ज्तोतिषी लोकांनी अभ्यास करण्यासारखी आहे ही 'केस"!
आपल्या सभासदांत ज्योतिष्यावर संपूर्ण विश्वास असलेले व ज्योतिष्यशास्त्रात गती असणारे व त्यावर वारंवार लिखाण करणारे अनेक ज्योतिष्यभास्कर आहेत. कांहीं कुंडलीवर विसंबून आहेत, कांहीं कुंडलीवर विसंबून नाहींत तर कांहीं "तळ्यात-मळ्यात" आहेत (म्हणजे कधी-आहेत-कधी-नाहींत असे).
या सर्वांनी ओबामांच्या कुंडलीचा अभ्यास करावा व पहावे की त्यांचे ग्रहमान असे होते कां कीं पाचेक वर्षाच्या कालावधीत शिकागो येथील एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपल्या राजकीय जीवनाला सुरुवात करणारा, कुणाला फारसा माहीत नसलेला हा कृष्णवर्णीय तरुण नुसता राष्ट्राध्यक्षच होतो असे नाही पण नोबेल पुरस्कारही जिंकतो. असे काय आहे त्याच्या कुंडलीत?
(उत्तर आधीच माहीत असले तरी अभ्यास इमानदारीत करावा!).
तसेच त्यांच्या हस्तरेखांचाही सूक्ष्मपणे अभ्यास व्हायला हवा.
ही व्यक्ती एक असमान्य व 'परंतु यासम हा' जातीतली आहे.
माझा स्वतःचा ज्योतिष्यशास्त्रावर अजीबात विश्वास नाहीं, पण माझे मतपरिवर्तन होण्याची इथे छान संधी आहे!
सुधीर काळे
वाचन
9217
प्रतिक्रिया
0