Skip to main content

काही बाही - २

लेखक अवलिया
Published on बुधवार, 01/09/2010
भाग १ एकदा वाचुन झाल्यावर कधीही कुठुनही वाचता येतो, त्यातील कुठलेही पान काढून वाचता येते, त्यावर मनन वा चिंतन करता येते असा ग्रंथ म्हणजे दासबोध. दासबोधातील मराठी खुपच सुलभ आहे. फार कमी ठिकाणी शब्दकोशाचे सहाय्य घ्यावे लागते. रोजच्या जीवनातील घटनांमधे प्रचिती येणारे रोकडे पुस्तक असं म्हटलं तरी चालेल. ब्रह्मचारी माणसाने प्रापंचिक माणसाला केलेला उपदेश असला तरी समर्थांच्या तळागाळातील लोकांना असलेल्या समस्यांचे भान थक्क करुन सोडते. पहिल्याच दशकातील पहिला समास. ग्रंथारंभलक्षण. ग्रंथात काय काय माहिती दिलेली आहे याचे निरुपण करतांना पुर्ण ग्रंथ न वाचताच, त्यातले विचार समजुन न घेताच, अनाठायी त्याज्य कालबाह्य असे प्रतिपादन करुन दुषणे देणा-या आक्षेपकांबद्दल समर्थ म्हणतात.... पूर्णग्रंथ पाहिल्याविण| उगाच ठेवी जो दूषण | तो दुरात्मा दुराभिमान| मत्सरें करी ||२२|| अभिमानें उठे मत्सर| मत्सरें ये तिरस्कार | पुढें क्रोधाचा विकार| प्रबळे बळें ||२३|| ऐसा अंतरी नासला| कामक्रोधें खवळला | अहंभावे पालटला| प्रत्यक्ष दिसे ||२४|| कामक्रोधें लिथाडिला| तो कैसा म्हणावा भला | अमृत सेवितांच पावला| मृत्य राहो ||२५|| आतां असो हें बोलणें| अधिकारासारिखें घेणें | परंतु अभिमान त्यागणें| हें उत्तमोत्तम ||२६|| अर्थ सरळ आणि सोपा आहे. दासबोधातील अजुन काही समास असेच पुढे कधीतरी काही बाही कारणाने... दासबोध लिंक - http://www.dasbodha.org/main.htm
लेखनविषय:

वाचन संख्या 2269
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

रोजच्या जीवनातील घटनांमधे प्रचिती येणारे रोकडे पुस्तक असं म्हटलं तरी चालेल. --- अगदी खरं आहे. समर्थाचिया सेवका वक्र पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे ?

परंतु अभिमान त्यागणें| हें उत्तमोत्तम ||२६|| हे अगदी बरोब्बर ! आम्हाला हल्ली कोणत्याच देशाचा अभिमान राहिलेला नाही.

In reply to by मिसळभोक्ता

आम्हाला हल्ली कोणत्याच देशाचा अभिमान राहिलेला नाही.
मिभोकाका आणि रंगाचा* ?? रंग = कलर ह्या अर्थी ;)

लिहिले छान आहे , मात्र हे काहि बाही फारच लगेच आटोपलेत..