Skip to main content

सुभाषित

Published on सोमवार, 28/01/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
नमस्कार, आज एक सुंदर सुभाषित वाचनात आले. ते मिपाकरांच्या आस्वादासाठी येथे देत आहोत. अनेक विद्वांनाना ते माहित असेल. पण ज्यांना माहित नाही, त्यांना कळावे आणि मिपा विविध गोष्टींनी समृद्ध व्यासपीठ व्हावे, यासाठी हा खटाटोप. येथे लेखन करणार्‍या अनेकांना हे सुभाषित उपयोगी पडेल असे वाटते. वृत्त वसंततिलका अर्थो गिरामपिहितः विहितश्च कश्चित् सौभाग्यमेति मरहट्टवधूकुचाभः | नान्ध्रीपयोधर इवातितरां प्रकाशो नो गुर्जरीस्तन इवातितरां निगूढः|| अर्थ - शब्द योजतांना ते अतिशय गूढ अनाकलनीय नसावेत त्याचप्रमाणे अगदी उघड्यानागड्या अर्थाचेही नसावेत. हे दोन्ही घातक आहे.
लेखनविषय:

याद्या 7300

मुला॑ना इ॑ग्रजी माध्यममाच्या शाळेत घालावे का?

Published on सोमवार, 28/01/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
आजकाल जवळ जवळ सगळ्याच पालका॑ना असे वाटते की आपल्या पाल्याने english medium school ला जावे. त्या॑ना वाटते जे problems ना आपण इ॑ग्रजी येत नाही म्हणून सामोरे गेलो त्याला मुला॑नी सामोरे जाऊ नये. समाजात मराठी तून शिक्षण घेणे कमीपणाचे मानले जाते.त्याचवेळी आज मराठी शाळा पण चा॑गल्या नाहीत. आपणास याबद्दल काय वाटते?

याद्या 25397

आधार कुणाचा?

Published on रवीवार, 27/01/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
आधार कुणाचा? चांगल्या नोकरीच्या, गलेलठ्ठ पगाराच्या आशेने मुलं परदेशी जातात ते परतीचे दोर कापूनच. दोन वर्षांनी येऊ, चार वर्षांनी येऊ, असं म्हणत ग्रीन कार्ड कधी घेतात आणि कायमचे अमेरिकावासी कधी होतात, ते कळतही नाही. एकदा तिथल्या जीवनशैलीची सवय झाली, की इथे परत यायला नको वाटतं. आईवडिलांनाही मुलांच्या नसण्याची सवय होते आणि शेजारी, मित्र किंवा नातेवाईकांच्या आधाराने ते आयुष्य घालवतात. 'इथे सगळं ठीक आहे,' असं सांगितलं जातं तब्येत बरी नसली तरी. मुलं तिथे दूर अमेरिकेत, आपली दुखणी त्यांना काय सांगणार? भारतात यायचं, तर खर्च ! रजा पाहिजे? नातवांच्या आठवणीन व्याकूळ होनं आहेच.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 11671

प्रमोद देव (आपले अत्यानंदकाका) यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा (२८ जानेवारी)

Published on रवीवार, 27/01/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
प्रमोद देव (आपले अत्यानंदकाका) यांच्या वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा परमेश्वर त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य देवो आणि तुमच्याकडून नेहमीसारखेच परखड लेखन अधिकाधिक होवो....हीच प्रार्थना. प्रमोदकाका, वाढदिवसाच्या मनापासून हार्दीक शुभेच्छा... -सागर

याद्या 27367

इनका क्या करें ?

Published on रवीवार, 27/01/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
खूप वर्षांपूर्वी ब्ल्याकँडव्हाईट् च्या जमान्यामधे - जेव्हा टीव्ही थोडे तास असायचा - तेव्हा पाहिलेले काहीही (अक्षरशः काहीही ) टीपकागदाप्रमाणे शोषले जायचे. मनात कायमचे वसतीला येऊन रहायचे. त्याकाळात पाहिलेली एक "फिल्म्स (उच्चारी "फ्लिम") डिव्हीजन की भेंट्"अजून आठवते. फिल्मचे शीर्षक होते : "इसका क्या करें ?" सहलीला गेले असतानाचा कचरा तिकडेच इतस्ततः टाकणार्‍या एका समूहापैकी एक छोटा मुलगा शेवटी तो कचरा हातात गोळा करतो आणि त्या सर्वाना विचारतो : " हां , चले तो जाते हैं हम यहांसे , लेकिन इसका क्या करें ?" हीच फ्रेम मग शेवटी फ्रिज होते आणि फिल्म संपते.

याद्या 8313

वाङ्मयचौर्य की तरही गझल

Published on शनीवार, 26/01/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
प्रदीप निफाडकर यांच्या गझलदीप या पुस्तकातील काही मजकूर खाली देत आहे. मराठी गझलांबद्दलच्या काही गैरसमजांबाबत ते लिहितात... मराठीत ऊर्दू गझलेचाच अनुवाद असतो हा आणखी मोठा गैरसमज आहे. आणि त्याला आमचे काही सन्माननीय गझलकार जबाबदार आहेत. ऊर्दूतील काही शेर अगदी तसेच्या तसे उचलले आहेत.

याद्या 2611

कुणी मत देता का मत?

Published on शनीवार, 26/01/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
मुक्तछंदात काही ओळी लिवायचा आमचा एक प्रयत्न! कुणी मत देता का मत? एका गायकाला कुणी मत देता का मत? खरं सांगतो बाबांनो, गायक आता लाचार झाला आहे! झी, सोनी, आणि स्टारप्लस आणि कुणी कुणी त्याला लाचार केला आहे...! कुणी मत देता का मत? एका गायकाला कुणी मत देता का मत? कुणी सांगितलं की कलाकार एखादाच असतो, अभिमानी असतो? कुणी सांगितलं की त्याचं फक्त कलेशीच इमान असतं म्हणून? खरं सांगतो बाबांनो, गायक आताशा एस एम एस मुळेच लहानमोठा ठरतो! कुणी सांगितलं की एस एम एस मुळे वाहिन्यांना लाख्खो रुपये मिळतात? कुणी सांगितलं की संगीतकला ही वाहिन्यांच्या दारातली एक बाजारबसवी रांड झाली आहे म्हणून? तसं काही नाही बाबा
लेखनविषय:

याद्या 11750
Taxonomy upgrade extras

विडंबनः चाळीमधल्या खोलीमधली राजा आणिक राणी

Published on शनीवार, 26/01/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
भातुकलीच्या खेळामधली... या कवितेचे विडंबन (प्रा. विसुभाऊ बापट यांच्या "कुटुंब रंगलंय काव्यात" या कार्यक्रमाच्या १००१व्या प्रयोगानिमित्त आयोजित विडंबन स्पर्धेत प्रथम पुरस्कार प्राप्त विडंबन...
लेखनविषय:

याद्या 14325
Taxonomy upgrade extras

संथ चालते मालिका ही...

Published on शनीवार, 26/01/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
संथ चालते मालिका ही... 'पात्रे' बदलून का होईना पण बारमाही वाहणा-या सर्व मराठी मालिकांना अर्पण.. (संथ वाहणा-या कृष्णामाईची क्षमा मागून..) संथ चालते मालिका ही... दर्शक देती दीर्घ जांभया, जाणीव तिजला नाही! कथानकाचा थांग न लागे पुढे तीळभर, गहूभर मागे 'मार्गी' झाली म्हणता म्हणता क्षणात 'वक्री' होई.. संथ चालते मालिका ही... नसे कुणी का तिला नियंता कंटाळून करी प्रश्न ही जनता नदीस फुटावे नाले, ओहळ, तशी 'वाहवत' जाई.. संथ चालते मालिका ही... सूना, सासवा, आजी, नाती मालिकांचे च्युईंगम खाती सरला रस अन उरला चोथा, तरी थुंकवत नाही... संथ चालते मालिका ही... -अविनाश ओगले
लेखनविषय:

याद्या 5099
Taxonomy upgrade extras