Skip to main content

(थांब ना ...)

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी गुरुवार, 06/08/2009 12:26 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा: प्राजुची कविता थांब ना आणि सध्या झालेली सर्दी. गळत आहे नाक माझे औषध झणी आण ना भिजले सगळे रुमाल आता तरी थांब ना जाहला डोक्यात कल्लोळ खालती मज पाहवे ना सांग कसा प्रतिसाद देऊ थोडे तरी थांब ना साचला आता प्रवाह प्रगती थोडी जाहली श्वास घेता श्रम जाहले व्हिक्स कुठे मज सांग ना उठता प्रभाती आवाज बंद वाकुल्या का काढीसी? स्वाईन फ्लूचा अंदाज घेसी जिव्हेस तुज हाड ना आवाज निघता मोद होई क्षणिक तोही मग ठरे राणीची* याद देसी क्रूरवक्त्या थांब ना संपल्या खाणाखुणा, या सर्दकालाच्या जरी दर्दभरे नाक सांगेल, ती कहाणी थांब ना

(थांब ना..)

लेखक चेतन यांनी गुरुवार, 06/08/2009 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
प्राजु ताईंची सुंदर कविता " थांब ना " http://misalpav.com/node/8842 वाचुन हे सुचले सर्द आहे खाट माझी, तू जरासा थांब ना दाटले रे मूक मय हे, सोबतीला थांब ना साठली गर्दी दुचाक्यांची चहू बाजूस या सापडे एखाद 'घर' ते, पाहूनी तू थांब ना एवढाही रेट नाही सांग ते रे मजकडे पाहुनी तारुण्य माझे, आज थोडा थांब ना रात्रवेळा होत आली, झोपल्या या बावळ्या भास्कराची माय निजली, रात्र तू रे थांब ना राहिले सारेच व्यापारी जगी हे पाहिले सापडे "फंटूश" येथे, या ठिकाणी थांब ना रंगल्या खाणा खुणा या, थुंकणार्‍याच्या जरी मोगरा/घोगरा सांगेल सारी, ही कहाणी थां
काव्यरस

फक्त अनिवासी भारतीयांसाठी

लेखक मिसळभोक्ता यांनी गुरुवार, 06/08/2009 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
सदर काथ्याकूट फक्त अनिवासी भारतीयांसाठी आहे. इतरांना फाट्यावर मारण्यात आले आहे. त्यांनी चपला शोधाव्यात, ही नम्र विनंती. तर अनिवासी भारतीयांनो, खालील प्रश्नाचे उत्तर द्यावे. त्याबरोबरच, स्वतःचे अनिवासीत्व वर्गीकृत करावे, ही देखील विनंती. (म्हणजे तात्पुरते : अमेरिकेतील एच १ - ब सारखे जे काही जग भर आहे ते, भारतीय नागरीक, परंतु परदेशी रहिवासः अमेरिकेतील ग्रीन कार्डसारखे जे जगभर आहे, ते.

बेधडक जगायचय

लेखक फ्रॅक्चर बंड्या यांनी गुरुवार, 06/08/2009 11:07 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या वादळ-वार्‍याला पकडुन मुठीत दुर कुठेतरी भिरकवायचय, ह्या समुद्राच्या लाटांवर स्वार होउन वार्‍याच्या वेगाने धावायचय, बेधुंद होउन, बेधडक जगायचय , मनात येयील ते करायचय ह्या सगळ्या पर्वतशिखरांना सर करुन त्यानांच ठेंगा दाखवायचाय, जमिनीला जिथे आकाश भेटते तिथे जायचय, आणि क्षितीजावर माझे नाव कोरुन यायचय, बेधुंद होउन, बेधडक जगायचय , मनात येयील ते करायचय चंद्र तार्‍यांना तोडुन, सखीच्या ओंजळीत द्यायचय, जिच्यावर करतो प्रेम तिला एकदा भिडायचय, तिला घेऊन मिठीत , तिच्या डोळ्यात डोळे घालुन माझे प्रेम तिला सांगायचय, तिचा हात हातात घेउन जगापासुन दुर पळायचय बेधुंद होउन, बेधडक जगायचय , मनात येयील ते करायचय प

तेच तेच परत परत

लेखक गोगट्यांचा समीर यांनी गुरुवार, 06/08/2009 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या चारोळी आहेत .. रोज रोज तेच तेच करून कंटाळल्याने लिहिलेल्या.. ------------- काम माझ करत करत मी घासतो मरत मरत वर्षे जाती सरत सरत तेच तेच परत परत
काव्यरस

शामी कबाब!!!

लेखक पिवळा डांबिस यांनी गुरुवार, 06/08/2009 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
"ट्रिंग, ट्रींग...", बरोब्बर सव्वापाच वाजता त्याचा फोन वाजला.... त्याने बरोब्बर ओळखलं की हा तिचा फोन! गेल्या वीस वर्षांचा पायंडा!!! ऑफिसमधून घरी परतण्यापूर्वी हा तिचा ठरलेला फोन.... "हॅलो", त्याने फोन उचलला..... "हे बघ, आता मी घरी जायला निघतेय १०-१५ मिनिटांत", तिचा हुकमी आवाज "ओके, मी पण तितक्यातच निघतोय. काय आणायचंय का? आज काय करायचंय?", त्याची नेहमीची चौकशी... इतक्या वर्षांची ठरलेली सवय! तिने थेट घरी जायचं आणि त्याने जे काही आणायचं असेल ते घेऊन मग घरी यायचं!!!! "नाही, काही आणायचं नाही आज!

वेदना.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 06/08/2009 09:19 या दिवशी प्रकाशित केले.
माझं आणि शुभदाचं आपल्याला होणार्‍या वेदना ह्यावर चर्वीचरण चाललं होतं.तिची आई म्हणाली तुम्ही चर्चा करा तो पर्यंत मी अपनाबाजारमधे जाऊन येते. मी शुभदाला म्हणालो, "वयाबरोबर वेदना साथ देत असतात.लहानपणचं आठवलंस तर कधी कधी आईने जवळ घेऊन घेतलेला मुका आणि जखमेवर केलेली मलमपट्टीसुद्धा वेदना कमी करू शकत नाही. जसं वंय वाढत जातं,तस तसा आपला सर्वात मोठ्या वेदनेचा अनुभव सुरू होतो तो निकामी झालेल्या गुडघ्यापासून ते उघड्या डोळ्यांना पण दिसणार नाहीत अश्या गहन भावुक वेदना मिळेपर्यंत हा अनुभव वृद्धिंगत होत राहतो." जेव्हा जेव्हा शुभदा मला भेटते तेव्हा काहीना काहीतरी जुन्या घटना आठवून आमचं बोलणं होत रहातं.

थांब ना..

लेखक प्राजु यांनी गुरुवार, 06/08/2009 09:16 या दिवशी प्रकाशित केले.
गर्द आहे वाट माझी तू जरासा थांब ना दाटले रे मूक भय हे, सोबतीला थांब ना साचली गर्दी दुकानांची चहू बाजूस या सापडे एखाद घरटे, पाहूनी तू थांब ना एवढाही वेळ नाही सांग का रे तुजकडे ? घेउनी आयुष्य माझे, आज थोडा थांब ना सांजवेळा होत आली, वाकल्या या सावल्या भास्कराची साथ निवली, मात्र तू रे थांब ना पाहिले सारेच व्यापारी जगी हे राहिले सापडे "माणूस" जेथे, त्या ठिकाणी थांब ना गंजल्या खाणा खुणा, या भूतकाळाच्या जरी कोपरा सांगेल सारी, ती कहाणी थांब ना - प्राजु

कसाबाला राखी बांधून घ्यायची आहे म्हणे

लेखक हुप्प्या यांनी गुरुवार, 06/08/2009 03:10 या दिवशी प्रकाशित केले.
http://beta.esakal.com/2009/08/05202807/home-mumbai-kasab-case-rakhi.ht… सकाळमधे अशी बातमी आहे की हलकट कसाबाला राखी बांधून घ्यायची इच्छा आहे. मला वाटते कुण्या थोर भगिनीने काथ्याचा एक जाडजूड दोर वळावा आणि तो जाहीरपणे त्याच्या गळ्याभोवती करकचून आवळावा. त्याचे प्राण पूर्ण जाईपर्यंत हा फास सोडू नये आणि अशा तर्‍हेने रक्षाबंधन साजरे करावे. होऊ घातलेले अतिरेकी हा रम्य सोहळा पाहतील तेव्हा तसले कृत्य करण्यापूर्वी विचार करतील अशी एक आशा.

(डांबिस पिवळा)

लेखक पिवळा डांबिस यांनी बुधवार, 05/08/2009 22:18 या दिवशी प्रकाशित केले.
मूळ प्रेरणा: हिंदोळा ह. घ्या... लघु-गुरू लयाला जाती पडले निष्प्राण गणमात्रा कविता वाचूनि तात्या आक्रंदतो ढसाढसा तप्त शब्दवर्षा विडंबनाची नसे आशा दिसे दीनवाणा साक्षात केसुराणा तुझा फसफशीत उत्साह सोसवेना मिपाकरां संहत नायट्रिक आम्ल पिऊन मरतील आता तुझ्या दुर्धरी वेदनेचे समूळ उच्चाटन प्राजक्ता जयवी करण्या एकत्र आसुसल्या आणि एकटाच डोलणारा अती आनंदे डांबिस पिवळा!!! :) (निवेदनः ही जबरदस्त मूळ कविता लिहून आम्हा मिपाकरांची सप्तपदी, ओबामा वगैरे चिखलातून सुटका केल्याबद्दल कवयत्रीचे जाहीर अभिनंदन!!!!!)
काव्यरस