Skip to main content

मायेसाठी काहीही!

लेखक वेदश्री यांनी मंगळवार, 13/10/2009 01:46 या दिवशी प्रकाशित केले.
अगदी आईबाबांसारखीच माया करणार्‍या मॅथ्यूंच्या घरात घुसले की माझी अखंड टकळी सुरू होऊन जाते आजकाल. रोज धावतपळत का होईना पण किमान एक चक्कर तरी मारायचीच ५-१० मिनिटाचीतरी असा अलिखित नियमच झालाय माझा. माझी त्यांना आणि त्यांची मला खूपच सवय झाली आहे आता. त्यांना त्यांच्या तब्ब्येतीच्या असंख्य प्रश्नांमुळे घराबाहेर पडता येत नाही आणि मला कामानिमित्त हापिसात जावे लागत असल्याने घरात रहायला वेळ मिळत नाही. असे असल्यानेच की काय.. त्यांची बाहेरची कामे मी करायची आणि माझी घरातली काही कामे करण्यात त्यांनी मला मदत करायची, हे अगदी न सांगता आपोआपच जमून आले आहे.

(शिकरण)

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 13/10/2009 00:52 या दिवशी प्रकाशित केले.
श्रावणसरांचं 'व्याकरण' एकदमच जबरी निघालं आणि मग त्याचं शिकरण करायची जबाबदारी जर माहिती असून घेतली नसती तर ती विडंबनपंथाशी प्रतारणा झाली असती, म्हणून मग.... तू सांगितलंस म्हणून नात्यांचं शिकरण समजून घेताना संबंधांचा कुस्करा शोधू लागले तेव्हा... तेव्हा म्हणालास, ‘’सासू, नणंद, दीर आणि जावेच्या या खेळात पडतेसच कशाला? नातं दोघांसाठी असतं, अन् शिकरण नातेवाईकांसाठी. "नवर्‍याची जात एकच - कामचुकार हीच" लग्न ठरवण्याची वेळ आली तेव्हाचे हे शब्द ऐकून गपगार झाले कारण त्या लग्नात नातं दोघांचं होतं पण माझा आधारच काढून घेणारं! *** गेल्या अवकाळी स्वयंपाकघरात मी ब
काव्यरस

परिवर्तन!!!

लेखक श्रावण मोडक यांनी मंगळवार, 13/10/2009 00:13 या दिवशी प्रकाशित केले.
दोस्ता, कुठे बेपत्ता झालास? बऱ्याच दिवसांत गाठभेट नाही! भेट एकदा, समाज बदलण्याची चर्चा करू! अगदी डिलक्स नाही, पण शोभेलसा बार पाहू, व्होड्का मिळेलच तिथे; नाही तर ओल्ड मंक सांगू, अर्धा सोडा, अर्धे पाणी; संगतीला विल्स घेऊ, आपण दोघंही ब्राह्मण, त्यामुळं चिकन चिली मागवू, दोस्ता, भेट एकदा, समाज बदलण्याची चर्चा करू! कोकण, विदर्भ, मराठवाडा, उरलेला महाराष्ट्र, प्रश्नांचा नाही तुटवडा, हवे तर बेळगाव मांडू, मुंबईला फोडण्याच्या आरोळीचा माग घेऊ, डावे-उजवे करीत करीत, आपण चिअर्स म्हणू, दोस्ता, भेट एकदा, समाज बदलण्याची चर्चा करू! सेझ, खासगीकरण, उदारीकरणाचा समतेत पाय, राज्याच्या घसरलेल्या नंबरावर नाही कोणताच
काव्यरस

ज्तोतिषी लोकांनी अभ्यास करण्यासारखी आहे ही 'केस"!

लेखक सुधीर काळे यांनी सोमवार, 12/10/2009 22:55 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या सभासदांत ज्योतिष्यावर संपूर्ण विश्वास असलेले व ज्योतिष्यशास्त्रात गती असणारे व त्यावर वारंवार लिखाण करणारे अनेक ज्योतिष्यभास्कर आहेत. कांहीं कुंडलीवर विसंबून आहेत, कांहीं कुंडलीवर विसंबून नाहींत तर कांहीं "तळ्यात-मळ्यात" आहेत (म्हणजे कधी-आहेत-कधी-नाहींत असे). या सर्वांनी ओबामांच्या कुंडलीचा अभ्यास करावा व पहावे की त्यांचे ग्रहमान असे होते कां कीं पाचेक वर्षाच्या कालावधीत शिकागो येथील एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपल्या राजकीय जीवनाला सुरुवात करणारा, कुणाला फारसा माहीत नसलेला हा कृष्णवर्णीय तरुण नुसता राष्ट्राध्यक्षच होतो असे नाही पण नोबेल पुरस्कारही जिंकतो.

(ढोस)

लेखक llपुण्याचे पेशवेll यांनी सोमवार, 12/10/2009 20:12 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा ही चुचुताईंची कविता खूप खूप बेवडे जमले दर्दी तंगडी ओरपाया प्रगटले भाई रिगलची बाटली मित्रांसी द्याया चपला उडवूनी आतमधे येई चपला वाजती बाहेर भेसूर भितीने 'ती'च्या वेडा मी होई साथही दोस्तंची कशी नाही आज नशाही नाही चढलेली किंचीत बाथरुमात उभा उगाच एकाकी पडत बाहेर जरी चढलेली नाही आला नाही हा माजुरडा टार्‍या टाकूनतर कुठे गटारला नाही? अंधार्‍या रात्री हातात सिग्रेट वेळ बायकोची चुकलीका नाही? घरी बायको अवचित आली पिऊन नाही चढे मना बोच राही
काव्यरस

ढोस

लेखक पर्नल नेने मराठे यांनी सोमवार, 12/10/2009 18:54 या दिवशी प्रकाशित केले.
दूर दूर लोकल दाटली गर्दी पाडसा भेटाया परतली आई पिझाहटचा पिझ्झा चिमण्याशी द्याया पक्षीणी ढकलुनी लेडीजमधे येई डोअरबेल वाजती कानाला बेसूर कामाने वेडी ठार मी होई साथ साजणाची कशी नाही आज किंचीतही नाही ह्याचा उपयोग गॅलरीत उभी उदास एकाकी पहात बाहेर पसरली भारी आला नाही हा अंधारला रस्ता पिउन कुठे सुस्तावला राही अंधाऱ्या आकाशी घरात पसारा मदत सजणाची अजिबात नाही घरी पाहुणे उपटता कोणी आराम नाही मना उगा बोच देई

बोच

लेखक अरुण मनोहर यांनी सोमवार, 12/10/2009 17:30 या दिवशी प्रकाशित केले.
दूर दूर दारी दाटली गोधूळ पाडसा पाजाया परतल्या गाई चोचीतला चारा चिमण्याशी द्याया पक्षीणी पंखाना पसरूनी येई वेणूचे वाजती वाऱ्यावर सूर विरही वेडी व्याकुळ मी होई साद साजणाची संगतीला आज कशी कानावर किंचीतही नाही? उंबऱ्यात उभी उदास एकाकी पहात परकी पसरली राई ओसाड उजाड अंधारला रस्ता सावल्या सांडत सुस्तावला राही अंधाऱ्या आकाशी एकला तारा साथ सजणाची सुचवून जाई नभी निसटता निखळला कोणी अपशकूनाची उगा बोच देई
काव्यरस

(खाज)

लेखक llपुण्याचे पेशवेll यांनी सोमवार, 12/10/2009 15:57 या दिवशी प्रकाशित केले.
उबलेले धोतर आणि कपडे डागाळलेले खाज मला घामोळ्याची, केसही ओलावलेले बघ ठुसते ते बेंड...., गरमीच्या दु:खाने ओघळ ते पुवाचे मी सोग्याने झाकोळलेले कसे काचणे धोत्राचे अवघडजागी वळकटलेले साम्राज्य हे घामाचे अन नखही वखवखलेले बल्बफुटणे लाईट नसणे , बिब्बे आणणे शेजार्‍याचे बेंडा शेकता कळवळाणारा,बेंड ही पिकुळलेले असेच खाईन तिखटखाणे, 'बसेन' आधाराने पिकलेले बेंडसपाट, मीच कधीचे खरवडलेले आमच्या कवितेची प्रेरणा 'माज'
काव्यरस

<खाज...!>

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 12/10/2009 14:23 या दिवशी प्रकाशित केले.
उजळलेला लेख आणि प्रतिसाद डागाळलेले खाज मला लिहायचीच, असे जरी ते ढापलेले ! बघ पोसतो अहंकार...., वैचारीक दीवाळखोरीने पिसा अवतार माझा, मी विचार ठोकलेले ! कसे धागे दोन ओळीचे, हलकेच खाली बुडाले साम्राज्य हे कंपुबाजांचे, अन शेरे मातलेले ! उदासवाणे सख्या गाणे, गातो नव्या आयडीचे सर्व्हर बापुडा केविलवाणा, संपादक कळवळलेले ! असेच दळेन धागे या इथे , पिळेन लोकां आनंदाने व्याकरणाचे नियम पाठ, मी कधीचे उधळलेले ! न चुकता येई खाज मला , धागा पुढे नेण्याची सहमत सहमत होत जाई , मीच माझे लिहिलेले
काव्यरस

माज ...!

लेखक विशाल कुलकर्णी यांनी सोमवार, 12/10/2009 13:52 या दिवशी प्रकाशित केले.
उजळलेला अंधार आणि चांदणे डागाळलेले माज मला आयुष्याचा, असे जरी दृष्टावलेले ! बघ पोसतो अहंकार...., दारिद्र्याचा सुखाने दशावतार आयुष्याचे, मी अहंकारे झाकलेले ! कसे चांदणे पुनवेचे, हलकेच अंधारात बुडाले साम्राज्य हे तिमीराचे, अन तारेही मातलेले ! उदासवाणे सखे चांदणे, गातो गाणे अंधाराचे चंद्र बापुडा केविलवाणा, नभ ही कळवळलेले ! असेच गाईन जीवनगाणे, जगेन आनंदाने जिवनाचे सारीपाट, मीच कधीचे उधळलेले ! विशाल