Skip to main content

शोमन सुभाष घईंनी दिग्दर्शन केलेला सर्वात बकवास चित्रपट कोणता?

लेखक योगी९०० यांनी बुधवार, 01/09/2010 16:13 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 1211
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

कोण सुभाष घई ? आणी त्याच्या कार्याविषयी मिपावर चर्चा व्हावी येवढा तो मोठा आहे का ?

In reply to by Pain

बरोबर आहे. सगळ्यात टुकार चित्रपट ठरवायचा म्हणजे आधी सगळे पाहावे लागतील आणि मग मत द्यायला जिवंत कोण राहील? :-)

In reply to by नगरीनिरंजन

भलत्याच ब्वॉ अपेक्षा तुमच्या! मराठी संस्थळांवर मत व्यक्त करायला अभ्यास थोडीच करावा लागतो! ;-)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

भलत्याच ब्वॉ अपेक्षा तुमच्या! मराठी संस्थळांवर मत व्यक्त करायला अभ्यास थोडीच करावा लागतो!
+१ कीबोर्ड बडवणारे अनेक आहेत. विषयाची समज असो वा नसो..!

In reply to by नगरीनिरंजन

बरोबर आहे. सगळ्यात टुकार चित्रपट ठरवायचा म्हणजे आधी सगळे पाहावे लागतील आणि मग मत द्यायला जिवंत कोण राहील? एकदम बरोबर..

In reply to by Pain

"वरचे सगळे" असा पर्याय हवा. पण मला का कोण जाणे कर्ज , विधाता आणि हिरो हे चित्रपट त्याकाळात आवडले होते (मी फार लहान होतो जेव्हा हे चित्रपट आले त्यावेळी). म्हणून हा पर्याय ठेवला नाही. आज ते चित्रपट पाहिले किंवा त्या सारखे चित्रपट पाहीले तर तितकी मजा वाटणार नाही.. खालिल चित्रपट टाकायचे राहीले ताल खलनायक बाकी तसे बरेच आहेत्..(क्रोधी, कालिचरण, black and white) ..पण उल्लेखनिय नाहीत..

उगा सुभाष घईंना नावे ठेवायचे फॅशन आली आहे. त्यांनी एकाहुन एक दर्जेदार चित्रपट दिले आहेत. त्यांनी आज हे चित्रपट काढलेले नसले असते तर मी फारएण्ड भाउंच्या समीक्षणांना मुकलो असतो. आणी आयुष्यातले गडाबडा लोळुन हसण्याचे ४ क्षण कमी झाले असते. त्यामुळे घईसाब तुस्सी ग्रेट हो. तुम्ही असेच चित्रपट बनवत रहा. अवांतरः फारएण्ड भाउ यातील कुठल्या चित्रपटावर लिहितील पुढच्न्यावेळेस? आमची फर्माइश यादे किंवा त्रिमुर्ती