Skip to main content

विकी-लीक्स

लेखक बहुगुणी यांनी बुधवार, 07/04/2010 21:14 या दिवशी प्रकाशित केले.
विकी-लीक्स या संस्थळाविषयी नुकतंच वाचनात आलं. गेले २-३ दिवस या संस्थळावरील खालील वृत्तामुळे आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था, माध्यमं आणि इंटरनेट यांना खळबळून टाकलं: WikiLeaks has released a classified US military video depicting the indiscriminate slaying of over a dozen people in the Iraqi suburb of New Baghdad -- including two Reuters news staff. ....The video, shot from an Apache helicopter gun-site, clearly shows the unprovoked slaying of a wounded Reuters employee and his rescuers.

<तुझे मौन>

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 07/04/2010 19:29 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा ही माझं मौन, निगरगट्ट नगरसेवकासारखं लोचट, हलकट्ट, अविश्वासार्ह, चपलेने झोडावसं||१|| माझं मौन, धंदेवाईक डॉक्टर उर्मट्पणे खीसा कापणारं , उगाचच चेक अप करायला लावणारं ||२|| तुझं मौन, कपाळावरची आठी कशासाठी हे न कळणारी, पण भीरड आणणारी||३|| तुझं मौन, एक अबोल वाद घुम्यासारखे राहून, उगाच भांड्याना पोचे आणणारा ||४|| तुझं मौन, तुला पटलेली खात्री माझ्या वागण्याची घरी उशीरा येण्याच्या कारणाची||५||

अभिनंदन

लेखक तिमा यांनी बुधवार, 07/04/2010 19:02 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिपाकर बांधवांचे त्रिवार अभिनंदन!!! सगळ्या मिडियाने लावून धरलेल्या फालतू विषयाला अजिबात स्पर्श न केल्याबद्दल! यावरुन मिपाकर अतिशय उच्च अभिरुचीचे आहेत हे सिध्दच झाले!

गुडबाय एट हंड्रेड..

लेखक डॉ.प्रसाद दाढे यांनी बुधवार, 07/04/2010 18:41 या दिवशी प्रकाशित केले.
युरो ४ वा भारत ४ मानक पूर्ण करू शकत नसल्याने मारूती ८०० हे मॉडेल भारतातील प्रमूख शहरांतून बंद करण्यात आले आहे. लवकरच तिची निर्मितीही थांबवण्यात येईल असे मला वाटते. १९८४ पासून अतिशय लोकप्रिय असलेल्या ह्या गाडीचा प्रवास आता थांबत आहे. भारतातील चार-चाकी वाहनविश्वात क्रांतीचा अग्रदूत असलेली ही कार एकेकाळी अनेक लोकांची ड्रीम्-कार होती. त्याअगोदर सर्वसामान्यांना उपलब्ध असलेल्या गाड्या म्हणजे प्रिमियर पद्मिनी, अ‍ॅम्बॅसिडर, कॉन्टेसा व जीप.

मिपा अस का झाल?

लेखक शानबा५१२ यांनी बुधवार, 07/04/2010 18:01 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा अस का झाल? हो आज खुप दीवसांनी मिपावर आलो आणि काय मजा नाही आली!!शप्पथ वैतागायला झाल.......हे पहील अस नाही व्हायच.हा व्ययक्तिक अनुभव असु शकतो पण काहीजण सहमत असतील अस वाट्त. हे लिहण्यात उद्देश वगैरे काही नाही.सहज लिहतोय,जे जानवल ते.पहील प्रतिसाद वाचायला पण मजा यायची.आज ते लेख काय आणि काय त्या प्रतिक्रिया!!सर्वच पचपचीत वाटल. आणि ते युयुत्सु असे लेख कोणत्या उद्देशाने लिहतात ते काय कळत नाही.आज 'नवे लेख' मधली दोन पाने वाचली व हे लिहावसे वाटले. आपल्याला मंगे..पाव...

दु:ख

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी बुधवार, 07/04/2010 16:34 या दिवशी प्रकाशित केले.
साहतो मी दु:ख देवा अजून किती साहु रे जाळशील अजून किती अजून किती रक्त रे..! संपु दे यात्रा माझी त्राण नाही राहिले प्रेत नुसते चालले हे प्राण तर केव्हांच गेले वेदना ही कोणती..? कि मेल्यावरी पण जाळते हि कोणती पेटली चिता ..? कि प्रेत माझे किंचाळते..!!
काव्यरस

हलकेच हातांनी घास भरव तू गे मजला माता

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 07/04/2010 09:57 या दिवशी प्रकाशित केले.
हलकेच हातांनी घास भरव तू गे मजला माता
हलकेच हातांनी घास भरव तू गे मजला माता का कधी जाणे भेटेन न भेटेन पुन्हा तुला ग आता ||धृ||
काव्यरस

झोप आणि डुलकी

लेखक सुचेल तसं यांनी बुधवार, 07/04/2010 04:39 या दिवशी प्रकाशित केले.
झोप हे एक आपल्याला मिळालेलं वरदान आहे असं मला कायम वाटत आलंय. कुठेतरी वाचल्याच आठवतंय की गांधीजी फक्त तीन तास झोपायचे - १२ ते ३. एवढ्या कमी वेळात तर माझी डुलकी पण होत नाही. उगीच नाही त्यांना महान म्हणत. डुलकी वरून आठवलं की काही लोकं डुलकीला "डूकली " म्हणतात. ते पण एवढ्या आत्मविश्वासाने की आपल्यालाच शंका यावी की खरा शब्द डूकली आहे की काय. असो, झोप आणि डुलकीमधला फरक म्हणजे डुलकी ही उभ्या उभ्या, बसल्या जागी घेता येते. तुम्ही बसमध्ये किंवा लोकल मध्ये प्रवास करताना, हापिसात जेवण झाल्यावर बसल्या जागी काढता ती डुलकी. झोप म्हणजे पंखा फुल स्पीडवर लावून, जाड पांघरूण घेऊन १०-११ तास घेता ती खरी झोप.

(केवढे चावणे हे गजल दरगजल)

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 06/04/2010 22:34 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली जालावर वावरताना असं लक्षात येतं की गजलांचा आणि शायरांचा सुकाळ झालाय! अरे काय असतात एकेक गजला! आजच एक 'गजल' मला चावली आणि मग कळवळलोच.... केवढे चावणे हे गजल दरगजल... काय जाणे कुणी मारली ही मजल! मी कितीदातरी नाडि ओढायचो अन तुमानीमधे व्हायचे मग बदल काय दुर्भिक्ष हे कल्पना आटल्या... का अशी देत आहेस घंटी डबल? जाम हैराण मी जाहलो याइथे जो उठे तो म्हणे मी नवाबे गझल फासतो आज कोणी ... उद्या वेगळा का 'मनोगत' विकल 'मायबोली' विकल? आज सैलावल्यासारखे वाटते पापडांच्यामधे एक चपटी तरल मेंढरासारखी मेंबरे कावली हाण तू, हाण तू, हाण 'रंगा' बुकल चतुरंग
काव्यरस