Skip to main content

बटन्ड

लेखक विनायक प्रभू यांनी शुक्रवार, 12/02/2010 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
आज ऑफिस मधुन येताना खुपच उशिर झाला होता. थकवा तर जाणवतच होता. हात पाय धूउन तो जेवायला बसला. .................................................... समोर वाफाळलेले जेवण. पेंग घालवण्याकरता टीवी लावला. कुठलासा सिनेमा. नेहेमीचा नर्म श्रुंगाराचा सीन. हीरो ऑफिसला निघालेला. शर्ट चे बटन तुटलेले. हीरॉइन सुई दोरा घेउन बटन शिवुन देते. आणि मग........ तोच सीन डोक्यात घेउन तो झोपी गेला. स्वप्नात सुद्धा त्याच सीन ची पारायणे. ........................................... आज ऑफिसला लवकर जायची गरज नव्हती. शर्ट चढवता चढवता त्याला कालचा सीन आठवला. इथे तिथे बघत त्याने शर्टाचे बटन तोडले. "अग शर्टाचे बटन नाहीये वरचे" ना

आटपाट नगर होतं...

लेखक ऋषिकेश यांनी शुक्रवार, 12/02/2010 10:05 या दिवशी प्रकाशित केले.
आटपाट नगर होतं. अतिशय समृद्ध नगर. तिथे चहुकडून लोक येत असत. त्या नगरीत कधी कोणाला काम मिळालं नाहि असं झालंच नाहि. कष्टकरीच नव्हे तर विद्यार्थी, व्यापारी सगळ्यांची ती पंढरीच होती म्हणा ना! तर ही गोष्ट आहे एका चंदूची. चंदू लहानपणापासूनच हुशार. उत्तम शिक्षण घेतलेलं. नोकरीसाठी तो ह्या समृद्ध नगरीत आलेला. अबब! केवढ्या उंच इमारती, केवढा झगमगाट केवढी गर्दी म्हणता म्हणत तो त्या गर्दीचा भाग कधी झाला त्यालाही कळलं नाहि. त्या शहरानेही त्याला कवेत घेतलं होतं. एक दिवशी त्याच्या मित्राने विचारलं काय रे संध्याकाळच्या वेळेत टॅक्सी चालवणार का? उत्तम शिक्षण असलं तरी अजून पैसा मिळाला तर हवाच होता.

पण शाहरूख खान ने एक चूक केली

लेखक देवदत्त यांनी गुरुवार, 11/02/2010 21:22 या दिवशी प्रकाशित केले.
शाहरूख खानने आय पी एल च्या खेळाडूंच्या लिलावानंतर पाकिस्तानी (म्हणत आहेत त्याप्रमाणे तर सर्वच देशांच्या) खेळाडूंना समर्थन दिले. शिवसेनेने त्याविरोधात दंड थोपटले आणि 'माय नेम इज खान' वर बहिष्कार टाकण्यास सांगितले. शाहरूख खान म्हणतो, " मला भारताबद्दल देशप्रेम आहेच. मी त्याविरोधात काही बोललो नाही." (नेमकी त्याची वाक्ये नाहीत पण आशय तोच). गेले आठवडाभर हो नाही चालत, पुन्हा 'माय नेम इज खान' चा विरोध समोर आला. काँग्रेस सरकारने दुटप्पीपणा करत लगेच ह्या सिनेमाला सुरक्षा देण्याचे ठरवले. इतर वेळी ' सुरक्षा मागाल तर देऊ' ही भूमिका. शाहरूख खानने काही चर्चा करण्यास नकार दिला.

या स्पर्धेचं काय झाल?

लेखक युयुत्सु यांनी गुरुवार, 11/02/2010 20:01 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपावावर गेले काही महिने एका परिषदेची आणि त्या निमित्त आयोजित केलेल्या एका निबंध स्पर्धेची खुप जाहिरात केली गेली होती. मला आठवतं त्याप्रमाणे मिळून सार्‍याजणी या मासिकाने यात पुढाकार घेतला होता. पुढे याचं काय झालं ते जाणून घेण्यास उत्सुक आहे.

आओ म्हारो जैसलमेर

लेखक आपला अभिजित यांनी गुरुवार, 11/02/2010 19:31 या दिवशी प्रकाशित केले.
झी टीव्हीच्या एका सीरियलच्या शूटिंगसाठी जैसलमेरला घेऊन जाण्याचं निमंत्रण आलं होतं. माझी या दौऱ्यासाठी निवड झाल्यानं एक नवं ठिकाण पाहायला मिळण्याचं समाधान मिळालं. राजस्थानात भरतपूर अभयारण्यात मी सात-आठ वर्षांपूर्वी गेलो होतो. तेव्हा जयपूरही फिरून आलो होतो. पण जोधपूर-जैसलमेरची वारी पहिल्यांदाच घडणार असल्यानं जरा अधिक उत्साहित होतो. प्रवास जरा आडनिडा होता. तीन फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता मुंबईहून विमानाने जोधपूरला जायचं होतं. त्यापूर्वी सकाळी मला पुण्याहून मुंबईला पोचणं आवश्‍यक होतं. कूल कॅबची चौकशी करून सकाळी लवकर निघायचं ठरवलं. साडेपाचची कूल कॅब फोन करकरून शेवटी सहा वाजता अवतीर्ण झाली.

देणे

लेखक क्रान्ति यांनी गुरुवार, 11/02/2010 18:47 या दिवशी प्रकाशित केले.
निःशब्द चांदण्यांनी जागेपणी पहावे
स्वप्नात तुझे येणे
बेभान वादळांनी श्वासात जागवावे
आवेग जीवघेणे
अस्वस्थ जीव होता गावे तुझ्या स्वरांनी
जादूभरे तराणे
हळुवार भावनांना फुलवून जागवावे
माझे अबोल गाणे
मी मुग्ध, तूही शांत, ही गूढरम्य
काव्यरस

चॉकलेट चिप मूस

लेखक स्वाती२ यांनी गुरुवार, 11/02/2010 18:37 या दिवशी प्रकाशित केले.
चॉकलेट चिप मूस साहित्य १ कप सेमी-स्वीट चॉकलेट चिप १ पाकिट(८ औस) क्रिम चीज मऊ केलेले १ टी स्पून वॅनिला १ डबा(८ औस) फ्रोझन व्हिप्ड टॉपिंग, थॉ करुन शोभेसाठी पाकातल्या चेरी मायक्रोवेव मधे चॉकलेट चिप्स वितळवून घ्या. २-३ मिनिटात चिप्स वितळतात. चमच्याने ढवळून एकजीव करून बाजूला ठेवा. एका बोल मधे क्रिम चीज आणि वॅनिला फेटून घ्या.

(नको आणखी )

लेखक अमोल केळकर यांनी गुरुवार, 11/02/2010 16:58 या दिवशी प्रकाशित केले.
(नको आणखी ) संदर्भ : भारताचा क्रिकेट सामन्यात नुकताच झालेला पराभव प्रेरणा : नको आणखी ----------------------------------------------------------------------------------- मांडणी नव्याने नको आणखी सणकून हारणे नको आणखी उदास व्हावे पुन्हा मीच का क्रिकेट पाहणे नको आणखी येणे तुझे क्षणभराचेच का बारा वाजणे नको आणखी बॅटीत जबरी जहिराती तुझ्या लोगो लावणे नको आणखी धुंदी चढावी फटक्यानी तुझ्या परत फसवणे नको आणखी जगणार आहे तुझ्याच विना नवीन सामने नको आणखी --------------------------------------------------------------- अमोल केळकर
काव्यरस

देवगंधर्वांचं 'पिया कर..', थोडं गोविंदरावांचं आणि थोडं नारायणरावांचं 'मधुकर वन वन'!

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 11/02/2010 16:38 या दिवशी प्रकाशित केले.
II स्वरभास्कर पं भीमसेन जोशी प्रसन्न II
राम राम मिपाकरहो, देवगंधर्व भास्करबुवा बखले. जयपूर, आग्रा, ग्वाहेर गायकीवर हुकुमत. गाण्यातला साक्षात भास्करच..त्यांची देस रागातली बंदिश.. 'पिया कर धर देखो.. ' सौ शैला दातार. एक गुणी गायिका. योगायोग असा की शैलाताई या भास्करबुवांच्या नातसून.. शैलाताईंनी नमुन्यादाखल गायलेली देस रागातली बंदिश येथे ऐकता येईल.. भास्करबुवांनी छान एकतालात बांधलेली ही बंदिश अगदी प्रसन्न आहे..मुळात देस हा रागच प्रसन्न.