Skip to main content

हिंदोळा

लेखक शरदिनी यांनी बुधवार, 05/08/2009 10:05 या दिवशी प्रकाशित केले.
हिंदोळा साम्राज्ये लयाला जाती पडली नि:शस्त्र समता भाव तेथे ऋजुता टणत्कार ढसाढसा तप्त अग्निवर्षा सुप्त जनगणना भावविभोर कंकणराणा तुझा फ़सफ़शीत उत्साह जणू तेजतर्रार गोक्षुरादि गुग्गुळ संहत नायट्रिक आम्लात माझ्या दुधारी वेदनेचे समूळ उच्चाटन प्रेरणा समिधा यांची एकत्र भावधुम्मस आणि एकटाच डोलणारा सचिंत हिंदोळा ५ ऑगस्ट २००९, पुणे
काव्यरस

फक्त पुरुषांसाठी!

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी बुधवार, 05/08/2009 09:53 या दिवशी प्रकाशित केले.
फक्त पुरुषांसाठी हॅहॅहॅ ! लगेच डोळे विस्फारु नका! हे आवाहन आहे पुरुषस्पंदन या वर्षीच्या दिवाळी अंकासाठी पुरुष लेखकांना! मावा ( मेन अगेन्स्ट व्हायलन्स ऎन्ड अब्युज) या स्वयंसेवी संस्थेतर्फे गेली तेरा वर्षे समाजातील स्त्रियांवरील हिंसा व गैरवर्तन यांना प्रतिबंध करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. मुंबईचे हरीश सदानी हे या विषयात "वाहुन" गेलेले एक कार्यकर्ते आहेत.पुण्यातील गीताली वि म, विद्या बाळ, मंगला सामंत या स्त्री-पुरुष समता वादी करणा-या चळवळीतील महिला कार्यकत्त्यांबरोबर समांतर व पुरक काम करणारे कृतीशील विचारवंत आहेत.

"सप्तपदी १,२,३" तात्पर्य/सारांश

लेखक बामनाचं पोर यांनी बुधवार, 05/08/2009 09:36 या दिवशी प्रकाशित केले.
"सप्तपदी १,२,३" मधे युयुत्सु यांचा द्रुष्टिकोन हा पुरुषवादी होता , कदाचीत तसे अनुभव , केसेस त्यांनी पाहिल्या असतील. म्हणुन त्याचे मत टोकाचे आहे.. सगळ्य चर्चेतले तात्पर्य/सारांश मांडण्याचा प्रयत्न... गडबडीत खरडले आहे. शुद्धलेखनाच्या चुकांबद्द्ल दिलगीर . ==== भारताची समाज व्यवस्था तसेच विवाह व्यवस्था ही पुरुषप्रधान आहे.. कायदे ६० वर्षांचे आहेत पण ही पुरुषप्रधान रचना तर शेकडो वर्षांची आहे. इथे पुरुषांना जसे अधिकार दिले आहेत तसेच जबाबदरया देखिल दिल्या आहेत. लग्नाचाच विचार केला तर सप्तपदी बरोबरच होते ते कन्यादान .. " ही माझी कन्या आता तुला दान करीत आहे , तिची काळजी हे "..

(इंग्रजी प्रतिशब्द हवेत)

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 05/08/2009 05:25 या दिवशी प्रकाशित केले.
वर्षा ताई कामाचे बोलतात तर मी त्याचे विडंबन करतो. क्रू. ह.घे. मला खालील शब्दांसाठी इंग्रजी शब्द हवे आहेत. (खरं तर काही काही शब्द इतके अवघड आहेत की जाम सुचत नाहीयेत किंवा सुचले तरी पटत नाहीये ) १) खुळखूळा (उदा. सिग्रेटी फुंकून फुंकून त्याच्या छातीचा पार खुळखूळा झाला. त्याने खिशातले पैसे खुळखूळवले. बाळू खुळखूळा खेळतो. ) २) नादखूळा ३) भेळभत्ता ४) कडबोळी (म्हणजे Maharashtrian recipe prepared in Diwali ?) ५) टांगाटोळी (म्हणजे forcibly pull someone ?) मराठी -इंग्रजी असा शब्दकोश आंतरजालावर आहे का एखादा? - पाषाणभेद

एक समृद्ध राग ... राग कंबलबहार.. त्यातलं एक परिपूर्ण गीत

लेखक भडकमकर मास्तर यांनी बुधवार, 05/08/2009 01:43 या दिवशी प्रकाशित केले.
जेव्हा आशा भोसले,एस पी बालसुब्रमण्यम आणि बप्पी लाहिरी एकत्र येतात तेव्हा एक अफ़लातून गीत जन्माला येतं. फ़र्स्ट लव लेटर या सिनेमातलं हे गाणं.

पाडव्याची लोटी

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 04/08/2009 23:30 या दिवशी प्रकाशित केले.
गुढी पाडव्याला नक्की काय करायचे असते हा एक मोठ्ठा प्रश्न असतो. सकाळी पूजा करून गुढी उभारली; कडुलिम्बाचा पाल्याबरोबर गुळखोबरे खाल्ले, थोडे इकडेतिकडे करून नन्तर आमटी पुरणापोळीवर ताव मारून लोळणे ..ते एकदम सुर्यास्ताला गुढी उतरवायला जागे होणे या व्यतिरीक्त नक्की काय करायचे असते हा एक प्रश्नच असतो. अर्थात प्रश्नावर विचार करायला एकदम संध्याकाळीच वेळ मिलतो शाळेत असताना पाटीवर सरस्वती काढून पाटीपूजा करायचो. ती कडवट गोड कडूलिंबाची चटणी खायचो. तेंव्हा काही प्रश्न पडायचे.

माझ्या देशाचे नाव भारत आहे.

लेखक mahalkshmi यांनी मंगळवार, 04/08/2009 20:08 या दिवशी प्रकाशित केले.
भारत माझा देश आहे. हिन्दुस्तान का म्हणायचे? भरत हा दुश्यन्त आणी शकुन्तला यान्चा मुलगा होता.भरत हा एक महान चक्रवर्ती राजा होता.त्याच्यामुळे आपल्या देशाला भारत हे नाव मिळाले आहे. स्तान हा शब्द परशियन अथवा फारसी मधुन आला असावा.कारण बहुतेक मुसलमान देशान्ची नावे अशी आहेत,पाकीस्तान,अफगाणीस्तान, उझबेकीस्तान,कझाकस्तान,ताजीकीस्तान,किरगीझस्तान इत्यादी.

मेघना माझी बहीण..

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 04/08/2009 19:22 या दिवशी प्रकाशित केले.
परवा बर्‍याच दिवसांनी मेघना भेटली. खूप बरं वाटलं. मेघना एरंडे. माझी एक मैत्रिण, माझी एक बहीण! नात्यातलीच. मी मेघनाला तिच्या अगदी लहानपणापासून पाहतो आहे, ओळखतो आहे. अतिशय गुणी मुलगी. अभिनयाचा गुण अगदी उत्तम. उपजतच! मेघनाला सत्यदेव दुबे आणि विद्या पटवर्धन यांच्याकडून अभिनयाचं बाळकडू मिळालं, त्यांच्याकडे शिकायला मिळालं. नाटकांसोबतच एकीकडे शाळा, महाविद्यालयीन शिक्षणही सुरू होतं. लहानपणापासून अनेक नाटकांतून तिनं कामं केली.

युलीप व म्युचल फंड

लेखक सदानंद ठाकूर यांनी मंगळवार, 04/08/2009 18:31 या दिवशी प्रकाशित केले.
देशात विमा व्यवसायाचे खाजगीकरण झाल्यापासून अनेक विमा कंपन्या अस्तित्वात आल्या असून त्यांनी जागोजागी त्यांच्या शाखा उघडलेल्या आहेत. सर्वच विमा कंपन्यांनी युनिट लिंक्ड इन्शुअरन्स प्लॅन अर्थात युलिप हे प्रॉडक्ट बाजारात आणले आहे. इन्शुअरन्स कंपन्यांनी गावोगावी त्यांचे एजंट नेमले असून ते लोकांच्या गळ्यात युलिप हे महागडे प्रॉडक्ट, विमा प्रॉडक्ट म्हणून न विकता, गुंतवणुकीचे एक चांगले माध्यम म्हणूनच विकत असतात. तीन वर्ष पैसे भरा, मग भरावयाची गरज नाही, त्याचे एवढे पैसे होतील, तेवढे पैसे होतील अशा बाता मारतात.

स्पर्धा / मदत : क्युबिकल सजावट टिप्स ...

लेखक छोटा डॉन यांनी मंगळवार, 04/08/2009 17:09 या दिवशी प्रकाशित केले.
काय मंडळी कसे काय चालु आहे ? थोडा विरंगुळा आणि टाईमपास ( ह्यालाच "टवाळक्या" असेही म्हणतात ) ह्या शुद्ध हेतुने एका स्पर्धेची घोषणा करत आहे ... कसली स्पर्धा ??? रोज तुम्ही हापीसात जाऊन काम करत असालच ( किंवा हापीसात जाऊन काम केल्याचे नाटक करत असाल किंवा नुसतेच हापीसात जात असाल किंवा नुसतेच हापीसात गेल्याचे नाटक करत असाल, कसेही ) ना, मग ही स्पर्धा तुमच्यासाठीच आहे. तुम्ही हापीसात ज्या ठिकाणी बसुन काम करता ( किंवा पर्यायाने मिपा मिपा खेळता ) त्या जागेला "क्युबिकल" असे म्हणण्याचा प्रघात आहे ( हा शब्द अमेरिकेतुन आला आहे का ह्याची मला खरोखर कल्पना नाही ). तर तुम्हाला तुमचे क्युबिकल बोअरिंग, निरस, क