Skip to main content

अंड्याची टरफले आणि बुटाची लेस

लेखक लिखाळ यांनी बुधवार, 24/12/2008 01:35 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतीच फुटलेली अस्ताव्यस्त पसरलेली अंड्याची टरफलं आपले अनुभव असेच काहीसे निष्कर्ष आणि ज्ञान बाहेर यायच्या आधीच... पाहतो आहे.. पडलेली टरफले अस्ताव्यस्त.. टिप्पणी : मुक्तछंद आणि नवकाव्य नक्की काय याचा विचार करताना काही कल्पना मांडव्याशा वाटल्या. मला नक्की काय म्हणायचे आहे ते छंदोबद्ध रचना न करता किंवा लेखात असतात तश्या पूर्ण वाक्यात भावना न मांडता, तुटक तुटक वाक्यांत भावना मांडल्याने वाचकाला त्या कशा भावतात? ते पाहण्यासाठी ही रचना केली आहे.

गोल्डफ्लेक्स

लेखक घाटावरचे भट यांनी बुधवार, 24/12/2008 01:14 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा: सुवर्णमयी यांची कॉर्नफ्लेक्स ही कविता. गोल्डफ्लेक्स पाकिटातून नुकत्याच बाहेर आलेल्या गोल्ड्फ्लेक्स कधीही असतात ताज्या निकोटिनने भरलेल्या उत्साहाच्या चार झुरक्यांनंतर स्वतःच्याच राखेत बुडून शेवटी केवळ फिल्टर उरलेले असतात.... थंडगार फुक्यांच्या चेहेर्‍यावर हसू उमलतं त्यांना पाहून. मिंटने धुराचा वास झटकून पाकिटात बंद होतात उरलेल्या गोल्डफ्लेक्स पुन्हा पुढच्या सुट्ट्यासाठी... - घाटावरचे भट
Taxonomy upgrade extras

विव्हळतं तळ...

लेखक स्वाती फडणीस यांनी बुधवार, 24/12/2008 00:36 या दिवशी प्रकाशित केले.
विव्हळतं तळ... ================== . . नखातली डोक्यात.. झणझण जाते कळ...! डोळ्यातलं ओठात.. विव्हळतं तळ...! . टीप टीप वेदनेत.. कट्यारीची धार...! थेंब थेंब ओघळात.. तेजाब आर-पार...! . फसफस जाळत.. खोल खोल जाते घळ...! भसभस उफाळत.. रसरसता ये जाळ...! . . ================== स्वाती फडणीस..... २३-१२-२००८

धूसर राखाडी..

लेखक स्वाती फडणीस यांनी बुधवार, 24/12/2008 00:34 या दिवशी प्रकाशित केले.
धूसर राखाडी.. ================== . . क्षण क्षण जळताना.. कण कण होते राख.. राखे खाली..आत आत.. निखाऱ्याची गं धग.. . क्षण क्षण विझताना.. कण कण धूर धूर.. दाटलेल्या हुंदक्यात.. धूसर धूसर आग.. . अंग अंग राखाडी.. जळल्या निखाऱ्याच.. ठिणगी गाडलेली.. चटक्यात दावे राग.. . . ================== स्वाती फडणीस ..... २३-१२-२००८

घरटे -२ : सत्यकथेवर आधारित!!

लेखक चेतन१२३प यांनी मंगळवार, 23/12/2008 22:43 या दिवशी प्रकाशित केले.
त्यावेळी मी नुकताच सायनरला राहायला आलो होतो. अंजली अजून पाळण्यात होती. नवीन बांधकामाचे व्रण अजून शिल्लक होते. दिवाळीमध्ये रंगकाम केल्यामुळे येणाऱ्या एका वेगळ्याच सुगंधाची अनुभुती तेथे येत होती. नवीन वस्ती, नवीन लोक असल्यामुळे आमची अवस्था गोंधळल्यागत होती. अंजलीच्या आईच्या मदतीने लवकरच सर्वत्र ओळख झाली. जवळपास राहणारे जवळपास लोक मध्यमवर्गीय असल्याने माझ्या खिशाला हिच्या मागण्यांची प्रेमळ "उब" मिळणार नाही या उद्देशाने मी मनोमन खूश होतो. कारण, इतरांजवळ आहे पण आमच्याजवळ नाही अशी एखादीच उंची वस्तू ती शेजारी बघू शकत होती. सायनरमध्ये मी आनंदी होतो.

कॉर्न फ्लेक्स

लेखक सुवर्णमयी यांनी मंगळवार, 23/12/2008 19:56 या दिवशी प्रकाशित केले.
कॉर्न फ्लेक्स पाकिटातून नुकत्याच बाहेर आलेले कॉर्नफ्लेक्स सकाळी असतात ताजे बदामाने भरलेल्या उत्साहाचे! दिवसभराच्या रगाड्यात बुडून सांजवेळेला भिजलेली चिप्प झालेली . असतात ...पण मऊशार लहानग्यांच्या चेहर्‍यावर हसू उमलत त्यांना पाहून अंगावरून दिवसाचं ओझं झटकून रात्रीच्या पाकिटात बंद असतात फ्लेक्स . पुन्हा दुसर्‍या दिवशीसाठी.. - सोनाली जोशी

मास्तराचा समुपदेशान

लेखक ब्रिटिश यांनी मंगळवार, 23/12/2008 19:01 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या बगा मास्तरचा ख व मदला फोटु पोरान्ला क बोल्तोय सांगा बगू. गमतीन झ्या न लीवा की तुमाला क वाटतय त मना त बाबा बरच कई वाटतय १. आज ओपन ला पंजा येनार २. रोज पेग कती पीवाचे - पाच ३. पोरी लग्न कर म्हुन पाठी लागल्या त हात वर कराच ४. ........ ५......... आजुन कई येगल वाटत आसल तर लीवा की (बाला हा मास्तर सरळ दीसत नाय )