Skip to main content

(मादी)

लेखक sujay यांनी सोमवार, 31/08/2009 22:25 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा कपिल काळे यांची कवीता "गादी" ठार दिवस मादीचे..ठार दिवस मादीचे.. |धृ| अशी नसावी मादी जवळी गारीबीची जणू ही गोळी. दारीद्र्याची असेच थाळी मी बापड्याची मग गुपचिळी आई बापाची बसे दातखिळी ठार दिवस मादीचे..ठार दिवस मादीचे.. |धृ| साधीसुधी मादी नसे नशिबाचे फिरले फासे भोगामागून भोग येतसे घरच्यांना वेठितसे खिशावरती ताण बसे ठार दिवस मादीचे..ठार दिवस मादीचे.. |धृ| मादी नको भोग आवरा आयुष्याचा रस्ता सावरा खर्च पाहुनी जीव घाबरा लफड्याच्या ह्या"व्होल वावरा" येउ नका "एनी व्हेअरा" ठार दिवस मादीचे..ठार दिवस मादीचे.. |धृ| (मिपा वरील माझे हे पहिलेच लि़खाण आहे, काहि चुकले असल्यास सांभाळून घ्या) सुजय
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1605
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

चालूद्या. चालूद्या. दुसराही पदार्थ वाढा. ----------------------------------- "मिपा खेळून घरी जावू नका. घरी आपली कोणीतरी वाट पाहत आहे." - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या