लव्ह युवर जॉब. डु यु?
नमस्कार मंडळी.
आजकालच्या शक्यतो तरुण मंडळींच्या गप्पांमधे एक सर्रास आढळणारा विषय. आमीर खानच्या थ्री ईडीयट्स मधे सुद्धा हाच संदेश दिला आहे. जे आवडते तेच मन लावुन करा, यशस्वी आणि आनंदी व्हाल. उगाच पैसे कमवायचे म्हणुन एखादे काम करु नका, त्यातुन पैसा मिळेल पण जीवनाचा आनंद नाही. ह्या विषयावर मी/तुम्ही सुद्धा कित्येक जणांशी चर्चा केली असेल. पण याच खरं उत्तर एखादा सामान्यवर्गीय (सामान्यवर्गीयांची व्याख्या व्यक्तीसापेक्ष) देऊ शकेल?
सही
चांदण्यात न्हालेलं ते रंगमंदिर आणि तो पूर्ण चंद्र
अत्तराचा सुवास फुलांचे रंग नि सनईचे सूर मंद्र
शिफॉन साड्या मलमली कुर्ते अभिजनांची गर्दी
तिला पाहायला आलेले प्रेक्षक चाहते आणि दर्दी
कोपर्यात तो उभा गुलाबांतल्या निवडुंगासारखा
दखल घ्यायला अपात्र नि एका नजरेसही पारखा
हातात एक पत्र अन् प्रतीक्षा त्या स्वप्नसुंदरीची
जरी स्थिर उभा तरी उघड व्याकुळता अंतरीची
स्मरतील का तिला दिवस मुग्ध किशोरवयातले
तासनतास गप्पा ती गाणी ते क्षण पावसातले
जरी आज ती श्रीमती अन् विख्यात अभिनेत्री
जपली असेल का तिने ती बालपणीची मैत्री
'आल्या आल्या'चा गलका अन चाहत्यांचा गराडा
धावला तोही ओढीने आणि घुसला तोडून वेढा
उभा क्षणभ
काव्यरस
कोर्टावरील ताण कमी करण्यासाठी - ’प्रत्येक विलंबासाठी तात्काळ भरपाई’
भारतातील न्यायव्यवस्थेचा दर्जा सुधारण्यासाठी खटल्यांचे अनावश्यक रेंगाळणे कमी करता आले तर लोकांचा न्यायव्यवस्थे वरील विश्वास वाढण्यास मदत होईल. हे कसे करता येईल याचा विचार गेले कित्येक दिवस माझ्या डोक्यात रेगांळत आहेत. भारताबाहेर प्रगत देशांमध्ये हे रेंगाळणे किती प्रमाणात आहे याची मला कल्पना नाही. न्यायव्यवस्था सर्वात संथपणे नव्या पद्धती, तंत्रे यांचा स्वीकार करते असे माझे निरिक्षण आहे. या विषयावर जेव्हा सार्वजनिक चर्चा होते तेव्हा फक्त वकीलांच्या नैतिकतेला आवाहन केले जाते ( जे सर्वार्थाने निरर्थक असते ). जनतेच्या दबावाशिवाय यात कोणतीही सुधारणा होईल असे वाटत नाही.
कॉफी केक

प्रिय राहूल देशपांडे,
प्रिय राहुल देशपांडे,
(केवळ वयाने मोठा असल्यामुळे) अनेक आशीर्वाद,
मी तात्या अभ्यंकर. तुझा एक चाहता. तुझ्या गाण्यावर लोभ असलेला. साक्षात वसंतरावांचा नातू म्हणून तुझं खूप कौतुक असलेला. वसंतरावांच्या आणि कुमारांच्या गायकीचा एक छान ब्लेन्ड आहे तुझ्या गाण्यात. मुकुल कोमकलींसारख्या अवलियाचा तू शागिर्द. जे काही गातोस ते सुरेल गातोस, लयदार गातोस. एका बड्या खानदानी गवयाचा नातू म्हणून कुठेही दुराभिमान नाही, बडेजाव नाही, की त्यांची कुठे भ्रष्ट नक्कल नाही.
काही बाही - २
भाग १
एकदा वाचुन झाल्यावर कधीही कुठुनही वाचता येतो, त्यातील कुठलेही पान काढून वाचता येते, त्यावर मनन वा चिंतन करता येते असा ग्रंथ म्हणजे दासबोध. दासबोधातील मराठी खुपच सुलभ आहे. फार कमी ठिकाणी शब्दकोशाचे सहाय्य घ्यावे लागते. रोजच्या जीवनातील घटनांमधे प्रचिती येणारे रोकडे पुस्तक असं म्हटलं तरी चालेल.
ब्रह्मचारी माणसाने प्रापंचिक माणसाला केलेला उपदेश असला तरी समर्थांच्या तळागाळातील लोकांना असलेल्या समस्यांचे भान थक्क करुन सोडते.
पहिल्याच दशकातील पहिला समास. ग्रंथारंभलक्षण.
गंमतीची गोष्ट
मी लिहायचं
तुम्ही नावाजायचं
मी आनंदायचं
परत लिहायचं
हा आपलातुपला गंमतनाच!
नाचातली गंमत पळून जाताना पाह्यली पर्वा.
लिहिण्याचा हात धरून पळून गेली.
खूप विनवलं तिला थांब म्हणून.
पण ऐकेना.
तिचं टुमणं एकच
आळस सोड कष्ट कर
कसं जमावं?
जातेस तर जा बाई, मी कोण अडवणार तुला!
पण शक्य असेल तर लिहिण्याला सोड.
'त्याच्याशिवाय मी आणि माझ्याशिवाय लिहिणं
कल्पना तरी कशी करू शकतेस तू?'
गंमत आपला स्वभाव सोडून फणकारली!!
गेलीच निघून
आता मी नाही लिहायचं
तुम्ही लिही ना म्हणायचं
माझी मान वर
तुम्ही परत लिही ना म्हणायचं
आता माझी कॉलरच ताठ!!
स्वतःला कुरवाळण्याचा उगाच-नाच!!
-इतिश्री निर्जाबाई उवाच!!
फसवणूक प्रकरण २२
मी एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये प्रोग्रॅमर म्हणून काम करतो. तेथे माझ्या स्वतःच्याच बाबतीत घडलेली एक छोटीशी घटना. सुमारे २ वर्षांपूर्वी मी या कंपनीत पूर्ण वेळ कर्मचारी म्हणून रुजू झालो. २००९ सालच्या जानेवारी महिन्यात कंपनीला एक अजस्त्र बजेट असलेले अमेरिकन प्रोजेक्ट मिळाले आणि एप्रिल २००९ मध्ये रीतसर इंटरव्ह्यू घेउन आधीच्या प्रोजेक्टवरुन या प्रोजेक्टवर मला रुजू करण्यात आले. या प्रोजेक्टचे वैशिष्ट्य हे की एखाद्या माणसाच्या क्षमतेबद्दल जराशीसुद्धा शंका आली तरी त्या माणसाला ताबडतोब कामावरुन कमी करण्यात येत असे. त्यामुळे प्रोजेक्ट जरी खूप चांगले असले तरी ती सुळावरची पोळीच होती.
मिसळपाव