Skip to main content

प्रमोद देव (आपले अत्यानंदकाका) यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा (२८ जानेवारी)

लेखक सागर यांनी रविवार, 27/01/2008 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
प्रमोद देव (आपले अत्यानंदकाका) यांच्या वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा परमेश्वर त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य देवो आणि तुमच्याकडून नेहमीसारखेच परखड लेखन अधिकाधिक होवो....हीच प्रार्थना. प्रमोदकाका, वाढदिवसाच्या मनापासून हार्दीक शुभेच्छा... -सागर

वाचने 27394
प्रतिक्रिया 26

प्रतिक्रिया

देवकाकांना समस्त मिपा परिवारातर्फे वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा... लालबागचा राजा त्यांना उदंड आयुष्य, उत्तम प्रकृतीस्वास्थ्य प्रदान करो हीच मनापासून प्रार्थना..! त्यांचा वडिलकीच्या नात्याचा आशीर्वादाचा हात मिपाच्या मस्तकावर नेहमीच राहो, हीच सदिच्छा... आपला, (देवकाकांचा पुतण्या!) तात्या. अवांतर - काहीही म्हणा बाकी, आम्ही जानेवारी महिन्यात जलमलेली माणसं बाकी थोरच! :) आपला, (२ जानेवारीचा!) तात्या. ता क - देवकाका, सध्या नुसत्या प्रतिसादपर शुभेच्छा देत आहे. परंतु आमची अत्यंत आवडती आणि लाडकी नटी अनुष्का हीचं चित्र असलेलं शुभेच्छाकार्ड लवकरच पोष्ट करतो.. :) आपला, (अनुष्काप्रेमी!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

हार्दिक शुभेच्छा . जीवेत शरदः शतम! (शंभर शरद पवारांइतके आयुष्य लाभो) (राष्ट्रवादी) आजानुकर्ण

श्री प्रमोदरावांना आमच्याही शुभेच्छा. आपला, (सांगाती) धोंडोपंत तात्या, अनुष्काप्रेम लई वाढलंय तुमचं आजकाल. चालू द्या. आपला, (प्रेक्षक)धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

वाढदिवसानिमित्त , शुभेच्छा. असाच स्नेह वृद्धिंगत होवो. आपल्याकडून सतत लिखाण होत राहो. आम्हालाही आपल्याकडून स्फूर्ती मिळो. प्रकाश घाटपांडे

प्रमोदकाका , आमच्या "होकायंत्राला" अभिवादन आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! :-)

प्रमोदकाका, वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा! आपल्याकडून अधिकाधिक लिखाण व्हावे हीच अपेक्षा!! सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

आपल्या सगळ्यांचे प्रेम पाहून भारावलो. औपचारिक आभार न मानता मी ह्या शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी जपून ठेवतोय.

प्रमोदकाका, अब तक छप्पन... वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा ! आता होऊन जाऊद्या एखादी ज॑गी मेजवानी, ईथेच हो, मिपावर. लिहा काहीतरी जोरदार. आपला, (लेखन-मेजवानीभिलाषी :) ) इणम्र धमाल.

तुम्हाला अनेकोत्तम शुभेच्छा! लिहित रहा. वाढदिवस साजरे करत रहा. आमच्या शुभेच्छा घेत रहा :)

नावातच मोद भरला आहे! तुम्ही असे निराश का? तुमची प्रत्यक्ष भेट नसली तरी मि.पा. करांना भरभरुन आनंद देणार्‍यांपैकी तुम्ही आहात हे निश्चित. तुम्हाला उदंड आयुष्य, स्वास्थ्य लाभो आणि मि.पा.वर तुम्ही अधिकाधिक लिहिते रहावोत हीच प्रार्थना! तेव्हा तुमच्या दोन ओळीत बदल करुन मी म्हणेन - तुम्ही हसावे म्हणून मी हसत आहे! मि.पा.करांच्या प्रेमासाठी जगत आहे!! हसते आणि लिहिते रहा!!! चतुरंग

आज "आधार कुणाचा" च्या निमित्ताने आपली भेट झाली. आनंद वाटला. स्नेह व्हावा व तो वाढावा ही इच्छा! आपला, पिवळा डांबिस