अंड्याची टरफले आणि बुटाची लेस
नुकतीच फुटलेली
अस्ताव्यस्त पसरलेली
अंड्याची टरफलं
आपले अनुभव असेच काहीसे
निष्कर्ष आणि ज्ञान
बाहेर यायच्या आधीच...
पाहतो आहे..
पडलेली टरफले
अस्ताव्यस्त..
टिप्पणी : मुक्तछंद आणि नवकाव्य नक्की काय याचा विचार करताना काही कल्पना मांडव्याशा वाटल्या. मला नक्की काय म्हणायचे आहे ते छंदोबद्ध रचना न करता किंवा लेखात असतात तश्या पूर्ण वाक्यात भावना न मांडता, तुटक तुटक वाक्यांत भावना मांडल्याने वाचकाला त्या कशा भावतात? ते पाहण्यासाठी ही रचना केली आहे.
Taxonomy upgrade extras
मिसळपाव
