गडकर्यांचे किस्से.
नाटककार राम गणेश गडकरी हे एक हजरजबाबी व्यक्तिमत्व होते त्यांचे काही किस्से.
अत्रे गडकर्यांना गुरुस्थानी मानत.
आपला पहिला काव्यसंग्रह 'फुलबाग' लिहून झाल्यावर, त्याची वही घेऊन अत्रे राम गणेशांकडे अभिप्रायासाठी गेले.
काही दिवसांनी अत्रे वही आणायला गेले. त्यांनी विचारलं "कशी काय वाटली फुलबाग?"
वहीच्या फाटलेल्या आवरणाकडे बोट दाखवत गडकरी म्हणाले "फुलबाग चांगली आहे, कुंपण तेवढं नीट घाला!"
----------------------------------------------------------
नाटक रंगभूमीवर येण्यापूर्वी गडकर्यांच्या घरी नाट्यवाचनाचे प्रयोग होत.
याद्या
12353
मिसळपाव