Skip to main content

<तुझे मौन>

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 07/04/2010 19:29 या दिवशी प्रकाशित केले.

आमची प्रेरणा ही
माझं मौन, निगरगट्ट नगरसेवकासारखं
लोचट, हलकट्ट, अविश्वासार्ह,
चपलेने झोडावसं||१||

माझं मौन, धंदेवाईक डॉक्टर
उर्मट्पणे खीसा कापणारं ,
उगाचच चेक अप करायला लावणारं ||२||

तुझं मौन, कपाळावरची आठी
कशासाठी हे न कळणारी,
पण भीरड आणणारी||३||

तुझं मौन, एक अबोल वाद
घुम्यासारखे राहून,
उगाच भांड्याना पोचे आणणारा ||४||

तुझं मौन, तुला पटलेली खात्री
माझ्या वागण्याची
घरी उशीरा येण्याच्या कारणाची||५||

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1494
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया