Skip to main content

voip फोन

कौटील्य यांनी या दिवशी प्रकाशित केले.
मला विंडोजवर चालणारा voip पीबीएक्स ज्याने pstn or ip दोन्हीवर संभाषण करता येउ शकेल व कमीत कमी ४ एक्सटेंशन करता येतील हवा आहे विकत असेल तरि चालेल ओपन सोर्स उत्तम फुकठ अति उत्तम

इंद्रधनुष्य

देवदत्त यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
लेखनप्रकार
कोजागिरीच्या चंद्राच्या छायाचित्रावरून आठवले. मागील वर्षी ३ जुलै ला मी इंद्रधनुष्य बघितला होता. आता तुम्ही म्हणाल की त्यात काय नवीन आहे?

रामसेतूचा वाद

दिनेश५७ यांनी या दिवशी प्रकाशित केले.
रामसेतूवरून उफाळलेला वाद आता संपला आहे, असे दिसते. दसर्‍याच्या आसपास सोनिया गांधींनी कुठल्याशा रामलीलेतल्या राम-लक्ष्मणाची पूजा केली, आणि वाद धुवून टाकला. मग असे वाद आधी उकरण्यामागचे राजकारण कुणी (ज्याला यावर काही मत असेल, तो) समजावून सांगू शकेल का? रामाचे अस्तित्व नाकारण्याचा प्रयत्न जमून गेला असता, तर, अयोध्येतल्या जन्मभूमीपासून सुरू झालेले प्रश्न गुपचूप मितवता आले असते, असे तर नसेल?

कोजगिरीचा चंद्र

झकासराव यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
लेखनप्रकार
कोजागिरीचा चंद्राला बंदिस्त करण्याचा एक प्रयत्न माझाही :) http://www.esnips.com/web/zakasraosPhotos इथे तुम्हाला रजिस्टर करावे लागेल मग पाहु शकाल. अवांतर :- फोटोंसाठी वेगळा विभाग नाही का?? हे कुठे टाकावे हेच कळत नव्हते. :(

तहलका!

दिनेश५७ यांनी या दिवशी प्रकाशित केले.
आज तहलकाचा नवा बॉम्ब बघितलात? निवडणुकीच्या तोंडवर बरोब्बर कसा फुटतो शोध पत्रकारितेचा टाईम बॉम्ब? अशा माध्यमांना कायमचा चौकशी आयोगाचा दर्जा दिला तर?

एका शीघ्र कवीची शीघ्र कविता !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
सखे........!
आज आपले काय बिनसले
प्रेमाला रंग चढेना,
भांडण आपले रंगेना !
कधी तरी मुक्याने हे बोलणारच होतो,
वेदनेला अश्रुत जाळणार होतो.
या शहरातून त्या शहरात,
माणसाच्या विचारांच्या वणव्यात,
त्या संस्थळावरुन या संस्थळावर,
मराठी शब्दांच्या भावविश्वात.
सखे ....!
तु एकदा ये !
आली तशी निघून जा,
मिसळपाववर 'दिलीप' लिहितो काय
उभ्या उभ्या वाचून जा !
  

रहस्यकथा भाग १

सहज यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
लासवेगास येथे नुकताच " ६६६ वा आंतरराष्ट्रीय भूतंखेतं व गूढं साहीत्य मेळावा" पार पडला. देशविदेशचे ख्यातनाम ब्लॉगप्रेमी ज्यांनी अनेक भूतंखेतं व गूढं साहीत्य मोठ्या प्रेमाने पाळले आहे, ते सर्व दरवर्षी न चुकता ही वारी करतातच. नेत्रदीपक नसला तरी डोळे पांढरे करणारा हा सोहळा, डोळे भरभरून पहायला असंख्य भेदरट मोठ्या उत्साहाने जमतात. एकमेकांना घाबरतात व घाबरवतात. तर अश्या ह्या सोहळ्याला ह्यावर्षी १० भाग्यवान "भयाण चाहता" स्पर्धेत आमचा नंबर लागला. काय करणार, आमचा फोटो (रुप) पाहून पहील्या १० मधे तर नक्कीच वर्णी लागणार ह्याची खात्री होतीच. मोठ्या धडधडत्या अंतःकरणाने संमेलनात स्वारी पोहोचली.

ते गांव माझे..

प्राजु यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
सह्याद्रीच्या कुशीमध्ये, वसलं गं एक पूर.. पंचगंगेच्या तिरावर, माझं गं ते कोल्हापूर... महालक्ष्मीचे ते करवीर, पन्हाळा-ज्योतिबा खांद्यावर.. परंपराही शूरवीरांची, सांगे माझे कोल्हापूर.. बाजी लावती कुस्तीगीर, भव्य रंकाळा दूरदूर.. परीस स्पर्शानं शाहूंच्या, भारलं गं कोल्हापूर... कलेची पंढरीच ती, नृत्य- नाट्य संगीत सूर.. भालजींच्या 'जयप्रभा'त, रंगलं गं कोल्हापूर... नवरात्राचा रंगबहार, दसरा-दिवाळीचा न्यारा नूर.. आनंदामध्ये रंगरंगूनी, सजून जाई कोल्हापूर... नका भाऊ नादी लागू, झणझणींतच आहे वारं.. मिसळ आणि चप्पलही, मिरवतं गं कोल्हापूर... साता समुद्रापार मी, माहेर ते माझे दूर.. मन नाही थाऱ्यावर, आठवे