Skip to main content

पुराणातली वांगी

Published on 09/12/2007 - 09:58 प्रकाशित मुखपृष्ठ
नमस्कार लोकहो !! काही माणसं आयुष्यात अशी भेटतात की ज्यांना पाहिल्यावर वाटतं ते किती भाविक ? पण दिसतं तस नसतं. काही वेळा लोक अपरिहार्यतेमुळे भक्ती करीत असतात. पण त्यांच्या माथी उगाच शेंदूर लावला जातो. ते बिचारे त्यांचं आयुष्य जगत असतात. या विषयावरील एक किस्सा. एका खेड्यात नामसप्ताह आयोजित केला होता. एका विद्वान बुवांना त्यात कीर्तनासाठी बोलावले होते. गावातल्या विठ्ठलमंदिरात दिवसभर भजन, नामस्मरण, पूजाअर्चा आणि रात्री या बुवांचे कीर्तन असा भरगच्च कार्यक्रम. बुवांना विचित्र अनुभव आला. बुवांचं कीर्तन सुरू होतांना, गावातले सगळे लोक उपस्थित असायचे पण हळूहळू एकएक जण कटायला लागायचा.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 4976

बेडूक, नार्सिसस, भस्मासुर, अतिशयोक्ती आणि चड्डीत राहणे

Published on 07/12/2007 - 23:29 प्रकाशित मुखपृष्ठ
कॉलेजात असताना आमच्या मित्रमंडळींमध्ये "चड्डीत राहणे" हा एक वाक्प्रचार अत्यंत प्रसिद्ध होता. "अंथरूण पाहून पाय पसरावे" अशा साधारण अर्थाचा हा वाक्प्रयोग असला तरी त्याला अनेक छटा होत्या. कोणी जादा 'माज' करत असला की त्याला सरळ करण्यासाठी ‌"ए भो, चड्डीत राहा ना!" असे आम्ही म्हणत असू. आता हा वाक्प्रयोग येथे आठवण्याचे काय कारण? सांगतो. त्यापूर्वी ह्या अडीच गोष्टी वाचा. १. मेंढककाण्ड अर्थात बेडकाची प्रेमकहाणी: प्लवंगेंद्र बेडकाचे मंदोदरी बेटकुळीवर फारच प्रेम. अगदी शाहरूख खानचं काजोलवर असतं ना तस्सं. पण अर्थातच मंदोदरीचे तातश्री मेंढकोबांना हा विवाह पसंत नव्हता.

याद्या 18493

'टप्प्याचे' महत्त्व - (पी.जे.-कम -कोडं)

Published on 07/12/2007 - 04:08 प्रकाशित मुखपृष्ठ
नजफगढमध्ये लहानपण गेलेल्या वीरेन्द्रला चक्क शास्त्रीय संगीत आवडायचं. दुबेबुवांच्या क्लासबाहेर तो गाणं ऐकत तासन् तास उभा रहायचा. शेवटी जाटाचं पोर वाया चाललं, म्हणून वडिलांनी त्याचा कान पकडून एका क्रिकेट प्रशिक्षकाकडे नेलं. असो. पण मुख्य मुद्दा तो नाही. मुख्य मुद्दा आहे तो त्याच्या खेळण्यातला 'सूर'जो हरवलाय त्याचा. इतका की, दुखापतींनी ग्रस्त झालेल्या भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यातही त्याची निवड होऊ शकली नाही. खाली मान घालून तो गॅरी कर्स्टन गुरुजींकडे गेला. गुरुजींनी त्याला बसवून घेतलं, त्याच्या खेळाच्या जुन्या चित्रफिती दाखवल्या आणि मग नेटमध्ये घेऊन गेले.

याद्या 8820

बम भोले बम

Published on 06/12/2007 - 19:03 प्रकाशित मुखपृष्ठ
मोठमोठ्या चित्रपट कलाकारांशी (म्हणजे अमिताभ व शाहरुख) आमच्या फार ओळखी. दुपारचे जेवण करून पान खाण्यासाठी पानाच्या गादीवर आलो तर तिथे शाहरूख. आश्चर्याने आम्ही तोंडातच बोट घातले. म्हणजे शाहरूख दिसला त्याबद्दल नाही तर त्याने शर्ट घातला होता त्याचे आश्चर्य वाटले. आय हाय "दर्द ए डिस्को" काय डान्स केलाय. मान गये. आम्हीही शर्टाची दोन बटणे काढून त्याला नाचण्याची हुक्की आली तर साथ देण्यासाठी तयार राहिलो. गोल्डफ्लेक पेटवून शाहरूखने १ रुच्या दोन मेंटॉस घेतल्या. आम्ही पटकन तोंडातले बोट काढून मेंटॉस घेण्यासाठी हात (पुसून) तयार ठेवला. पण त्याने मेंटॉस (स्वत:च्या) खिशात टाकल्या.

याद्या 11592

माझ्या जातीपाती, माझे धर्म, माझा 'परजात'प्रवेश! :)

Published on 05/12/2007 - 00:06 प्रकाशित मुखपृष्ठ
राम राम मंडळी, तसा मी जन्माने हिंदू बरं का! अगदी कोकणस्थ ब्राह्मण! पण एकूणच आपला जातीपातीवर, धर्मावर तसा विश्वास नाही! अहो नाहीतरी आपल्याला 'मनुष्य-प्राणी' असंच म्हटलं आहे. म्हणजे ऍडव्हान्स बुद्धीचे (म्हणजे 'प्रगत'मेंदू का काय ते म्हणतात ते हो! शिवाय आपला मेंदू 'प्रगत' वगैरे आहे हे आपणच ठरवलं, इतर प्राण्यांनी, वाघसिंह, कुत्रामांजर, एकपेशीय अमिबा वगैरे मंडळींनी ते अद्याप मान्य कुठे केलंय?! अहो सूक्ष्मदर्शक यंत्राशिवाय न दिसणार्‍या जंतूंमुळे आपल्याला साधी अमिबिक डिसेन्ट्री जरी झाली तरी आपण रात्रभर किमान दहा-पंधरा रेघोट्या तरी ओढतोच की!

याद्या 33175

राजा ....जागा रहा

Published on 04/12/2007 - 10:39 प्रकाशित मुखपृष्ठ
रात्र वैर्‍याची आहे....राजा जागा रहा... कालच्या ते़जीला अनुसरून जे "फॉलोअप बाईंग" आज अपेक्षित होते ते या क्षणापर्यंत तरी दिसत नाही आहे. दिनांक ११ डिसेंबर रोजी "फेड" ची मिटिंग आहे. तो पर्यंत मार्केट "तळ्यात मळयात" राहील असे वाटत आहे. मिसळपाववाल्या मित्रांना विनंती की अशा अनिश्चित वातावरणात फार मोठी गुंतवणूक करू नये. फेड च्या मिटींगमधील निर्णयांना मार्केट कसा प्रतिसाद देतं यावरून पुढील गुंतवणूक ठरवावी. घाई करू नये हे सांगण्यासाठी हा लेखन प्रपंच आपला, (सावध) धोंडोपंत आम्ही मागे सुचविलेला "नागार्जुना कंस्ट्रक्शन" लई जोरात चालला आहे.

याद्या 5169

पुन्हा एकदा गोलपिठा

Published on 03/12/2007 - 21:02 प्रकाशित मुखपृष्ठ
बाकी ढसाळांच्या विद्रोहात सर्व गोष्टी "क्षम्य" असतात. सभ्य म्हणून गणले गेलेले प्रतिशब्द वापरले तर विद्रोहच संपून जाईल. विवेकवादी चळवळींमध्ये देखील विद्रोहाचे मान व भान राखावे लागते. आमचे विद्वान आणि नेमकेपणाने लेखन करणारे लेखक स्नेही श्री. प्रकाशराव घाटपांडे यांच्या वरील अभिप्रायावरून विद्रोही साहित्याबद्दल चर्चा घडवून आणण्यासाठी हा लेखनप्रपंच. विद्रोही साहित्याची परंपरा जरी जुनी असली तरी खर्‍या अर्थाने या प्रकारच्या साहित्याला, 'मान्यता' हा शब्द बरोबर वाटत नाही, पण 'प्रसिद्धि' श्री. नामदेव ढसाळांच्या 'गोलपिठा' या पुस्तकाने मिळवून दिली, हे वास्तव आहे.

याद्या 60185