मायेसाठी काहीही!
अगदी आईबाबांसारखीच माया करणार्या मॅथ्यूंच्या घरात घुसले की माझी अखंड टकळी सुरू होऊन जाते आजकाल. रोज धावतपळत का होईना पण किमान एक चक्कर तरी मारायचीच ५-१० मिनिटाचीतरी असा अलिखित नियमच झालाय माझा. माझी त्यांना आणि त्यांची मला खूपच सवय झाली आहे आता. त्यांना त्यांच्या तब्ब्येतीच्या असंख्य प्रश्नांमुळे घराबाहेर पडता येत नाही आणि मला कामानिमित्त हापिसात जावे लागत असल्याने घरात रहायला वेळ मिळत नाही. असे असल्यानेच की काय.. त्यांची बाहेरची कामे मी करायची आणि माझी घरातली काही कामे करण्यात त्यांनी मला मदत करायची, हे अगदी न सांगता आपोआपच जमून आले आहे.
मिसळपाव