Skip to main content

ग्रंथालय्/वाचनालय, पुणे पत्ता हवा आहे

लेखक सखाराम_गटणे™ यांनी मंगळवार, 01/09/2009 14:24 या दिवशी प्रकाशित केले.
ग्रंथालय्/वाचनालय चा पत्ता हवा आहे. आप्पा बंळवंत चौक, खडक पोलिस स्टेशन, स्वारगेट, गुरुवार पेठ च्या जवळपास असावे. घरी पुस्तके नेता आली पाहीजेत.

तात्या अभ्यंकरानू.. आमचा एवढा आयकाच...

लेखक वि_जय यांनी मंगळवार, 01/09/2009 12:06 या दिवशी प्रकाशित केले.
तात्या अभ्यंकरानू.. माझा एक सझेशन आसा ... तुमच्या मिसळपावान तर मराठी बेब दुनयेत चमचमीत मेजवानी दिलेली हाच.. आमच्या 'मालवण्यांसाठी' अशीच एक रसरशीत वेबसायट सुरु केलास तर बरा होयत.. नाव ठेवया 'वडे-सागोती'.

प्रविण भुवड हुतात्मा आहे

लेखक घाशीराम कोतवाल १.२ यांनी मंगळवार, 01/09/2009 10:01 या दिवशी प्रकाशित केले.
(सुचना हा लेख मी मटा मधुन सांभार घेतला आहे कारण ह्या विषयावर चर्चा होणे मला महत्वाचे वाटले जर मिपा प्रशासनाला संपादकांना ह्यात काहि वावगे वाटले किंवा जर हा लेख नियमाला धरुन नसेल तर खुशाल हा लेख ईकडुन उडवावा ) गणपती , गोविंदा आणि डबेवाले. या तीन गोष्टी सोडल्या , तर मुंबईवर सांस्कृतिक ठसा उमटवणारं अस्सल मराठी काहीही उरलेलं नाही. म्हणूनच दहिहंडीच्या पाचव्या थरावरून पडून मेलेला प्रवीण भुवड हा मराठी संस्कृती टिकवण्यासाठी धारातीर्थी पडलेला हुतात्मा ठरतो. ................... रफी अहमद किडवई रोडवरून परळ भोईवाड्याच्या दिशेने गेलो की बीएस्टी कॉलनी लागते.

(मादी)

लेखक sujay यांनी सोमवार, 31/08/2009 22:25 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा कपिल काळे यांची कवीता "गादी" ठार दिवस मादीचे..ठार दिवस मादीचे.. |धृ| अशी नसावी मादी जवळी गारीबीची जणू ही गोळी. दारीद्र्याची असेच थाळी मी बापड्याची मग गुपचिळी आई बापाची बसे दातखिळी ठार दिवस मादीचे..ठार दिवस मादीचे.. |धृ| साधीसुधी मादी नसे नशिबाचे फिरले फासे भोगामागून भोग येतसे घरच्यांना वेठितसे खिशावरती ताण बसे ठार दिवस मादीचे..ठार दिवस मादीचे.. |धृ| मादी नको भोग आवरा आयुष्याचा रस्ता सावरा खर्च पाहुनी जीव घाबरा लफड्याच्या ह्या"व्होल वावरा" येउ नका "एनी व्हेअरा" ठार दिवस मादीचे..ठार दिवस मादीचे..
काव्यरस

नारळ

लेखक प्रभो यांनी सोमवार, 31/08/2009 22:05 या दिवशी प्रकाशित केले.
परवा घरी गौरीपूजेनंतर आई-बाबा-आज्जी सोबत गप्प मारत बसलो होतो... असंच विषय निघाला की देवाला नारळ का वाढतात? आमच्या तिर्थरूपांचं म्हणण पडलं की...बर्‍याच आधी देवास नरबळी देत असत...पण ते लोकांना पटेना..काहीतरी शाकाहारी अर्पण करावं पण भाव तोच रहावा म्हणून नारळाचा पर्याय समोर आला.... आला....

अश्रू

लेखक शरदिनी यांनी सोमवार, 31/08/2009 21:45 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या लग्नाच विचार कदाचित त्यांच्या मनात घोळत असेल म्हणून त्यांनी त्याला बोलावलंय गप्पा मारायला आमच्याकडे गप्पा अशाच गमतीच्या धंद्यात काही पुढेमागे होतंय मिशा पिळत बोलायचं नफा तोटा चालायचाच. उमराव, सरदार घराणी कशी संपत चाललीएत आणि ते तेज उरलेलं नाहीये थोडंसुद्धा- असलं काहीबाही होणार अजून काही गप्पा मग मुख्य मुद्द्यावर त्यांची काळजी अजीजी आणि क्वचित वादावादी मग चहात बुडालेल्या मिशा वाळवत अंगणात बसायचं सार्‍यांनी निर्णयाच्या प्रतीक्षेत चेहरा आक्रसून अणि मी त्या वसंतातल्या चमकदार दिवशीसुद्धा खिडकीत बसून माझ्या निस्तेज शरीराला फुटलेल्या त्या निर्जीव पायाकडे पाहत अश्रू ढाळायचे ---
काव्यरस

लढा

लेखक प्रसन्न केसकर यांनी सोमवार, 31/08/2009 19:53 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी उठलो अन सहजच तारीख बघितली तर आज ३१ ऑगस्ट. हाच तो ऐतिहासिक दिवस. ५७ वर्षांपुर्वी याच दिवशी इंग्रजांनी केलेला कुप्रसिद्ध क्रिमिनल ट्राईब्ज अ‍ॅक्ट भारत सरकारने रद्दबातल केला अन शेकडो जमातींच्या लाखो भारतीयांना स्वतंत्र केले, भटक्या व विमुक्त जाती असे नाव देऊन अन देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल पाच वर्षांनी. हे एकदम लक्षात आले अन विचार आला, गेल्या सत्तावन्न वर्षांत या विमुक्त आणि भटके लोकांच्या आयुष्यात कितपत फरक पडलाय? या प्रश्नाला पहिले उत्तर होते अजिबात नाही. पण विषय जसजसा डोक्यात घोळत राहिला तसतसे मी पाहिलेले अनेक भटके विमुक्त लोक डोळ्यासमोर तरळले.

भक्तिभाव आणि काही प्रश्न

लेखक शुभान्कर यांनी सोमवार, 31/08/2009 19:35 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या गणेशोत्सव अत्यंत उत्साहात आणि संपूर्ण जोशात चालू आहे. आपण दररोज पेपरात आणि टीव्हीवर लालबागच्या राजाच्या विक्रमी गर्दीच्या बातम्या वाचतो. लोकं २०-२२-२४ तास रांगा लावून मुलाबाळांना घेऊन दर्शनासाठी ताटकळत उभे राह्तात. त्यातुन निर्माण होणार्‍या समस्यांचा (सामाजिक आणि वैयक्तिक) लोकं विचार करतात का? एवढा वेळ गर्दीत उभे राहील्याने मुलाबाळांचे जे हाल होतात. त्यामुळे ती आजारी पडण्याची शक्यताच जास्त. त्यामुळे ती बरी व्हावित म्हणुन पुन्हा एक नवस. आणि मग हे चक्र संपत नाही. शिवाय सुरक्षा यंत्रणेवर जो ताण पडतो. तो वेगळाच. भक्तिभाव मलाही मान्य आहे. पण हा भक्तिभावाचा अतिरेक नाही का?

गोष्ट------तेव्हांच्या गणेशोत्सवाची!

लेखक वैशाली हसमनीस यांनी सोमवार, 31/08/2009 18:24 या दिवशी प्रकाशित केले.
गोष्ट ४०-४५ वर्षांमागची.ठाणे गावाची.गाव तसे मध्यमवस्तीचे.शहर आणि गाव यांच्या सीमारेषेवर असलेले.बहुतेक माणसे एकमेकांच्या ओळखीची.अश्या त्या गावातल्या तेव्हांच्या गणेशोत्स्वाच्या आठवणी. आम्ही शाळकरी मुले गणपतिची सुट्टी लागण्यापूर्वीच आपापसात पैज मारीत असू,'यंदा आपण २१,११,५१ गणपतिंचे दर्शन घेणार !'आणि खरोखरच गणेशचतुर्थीला मोदकांच्या भरपेट जेवणानंतर आमच्यासारखी अनेक शाळकरी मुले आपापल्या मित्र-मैत्रिणींसह गटागटाने गणपतिदर्शनाला बाहेर पडत.घर ओळखीच

.. जगण्यात काय आहे?

लेखक राघव यांनी सोमवार, 31/08/2009 18:16 या दिवशी प्रकाशित केले.
दुष्काळ, कर्ज यात बुडालेले शेतकरी असोत का नर्मदातीरी भंगलेली घरटी असोत.. दु:ख शेवटी काळीज पिळवटणारेच असते.. नाहीच आस जेथे जगण्यात काय आहे? आयुष्य ठेवलेल्या सरणात काय आहे? दिसतात येथ सारे मिठ्ठास बोलणारे.. स्वार्थात रंगलेल्या शब्दांत काय आहे? आता नको पुन्हा ती आश्वासने, दिलासे.. बोलावयास सारे.. पोटात काय आहे? तू सांग देवराया आता कसा जगू मी.. काळीज फाटलेले.. ठिगळात काय आहे? देऊ कसा भरवसा कोमेजल्या मनाला.. तुटतात जेथ नाती मैत्रात काय आहे? असतो असाच थोडा पाऊस सांडलेला.. भेगाळल्या धरेला पुरणार काय आहे? पडत्या घरास माझ्या सोडून मीच जातो.. अवशेष दावणार्‍या दगडांत काय आहे? (विषण्ण) राघव
काव्यरस