८२ पासून मी वहीत काही मजकूर लिहीत आलो. पण मी नक्की काय लिहितोय याचं मला थेट आकलन होत नव्हतं. यात केव्हा एखादा प्रचलित नसलेला विचार असायचा. मनात नवीन तयार झालेलं एखादं सुभाषित असायचं. नंतर लिहून पूर्ण होईल या आशेने काही अचानक सुचलेल्या कवितेच्या ओळी असायच्या. काही वेळा नाटकाचे संवाद वाटावीत अशी काही सुचलेली वाक्य असायची. (निसटून किती गेलं ते मोजता येणार नाही.) या समग्र लिखाणाच्या आविष्काराला पुढे नक्की काय वळण मिळेल मला त्यावेळी माहीत नव्हतं.

त्या स्वप्नांना..

लेखक मन्या ऽ यांनी शुक्रवार, 15/05/2020 02:50 या दिवशी प्रकाशित केले.
त्या स्वप्नांना.. काय करु? समजत नाही. मनास माझ्या मी कसा आवर घालु? हे मज आता उमजत नाही.. झोपी गेलेल्या त्या स्वप्नांना आता मी जागवाया जात नाही.. स्वप्न आहेत ती काही श्रावणातल्या पावसाची तर काही बहरलेल्या वसंताची.. झोपी गेलेल्या त्या स्वप्नांना आता मी जागवाया जात नाही.. स्वप्न आहेत ती घोटभर चहाची अन् भरपुर गप्पांची झोपी गेलेल्या त्या स्वप्नांना आता मी जागवाया जात नाही.. स्वप्न आहेत ती शरदातल्या चांदणरातींची हेमंतातल्या ऊबदार रजईतली पण झोपी गेलेल्या त्या स्वप्नांना आता मी चेतवाया जात नाही... - दिप्ती भगत (१५मे,२०२०)
काव्यरस
Taxonomy upgrade extras

पाली गणपती सायकल भेट ०३.०३.२०२०

लेखक सतीश विष्णू जाधव यांनी गुरुवार, 14/05/2020 20:01 या दिवशी प्रकाशित केले.
पाली गणपती सायकल भेट ०३.०३.२०२० . मंगळवार म्हणजे गणपतीचा वार !!! आज ठरले, पालीच्या गणपतीला भेट द्यायची. विजयची संकल्पना मी उचलून धरली आणि आजची सायकल सफर सुरू झाली. अष्टविनायकातील तिसरा गणपती म्हणून पालीचा बल्लाळेश्वर ओळखला जातो.

आत्मनिर्भर

लेखक कुमार जावडेकर यांनी गुरुवार, 14/05/2020 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
मार्ग खडतर, लक्ष्य दुर्धर होत गेले आणि अंतर आत्मनिर्भर होत गेले शब्द जितके आत्मनिर्भर होत गेले... अर्थ सारे अस्थिपंजर होत गेले सुख जगू शकलेच नाही त्या ठिकाणी... दुःखसुद्धा फक्त जर्जर होत गेले बांधण्यासाठी नवे सेतू फुकटचे माणसांचे स्वस्त पत्थर होत गेले चालणे नशिबात होते का म्हणू मी... राहण्यासाठी कुठे घर होत गेले? प्रश्न पुसणे बंद केले मी कधीचे मौनही माझे निरुत्तर होत गेले - कुमार जावडेकर
काव्यरस

कम्फर्टेबल..!!

लेखक आजी यांनी गुरुवार, 14/05/2020 11:58 या दिवशी प्रकाशित केले.
मला हवी तशी उशी मला अजूनही मिळालेली नाही. माझ्याकडे माझ्या खास बघून आणलेल्या अशा सात उशा आहेत, पण त्यांतली एकही उशी नंतर मला कंफर्टेबल वाटत नाही. मला त्यांतली एकही फायनली पसंत नाही. काही उशा फारच जाड तर काही फारच पातळ. उंच उशी फार उंच होते आणि पातळ उशी फार पातळ होते. दोन पातळ उशा एकमेकांवर ठेवूनही बात बनती नहीं. "मध्यम" उशीही मानेला कंफर्टेबल वाटेलच असं नाही. कुशीवर झोपलं की डोकं आणि खांदा यांत अंतर पडतं आणि मान लटकत राहाते.