Skip to main content

<खड्ड्या तुझ्या मिठीत रे....... >

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 19/11/2009 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा : सखये तुझ्या मिठीत..... तुज पाहिल्या क्षणी मी , विरलो जरा तिथेच रस्त्यात होतास एकटा, माणसांच्या या दाटीत रे! कोवळ्या उन्हांत जेंव्हा , होतास तू गढूळलेला ओलांडता कोलमडलो , चिखलाच्या मिठीत रे! अन्दाज सखोलीचा आला मला न केंव्हा सगळे तुझ्यात झाले , आडवे किती पटीत रे ! स्कूटर मोटार सायकल ; ऐसा भेदभाव कधी न झाला सारेच आडवे झाले ; खड्ड्या तुझ्या मिठीत रे गांगरलो असा मी , दणका तुझा देण्याला भिक्कार भीजलेला , कुठल्या चिखलवटीत रे? खणले तुला न कोणी ; शान तू या रस्त्याला तूज मुजवले कोणी नाही ; खलित्यांच्या रेटारेटीत रे हार मानिली सार्‍यानी ; तू तसाच राहिला खड्ड्या सारेच रे पडले ,

मराठी आणि भय्या

लेखक अरभाट आणि चिल्लर यांनी गुरुवार, 19/11/2009 06:35 या दिवशी प्रकाशित केले.
गेले बरेच दिवस मी मिपावर मराठी-भय्या ही चर्चा वाचतो आहे. त्यानिमित्ताने काही लिहावेसे वाटले. ऑस्ट्रेलियामधे किन्वा इतर ठिकाणी भारतिय विद्यार्थ्याना मारहाण झाली म्हणून आपण त्यान्चा लगेच निषेध करतो. भारत सरकारने त्या त्या सरकारना याचा जाब विचारावा अस आपण म्हणतो. अमेरिकेत सिलिकॉन व्हलीत बहुसन्ख्य भारतिय असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो. पण त्याचबरोबर भय्या किन्वा परप्रान्तियानी मुम्बैमधे येउन जॉब करु नयेत असही आम्हाला वाटत. आपण म्हणतो कि भय्या लोकान्ची लायकी दूध विकण्याची आहे, मग अस असेल तर आपले जॉब ते पळवतील अशी भिती आपल्याला का वाटते? याचा अर्थ आपल्यामधे काहीतरी कमी आहे.

प्रकाशवाटा...

लेखक विमुक्त यांनी बुधवार, 18/11/2009 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
प्रकाशवाटा वाचलं... डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदा आमटे आणि इतर काही सहकाऱ्यांनी बाबा आमटेंच्या मार्गदर्शनाने सुरु केलेल्या हेमलकशातल्या लोकबिरादरी प्रकल्पाबद्दल हे पुस्तक आहे... हेमलकशातल्या लोकबिरादरी प्रकल्पाचा जन्म का आणि कसा झाला... प्रकल्प सुरु केल्यावर आलेल्या अडचणीं वर मात कशी केली... तिथल्या आदिवासींना स्वयंपूर्ण कसं केलं... जंगली प्राण्यांबद्दलचे अनुभव; त्यांच्या साठी सुरु केलेलं अनाथालय... जिवावर बेतलेले प्रसंग...

कोडी

लेखक क्रान्ति यांनी बुधवार, 18/11/2009 20:03 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येक वादळाला केली बहाल होडी तेव्हाच जाणली मी जगण्यामधील गोडी साधे, सपाट रस्ते नव्हतेच या दिशेला आधार सावल्यांचा झाकोळल्या निशेला पायांत शृंखला अन् वाटाहि नागमोडी एकेक संकटाला आमंत्रणे दिली मी वैशाख-काहिलीचीही वाट पाहिली मी अन् बोलले, "वसंता, तू घे उसंत थोडी!" मौनात राहण्याने नुकसान फार केले जाणून आपल्यांनी पाठीत वार केले माया अजून उरली का काळजात थोडी? या जन्मसिद्ध भोगांचे अर्थ काय होते? जावे जिथे, तिथे का गुंत्यात पाय होते? मी सोडवीत गेले, तू घातलीस कोडी!
काव्यरस

इन्द्राय स्वाहा,तक्षकाय स्वाहा.

लेखक कलंत्री यांनी बुधवार, 18/11/2009 19:46 या दिवशी प्रकाशित केले.
काही समस्या पुरातन असतात आणि त्या त्या काळात त्यावर काढले गेलेले उत्तरही नेहमीच वादात अडकलेले असते असे आढळते. पुराणामध्ये एक दाखला आहे, इंद्राने तक्षकाचा बचाव करण्याचा प्रयत्न केला आणि ऋषींनी तक्षकाचा बचाव करशील तर तुलाच ( इंद्राला) स्वाहा करु असे सांगितले, पण इंद्रसारख्या देवांच्या राजाला स्वाहा कसे करणार असे आढळले. शेवटी इंद्रही राहिला आणि तक्षकही राहीला असे पुराणातील अभ्यास सांगतो. तसेच काहीसे सचिन आणि ठाकर्‍यांच्या वादात घडले.

हरिश्चंद्राची फॅक्टरी

लेखक घाटावरचे भट यांनी बुधवार, 18/11/2009 14:54 या दिवशी प्रकाशित केले.
हरिश्चंद्राची फॅक्टरी (स्पॉयलर ऍलर्ट आणि इतर: जरी या लेखात चित्रपटाच्या कथानकाबद्दल माहिती दिलेली असली, तरी चित्रपट पाहाण्यास उत्सुक पब्लिकने बिनधास्त हा लेख वाचावा. कारण चित्रपटाची मजा काय घडतं यात नसून ते पडद्यावर कसं दाखवलंय यात आहे, सबब चिंता नसावी. बाकी या सिनेमाचा व्यावसायिक रीलीज भारतात जानेवारी महिन्यात होणार आहे असं कळलं.

अपत्य संगोपन-समाधान कीं समस्या?

लेखक सुधीर काळे यांनी बुधवार, 18/11/2009 12:12 या दिवशी प्रकाशित केले.
अपत्य संगोपन-समाधान कीं समस्या? हा PDF format मिपाचे एक सभासद श्री. अक्षय पुर्णपात्रे यांनी स्वेच्छेने व स्वयंस्फूर्तीने आपल्या व्यवसायातून वेळात वेळ काढून पुनर्टंकित केला याबद्दल सर्वप्रथम त्यांचे मनःपूर्वक आभार. हा लेख मी सहा महिन्यापूर्वी लिहिला होता उत्तम कथा या मासिकाच्या निबंधस्पर्धेसाठी. पण मला १००० शब्दांच्या शब्दसंख्येबद्दलची मर्यादा सांगायला तिथले कर्मचसरी विसरले. माझा लेख ३००० शब्दांचा झाला पण संपादिकाबाईंना तो आवडला व तो त्यांनी थोडासा संक्षिप्त करून प्रसिद्धही केला.

एक धागा सूखाचा

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 18/11/2009 10:28 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेमचंदांची एक कथा आहे. कधी काळ ऐकलेली... दोन मित्र होते. दोघे ही अगदी गरीब . नोकरी नाही हाती पैसे नाहीत. काही काम मिळते का ते शोधत गावभर फिरायचे आणि रात्री जेवायला मिळाले तर जेवायचे अथवा पाणी पिऊन झोपायचे हा त्यांचा दिन क्रम हिवाळ्या चे दिवस होते बरीच थंडी होती. दिवस भर वणवण फिरून काहीच काम मिळाले नव्हते नुसतीच पायपीट. शिणलेल्या देहाला विश्रांती साठी झोपडीत आश्रय.... अशा स्तिथीत झोपडीच्या दाराला अडसर म्हणून लावलेली वीट वार्‍याने निघाली.

सखये तुझ्या मिठीत.....

लेखक उदय सप्रे यांनी बुधवार, 18/11/2009 10:01 या दिवशी प्रकाशित केले.
सखये तुझ्या मिठीत..... तुज पाहिल्या क्षणी मी , नुरलो जरा न माझा मग एकटाच होतो , माणसांच्या या दाटीत ! कोवळ्या उन्हांत जेंव्हा , होतीस न्हायलेली ते रूप कोंडले मी , पापण्यांतल्या फटीत ! अन्दाज यौवनाचा आला तुला न केंव्हा सगळे तुझ्यात होते , उजवे किती पटीत ! झंकारलो असा मी , हुंकार तुझा घेण्याला होकार लाजलेला , कुठल्या सुरावटीत ? जगणे कधीच गेले , माझे तुझ्या मुठीत .....जगणे कधीच गेले , माझे तुझ्या मुठीत ; मरणे जमेल का गं , सखये तुझ्या मिठीत?सखये तुझ्या मिठीत?
काव्यरस